Friday, February 27, 2015

आधुनिक ऋषी - मा. चंडीकादास अमृतराव देशमुख उपाख्य मा. नानाजी देशमुख

भारत हा ऋषीमुनींचा देश आहे, आपल्या उत्तुंग आणि आकाशाला आपल्या ज्ञानाने गवसणी घालणाऱ्या ऋषीमुनींनी भारत देशाला आपल्या अविरत ज्ञानसाधनाने, निरंतर उन्नतीच्या ध्यासाने ज्ञानसंपन्न केलेले आहे. या महाराष्ट्राने आधुनिक काळात याच ऋषीमुनींच्या तोडीची अनेक ऋषितुल्य व्यक्तिमत्वे आपल्या भारतमातेला दिलेली आहेत आणि भारतमातेची आपल्या परीने सेवा केली आहे. 

माझी मर्यादा मला माहीत आहे, सर्वांची नांवे येथे उधृत करणे कठीण आहे. त्यातील काहींची जरी लिहावयाची असली तरी त्याची देखील खूप मोठी यादी होईल हे महाराष्ट्रासाठी आणि मी महाराष्ट्रीयन आहे म्हणून माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, महान तत्वज्ञ आणि स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वेचणारे लोकमान्य बाल गंगाधर टिळक, समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर, नामदार गोपाल कृष्ण गोखले, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, महिलांसाठी अजोड कार्य करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे, केवळ दलित समाजाचेच नाही तर आपल्या बुध्दीने जग दिपवून टाकणारे घटनासामितीचे सदस्य भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, समाजाच्या विचारात देखील नसणाऱ्या महारोग्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचत जगाला दिग्मूढ करणारे डॉ. मुरलीधर देविदास उपाख्य बाबा आमटे, 'सब भूमी गोपालकी' म्हणत भूदान चळवळ उभारून जनतेकडून जमिनीचे अविश्वसनीय असे जनतेसाठी दान घेणारे महर्षी विनायक नरहर उपाख्य विनोबा भावे, स्त्रियांसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी आपले जीवन उपयोगात आणणारे महात्मा ज्योतीराव गोविंदराव उपाख्य ज्योतिबा फुले आणि सौ. सावित्रीबाई फुले, सेनापती पांडुरंग महादेव बापट, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, व्हिक्टोरिया क्रॉस मिळविणारे नामदेव जाधव आणि देशासाठी तशीच कामगिरी बजावणारे जनरल अरुणकुमार श्रीधर वैद्य, डॉ. बानू जहांगीर कोयाजी, भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे, संत गाडगे महाराज, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, विश्वकोशाचे महाकाय काम मराठी भाषेत आणण्याचे शिवधनुष्य उचलणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, हिंदुहृदयसम्राट बाळ केशव उपाख्य बाळासाहेब ठाकरे, किती नांवे सांगावीत आणि किती नांवे लिहावीत तरी कितीतरी नांवे राहूनच जातात. 

यातील एक नांव असेच आहे, आधुनिक ऋषी - मा. चंडीकादास अमृतराव देशमुख उपाख्य मा. नानाजी देशमुख ! ११ ऑक्टोबर १९१६ रोजी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गांवी जन्मलेल्या या चंडीकादास अमृतराव देशमुख यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०१० पावेतो आपल्या कर्तुत्वाने आपले नांव 'नानाजी देशमुख' या नांवाने संपूर्ण भारतभरच नव्हे तर जगात चिरंजीव केले होते. लहानपणी भाजी विकून पैसे मिळवणारा आणि मंदिरात राहून शिक्षण घेणारा 'चंडिकादास' याने आपले उच्च शिक्षण 'Birla Institute of Technology and Science Pilani' या प्रख्यात शिक्षणसंस्थेत घेतले.

हा 'चंडिकादास' मग डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या संपर्कात आला आणि 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या' परिवारात स्वयंसेवक म्हणून सामील झाला. 'भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होवू शकतो' या कल्पनेला मध्यवर्ती मानून रचनात्मक कामाचे अनेक प्रकल्प त्यांनी उभे केले. उत्तरप्रदेशात पूर्णवेळ कार्यकर्ते असणाऱ्या 'नानाजींनी' सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय चारित्र्यावर आधारित असा एक राजकीय पक्ष उभारणेसाठी म्हणून प्रयत्न केले त्यातून 'भारतीय जनसंघ' स्थापन झाला. पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्री सुंदरलाल भंडारी, श्री अटलबिहारी वाजपेयी आणि श्री लालकृष्ण अडवाणी यांच्या माद्यमातून ते 'जनसंघाशी' संपर्कात राहिले. आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीतही ते सहभागी असत,  

पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या 'एकात्मिक मानवतावाद' या तत्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यांनी याच तत्वज्ञानाच्या आधारावर रचनात्मक, विधायक कामाची उभारणी करण्याचा ध्यास घेतला, जनता पक्षाचे मंत्रिमंडळातील मंत्रिपद नाकारले, आणि राजकारण संन्यास घेवून अखंडपणे सेवाकार्य करण्याचा निर्णय घेतला आणि 'दीनदयाळ संशोधन संस्था' स्थापन केली. या माध्यमातून उत्तरप्रदेशातील 'गोंडा' जिल्ह्यात सिंचनाचे कार्य केले आणि तेथील शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले. त्यानंतर मध्यप्रदेशातील 'चित्रकुट' जिल्ह्यात दुर्गम, पहाडी गावांतील जनतेला विविध प्रकल्पांच्या माद्यमातून आत्मनिर्भर आणि उद्योगी बनवण्यावर लक्ष दिले. 'पाणी अडवा - पाणी जिरवा' हि त्यांनी अमलात आणलेली कल्पना याने सिंचनक्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढविले. गो-वंश संवर्धन, पारंपारिक कृषी पध्दतीचा विकास व प्रसार, गुरुकुलपध्दतीचे शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला प्राधान्य, आयुर्वेदिक वनौषधींचे संशोधन आणि याच पद्धतीचे अनेक प्रकल्प त्यांनी 'चित्रकूटच्या' परिसरात सुरु केले. येथेच त्यांनी भारतातील पहिले 'ग्रामीण विद्यापीठ' हे 'चित्रकुट ग्रामोदय विश्वविद्यालय' या नावाने स्थापन केले. हे कार्य व्यवस्थित चालावे यासाठी त्यांनी समाजसेवेची इच्छा असणाऱ्या दांपत्यांना समाजशिल्पी बनविले. आर्थिक, सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गांव बनविले.  

'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे' ही समर्थ रामदासांची उक्ती लक्षात ठेवून सर्वांच्या जीवनात काय आदर्श असावेत हे दर्शविणेसाठी चित्रकुटमध्ये अभूतपूर्व असे 'श्रीराम दर्शन' हे कायम स्वरूपी प्रदर्शन उभे केलेले आहे, रामायणातील घटनांसोबत प्राणीसृष्टीही उभी केली आहे. 'चित्रकुट' हे त्यांचे 'कर्मस्थान' होते. त्यांनी १९९० चे सुमारास मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या राज्यातील सुमारे २५० गावे दत्तक घेतली आणि त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा भरपूर प्रयत्न केला. स्त्रियांना गृहोद्योग, स्वच्छता, शिद्ध बोलणे सुरु करून ग्रामविकासाचे काम सुरु केले. त्यांच्या या कामाचे फलित म्हणून चित्रकुट क्षेत्रातील ८० खेड्यातील न्यायालयातील जवळजवळ ६० टक्के खटले लोकांनी मागे घेतले आणि एकत्र बसून त्यावर निर्णय घेतले. भारतातील इतर राज्यांमध्ये देखील दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून काम सुरु आहे. भारत सरकारने या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना 'पद्मविभूषण' हा पुरस्कार दिला. राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी त्यांचे वर्णन 'समाज उध्दारासाठी एकाच विचाराने प्रेरित झालेले व्यक्तित्व' या शब्दांत केले.

वयोमानाप्रमाणे होत असलेल्या त्रासाकरिता औषधोपचार करण्यासाठी त्यांनी दिल्लीला येण्यास नकार दिला. 'दधिची देहदान संस्था, नवी दिल्ली' या संस्थेला त्यांनी मरणोत्तर देहदान करण्याचे इच्छा पत्र केले, संस्थेने ते स्विकारले. त्यांचा देह संशोधनासाठी 'All India Institute of Medical Science' यांच्याकडे पाठविला. या आधुनिक 'दधिची ऋषीचे' आम्ही वारसदार आहोत.
  


Thursday, February 26, 2015

सत्यमेव जयते


We all know our old maxim 'सत्यमेव जयते' from 'Upanishad', that proved as the truth forever hence is accepted by the Government and always stated in its every work as the 'Seal' of Government. There is no dispute about its value of the maxim 'सत्यमेव जयते'. The question is that whether that is seriously considered, followed by the Government or even by us? The unfortunate answer is that it is never seriously considered by the Government and about us - we are now presuming that whatever manner of falsity is accepted by the 'Government Servants' is the natural routine conduct of their work. We astonished when the experience from their is otherwise. Again it is very sorry to say here that there are some experience that the 'Government Servants' who are following their duty based on this old, accepted maxim as 'सत्यमेव जयते' they are hardly tolerated by the administration of our Government, further unfortunate thing is that it is accepted by expressing that ' he does not swallow the money and also not allow us too.' Where we reached in our way of development.  

It is generally expressed by every political party prior to election their thoughts about elections that may be of 'Legislative Assembly', or 'Parliament' about the possible work which they are going to do for the people in the form of assurances, declarations supporting their thoughts of ideology. But what we are experiencing now since some elections, the expressions or assurances of declarations about the proposed work if that political party comes in ruling are not believed with any seriousness and only those are taken for consideration by opposite party for criticism that it has not performing its assurances, declarations. It is generally expected by the people though are very less in number, (I am not making submission about their strength as they believed this maxim - 'सत्यमेव जयते') that the country is going to run, controled and administered by these people who are used to be elected in as 'MLA' for the State or ''MP'' for the country in parliament.

It also happens that in the elections of 'Municipal Corporation', 'Municipality', 'Gram Panchayat' 'Zilla Parishad and Panchayat Samittees' etc. those are important elections considering the expected possible strength to the political party which is to be supported to its work by those workers. This not keeping the words given to the people also used to happen in those elections.

The assurances may be of several natures such as 'To bring secularism in our country and except that there is no future to our country, society', some parties may assure us that 'Hinduism is the culture of our country and only accepting this ideology that also is real secular and acceptable to all', the people who believes on the financial assurances assures the people that 'Everything would be given free to the poor peoples', the political party who is believing the reservations policy though that shall not be permanent mode for us as expressed by the 'Founder of our Constitution', Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar, while expressing his thoughts on reservation policy but now by uttering the word at every moment of 'Dr. Babasaheb Ambedar we are making the mockery of our reservation policy and every caste is demanding 'reservations' for them hence it is assured that 'Reservations in all fields to 'Deepressed class of society, minorities or to some specific castes'. It is never stated that the facilities would be given to the need persons only, of course, we the people of India, are also not so honest to refuse the facilities, if are not really required. This policy has the creation of favoratism to either caste, religion, sector that is dividing our country in more parts again and again. Nothing is though and followed in implementation by any party nor even expressed by any party.
      
None is thinking collectively to reach the culmination of their development of our country but thinking and implementing its policy to development himself, so has become selfish. This is happening with every political party, that may be 'Congress', 'Janasangh -now called as Bharatiya Janata Party', presuming to be followers of socialists and secularism 'Aam Janata Party / Janata Dal / Samajwadi Janata Dal' and may other parties of our country. It is always kept in mind that unless the ideology is not followed by the honest followers of BJP / Shiv Sena / Congress / any other party with this maxim as we accepted 'सत्यमेव जयते'.  

Specially alarming the present ruling party, 'Bharatiya Janata Party' it can be said that it does not want now any support of any party at present for ruling their Government in central, there would be hardly any possibility of getting strength to your party in this fashion or manner. Otherwise there are so many opportunists as are imported by the party believing themselves to be expert in winning any elections, those all experts may support your ruling, Government for some time / some moment but ultimately will certainly damage the party that is claiming to be 'The PArty with difference' and your ideology really from this culture forever. My question to myself but for all of us that is anyone has time to spend on this issue and think it to be important?

Friday, February 13, 2015

Samartha Ramdas Swami




Chi. Narayan Krishnajipant Thosar, son of Suryajipant and Sau. Ranubai, was born in village 'Jamb' on Chaitra Shuddha 9, Shake 1530 as celebrated as 'Ram Navami' in entire world. 

Since his childhood, he was fond of exercise and performing prayer for 'Maruti'. When his marriage ceremony was in progress, he heard the word 'Savadhan' in 'Mangalashtak', he run away from that ceremony and further program of marriage could not be completed. 

Thereafter on Magh Shuddha 7, Shake 1542, he started meditation and ''Punacharan' of 13 crore 'mantra' for Lord Ramachandra' at village 'Takali' near Nasik every day continuously for 12 years by standing in the river Godavari with Nandini till mid-day. After this 'mantrajap', he used to go for 'madhukari' to save his life, physical body. After completion of this 'Tapacharya' 'Punacharan', he started to visit, travel for entire 'Aryavarta', our country where he saw the pilgrims, villages and villagers, the rulers and their fashion, mode with their subjects and decided to encourage the people for physical exercise, keeping in the mind that 'Strength Prevails'. 

He returned in Maharashtra and decided that 'Balopasana' is very important as 'Healthy body carries healthy mind'. One of the step to achieve this target, he established the 11 temples of the 'God of Strength - Lord Hanuman' for inspiration to the people, youth. 'Hanuman' is the idol of 'Strength' and at the same time He is also known for his service with 'Lord Ramachandra' 

As his continuous thoughtful efforts for encouraging the people to achieve the target to make 'Strengthen Generation' for 'Powerful Society with Powerful Mind', those thoughts became the attraction for people at large, especially for the young generation and proved to be changing circumstance, beneficial for our society ultimately resulted in improving number of people and increasing followers of his ideology and started to call his ideology as 'Ramadasi Sampraday' and his followers as 'Ramdasi'. 

His service, his followers and his ideology was very much impressed to 'Chhatrapati Shivaji Maharaj' who is also performing his duty towards the society for establishing 'Hindavi Samrajya' and protection for 'Hindutva' that ultimately resulted with the several battles, wars with the then 'Rulers - Padshahis' and unfortunately he had to face with ours. Chhatrapati Shivaji Maharaj being 'Shisya' of 'Samartha Ramdas Swami' got several times important inspirations, ways to approach and also support through his 'Shishya Sampradaya' and followers. Chhatrapati Shivaji Maharaj offered 'Sajjangad' as residence for 'Samartha Ramdas Swami' where he stayed till his completion of 'avatar' as on Magh Vadya 9, Shake 1603 (Das Navami). 

The literature of 'Samartha Ramdas Swami' is rather difficult to learn and follow in our life, though very useful for improving our life. The 'Grantharaj - Dasbodh' is the culmination of his writings. 'Manache Shloka', 'Aaratyas' of our Gods, 'Abhangas', 'Strotras of Hanuman', 'Karunastake' 'Panchake' etc.

This pair of 'Guru - Shishya' as 'Samartha Ramdas Swami - Chhatrapati Shivaji Maharaj' gave our society hugely that we are unable to return at anytime in spite of our repeated births.        




Monday, February 9, 2015

शालेय आठवणी - आरक्षण आणि आम्ही


माझ्या मनांत अलीकडे या 'ब्लॉगच्या' निमित्ताने लिहिण्यासारख्या अशा बऱ्याच आठवणी येत असतात, सार्वजनिक जीवनात आलेले विविध प्रसंग असतील, वकिलीच्या व्यवसायाचे निमित्ताने वकील मित्रांनी, पक्षकारांनी दिलेले ज्ञान-अनुभव असतील, शालेय-महाविद्यालयातील जीवनांत मित्रांनी-प्राध्यापकांनी दिलेले अनुभव असतील आणि अगदी दैनंदिन नित्याचरणात आलेले अनुभव असतील, ते कसेही असले तरी आपण डोळे उघडे ठेवून काळजीपूर्वक विचार केला तर प्रत्येक छोटी-छोटी गोष्ट आपणांस जीवनाचे बहुमुल्य तत्वज्ञान, आदर्श त्या अनुभवांतून शिकवीत असते. तो आपल्यासाठी एक धडाच असू शकतो, अर्थात त्यातले मर्म आपणांस कसे,किती आणि कोणते समजले हे आपापल्या विचारावर, विचारसरणीवर आणि संस्कारावर अवलंबून असते. वेगवेगळ्या व्यक्तींच्या वर्तणुकीतून प्रत्येकजण काही ना काही घेवू शकतो. घटना एकच जरी असली तरी त्यातून प्रत्येकांस वेगवेगळे शिकावयांस मिळू शकते, प्रत्येकजण वेगवेगळे अगदी एकमेकांच्या विरुध्द देखील ग्रहण करू शकतो, निष्कर्ष कडू शकतो. अगदी तशीच एक घटना!

आजकाल प्रत्येक नागरिकांस वाटते की आपल्याला शासनाच्या धोरणानुसार आरक्षण मिळाले पाहिजे, ही आरक्षणाची लालसा तर आता इतकी वाढलेली आहे की भारतात जे घुसेखोर आहेत ते देखील आता वेगळ्या स्वरुपात आरक्षण मागू लागले आहे आणि आपले शासन अगदी निर्बुध्दपणे त्याला संमती असावी या पध्दतीचे धोरण आखत आहे, दुर्दैव आपल्या देशाचे आणि आपलेदेखील!  

आपल्या भारतीय राज्यघटनेने वेगवेगळ्या जाती-जमातींना आरक्षण दिलेले आहे आणि हे आपल्या समाजाने स्विकारलेले आहे. त्याचा आपल्या समाजातील बहुसंख्य जण लाभ उठवीत असतात, यांत असादेखील आरोप केला जातो की खऱ्या गरजूंना आणि आवश्यकता  असलेल्यांपर्यंत हा लाभ पोहोचू दिला जात नाही, पोहोचत नाही वगैरे. या बाबी काही अंशी खऱ्या असतील किंवा तद्दन दुटप्पी असतील, यातील खरे-खोटे करण्यासाठी हा प्रपंच नाही, मात्र ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळू शकत असतांना, त्याची पदोन्नती नक्की होऊ शकत असतांना, ती व्यक्ती आपली नक्की होणारी पदोन्नती, ज्यांना आरक्षणाचा लाभ नाही त्या व्यक्तीसाठी नाकारते, अगदी वरवर नाही तर 'सरकार दरबारी' देखील नाकारते, त्याच्या तथाकथित समाजबांधवांचे न ऐकता, समाजातील स्वयंघोषित पुढारी असलेल्यांचे न मानता देखील नाकारते आणि सरतेशेवटी ती पदोन्नती, आजच्या भाषेत खुल्या वर्गातील व्यक्तीस मिळते, हो अगदी 'ब्राह्मण' व्यक्तीस मिळते की यांना या आपल्या भारतभूमीत कधीही आरक्षणाचा लाभ मिळण्याची शक्यता नाही, किंबहुना जाणीवपूर्वक दुर्लक्षीत केले जात असावे असे समाजाचे आणि दुर्दैवाने शासनाचेदेखील वर्तन दिसते. अलीकडच्या प्रघाताप्रमाणे, आपण पुरोगामी ठरले जावे म्हणूनही त्या समाजास काहीही कारण नसतांना शिव्या दिल्या जातात, दोष दिले जातात की ज्याचा शाब्दिक प्रतिकार देखील ते करू शकत नाही मात्र जेथे आपला जीव, आपली संपत्ती, आपली सत्ता, आपला प्रभाव धोक्यात येण्याची शक्यता असते तेथे आपण मूग गिळून गप्प असतो. याचा आपण नित्य अनुभव घेत असतो हे आपण आपलेच आत्मचिंतन केले अर्थात ढोंगीपणा न दाखवता आणि आक्रस्ताळेपणा न करता तरी आपल्या लक्षात येईल, ही आपली मर्दुमकी आणि तरीही आपण शिक्षित झालेलो असल्याचा डंका पिटतो, असो, येथे हा विषय नाही. 

आमच्या शाळेत इतर शिक्षकांसारखे 'खुल्या वर्गातील शिक्षक' असतात, त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप विद्यार्थ्यांना शिकवलेले असते. 'गणित-भूमिती आणि भौतिकशास्त्र' शिकवावे तर त्यांनीच' अशी त्यांची ख्याती असते, या शाळेसंबंधाने जर कोणीही-केंव्हाही-कोठेही विषय काढला तर 'यांचा' या 'खुल्या वर्गातील शिक्षकांचा' विषय निघणारच, तो विद्यार्थी कोणत्याही जाती-समाजाचा असो आणि अगदी सर्वांचे यावर 'त्यांची जात विसरून' एकमत होणार की 'गणित-भूमिती आणि भौतिकशास्त्र' शिकवावे तर त्यांनीच', हो, ते हिंदुत्ववादी आहेत, हे माहीत असतांना देखील! त्यांचे शिकवणे आणि त्यांचे शाळेत असणे हा केवळ शाळेलाच अभिमानासारखा विषय नव्हता तर ही त्यांची ख्याती, त्यांच्या विद्यार्थ्यांनी दूरदूर, अगदी परदेशांतसुध्दा नेलेली होती, आणि तो विद्यार्थी त्याच्या स्वतःच्या ज्ञानाबाबत जरी कोणी शंका घेतली तरी सात्विकसंतापाने म्हणायचा 'लक्षात ठेवा, माझे चूक असणे शक्य नाही, मी 'त्यांचा' विद्यार्थी आहे.' गमतीचा भाग म्हणजे समोरचा जर त्याच भागातील असेल तर 'त्या शिक्षकाचे' मोठेपण निरपवादपणे मान्य करायचा, 'गणित-भूमिती आणि भौतिकशास्त्र' याबाबत त्या शिक्षकाचा अधिकार त्यास मान्य असायचा, पण त्यासोबत तो समोरचा याची देखील जरी चूक असली / नसली तरी तो विषय बाजूला करून यांचा विषय सुरु करायचा आणि तो निर्माण झालेला ताणतणाव क्षणात संपायचा. हा अनुभव मी एकदा दिल्लीला - तेथील मंत्रालयात, कित्येकवेळा मुंबईला- तेथील मंत्रालयात, विविध ठिकाणी, जिल्हाधिकारी कार्यालयात अगदी वेगवेगळ्या ठिकाणी, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींसोबत घेतलेला आहे. असो.

घटना साधारणपणे १९८० - ८२ मधील असावी, ही घटना यांच शिक्षकांची आणि त्यांच्याच विद्यार्थ्याची की जो त्याच शाळेचा विद्यार्थी होता आणि नंतर त्याच शाळेत शिक्षक झाला. नंतर शिक्षक झालेला विद्यार्थी हा 'Scheduled Tribe' मधील होता, त्या समाजांत 'मुस्लिम आणि हिंदू' दोन्ही धर्मियांचे सणवार केले जातात, रिती पाळल्या जातात. हा विद्यार्थी म्हणजे नंतर झालेला शिक्षक त्याचा विषय उत्तम शिकवायचा. त्याचा विषय होता भूगोल! आमच्या शाळेत बहुतेक पुस्तक न घेताच शिक्षक शिकवायचे अपवाद फक्त भाषा विषयाचा!  या दोघांनी मला शिकवले आहे. भूगोल शिकवतांना 'वाळवंटी प्रदेश' हा धडा होता, त्यावेळी त्यांनी एक सांगितलेले तत्व माझ्या मनांत इतके पक्के बसले आहे की आज मला त्याचे वेगवेगळे अर्थ समजत आहेत, ते नेहमी म्हणत 'मानवाचे पाउल आणि वाळवंटाची चाहूल', दुर्दैवाने आपण अगदी खरे करून दाखवत आहोत. शिकवण्याच्या बाबतीत त्या 'गणित-भूमिती आणि भौतिकशास्त्र' शिकवणाऱ्या शिक्षकाचा विद्यार्थी म्हणून तो नक्कीच शोभायचा!

या विद्यार्थ्याची त्या शाळेतील बरीच सेवा झाली. शाळेतील पूर्वीचे मुख्याध्यापक निवृत्त झाले, मग प्रश्न निर्माण झाला 'मुख्याध्यापक कोणास करावयाचे?' कारण जेष्ठताक्रम बघितला तर मग हे 'गणित-भूमिती आणि भौतिकशास्त्र' शिकवणारे शिक्षक जेष्ठ होते, मात्र 'आरक्षणाचा विषय' गृहीत धरला तर मग त्या शिक्षकांची (विद्यार्थ्याची) निवड होणे क्रमप्राप्त होते, कारण त्या संस्थेच्या दोन शाळा होत्या. येथे 'जेष्ठता' आणि 'आरक्षण' असा विषय सुरु झाला. विषय किती संवेदनशील होता हे सांगण्याची अजिबात आवश्यकता नव्हती आणि आज तर अजिबात नाही. दोन्ही गट तसे प्रबळ होते मात्र 'आरक्षणाचे शासकीय धोरण', 'गणित-भूमिती आणि भौतिकशास्त्र' शिकवणाऱ्या शिक्षकाची जात, तेथील स्थानिक राजकारण इत्यादि सर्व बाबी या आरक्षणाचा लाभ मिळू शकणाऱ्या शिक्षकाच्या बाजूने, पर्यायाने 'गणित-भूमिती आणि भौतिकशास्त्र' शिकवणाऱ्या शिक्षकाच्या विरुध्द होत्या. आपली समाजस्थिती आणि त्या जातीवर असलेला दबाव पाहता 'गणित-भूमिती आणि भौतिकशास्त्र' शिकवणाऱ्या शिक्षकांचे बाजूने ना सरकारी धोरण असणार होते ना समाज असणार होता.

'सत्याचा वाली परमेश्वर' ही म्हण मला माझ्या आयुष्यात कित्येक वेळा अनुभवायास मिळालेली आहे. त्या शाळेने, त्या समाजाने आणि 'गणित-भूमिती आणि भौतिकशास्त्र' शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्या 'Scheduled Tribe' समाजातील असलेल्या त्या विद्यार्थ्यांवरील केलेले संस्कार वाया गेलेले नव्हते याचे डोळे दीपवून टाकणारे प्रत्यंतर अजून यावयाचे होते. ती वेळ आली, शिक्षणाधिकारी हा गोंधळ पाहण्यासाठी आले, त्यावेळी दोघांना बोलाविले गेले, 'गणित-भूमिती आणि भौतिकशास्त्र' शिकवणारे शिक्षक आणि त्यांचा हा विद्यार्थी दोन्ही समोर होते. एक शिक्षक जेष्ठताक्रमानुसार मुख्याध्यापक होण्यास पात्र होते, तर दुसरे 'आरक्षणाच्या शासकीय धोरणानुसार' पात्र होते, एकाच्या बाजूने सरकार होते तर एकाच्या बाजूने केवळ जेष्ठता होती आणि त्याची असलेली जात त्याच्या विरुध्द होती. सामना आजच्या भाषेत असमान होता, समस्या अजिबात गंभीर नव्हती, कारण बहुसंख्य पारडे हे 'आरक्षणाचे शासकीय धोरण' आपण कसेही असले तरी पाळले पाहीजे, पुढे काही भानगडी नको असतील तर ते पाळणेच उत्तम या विचाराचे होते. त्यानुसार आरक्षणाचा लाभ मिळू शकणाऱ्या शिक्षकास मुख्याध्यापकाचे पद मिळण्याची शक्यता जास्त होती आणि साधारणपणे तसाच विचार पुढे येवू लागण्याची शक्यता निर्माण झालेली होती.       

शिक्षणाधिकारी दोघांना विचारते झाले, 'गणित-भूमिती आणि भौतिकशास्त्र' शिकवणाऱ्या शिक्षकाने 'मी जेष्ठ आहे, माझी निवड व्हावयास हवी' हे सांगितले. त्यानंतर या 'गणित-भूमिती आणि भौतिकशास्त्र' शिकवणाऱ्याचे विद्यार्थ्यास, म्हणजे आरक्षणाचा लाभ मिळू शकत असलेल्या शिक्षकाची पाळी होती. त्यास शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक पदासंबंधी विचारले आणि त्यांना मिळालेल्या उत्तराने ही घटना उजळून निघाली, त्या शाळेचे, त्या आयुष्यभर 'गणित-भूमिती आणि भौतिकशास्त्र' कळकळीने शिकवणाऱ्या शिक्षकाचे आणि विशेष म्हणजे त्या शिक्षकाच्या विद्यार्थ्याने जे उत्तर दिले त्यातून आपल्या 'शासकीय आरक्षणाच्या धोरणापेक्षाही' संस्कार मोठे मानणारी पिढी अजून आपल्या समाजात, देशात आहे याचे प्रत्यंतर आले. 'माझे गुरु साधे उपशिक्षक उपशिक्षक आणि मी मुख्याध्यापक! मला पटत नाही, ते जो पावेतो या शाळेत आहेत, सन्मानाने मुख्याध्यापक म्हणून निवृत्त होत नाही, तो पावेतो त्याच्यासमोर मी मुख्याध्यापक म्हणून बसण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.' आणि तो त्यांचा विद्यार्थी-शिक्षक  शिक्षणाधिकारी यांचेसमोरून निघून गेला. ते शिक्षक निघून गेल्याचे सर्वांना थोड्यावेळाने लक्षात आले, हा धक्काच होता.

त्यांच्या या विलक्षण उत्तराने प्रत्येकासाठी वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या होत्या. 'आरक्षणाचे धोरण असे शिक्षक असतील तर कसे राबवायचे आणि मग आपल्या बढतीचे काय? पुन्हा हा असा रिपोर्ट खोटा आहे, अशी कोणी तक्रार केली तर, यांचे बढतीप्रकरण आपल्यावरच शेकायचे. अशातऱ्हेची माणसे इतरांना फारच अडचणीत आणतात, काही आवश्यकता होती हे असे तत्त्वज्ञान सर्वांसमक्ष सांगण्याची?' असे आणि यासारखे असंख्य निर्माण झालेले आणि हे प्रत्यक्षात उतरले तर निर्माण होऊ शकणारे प्रश्न त्या शिक्षणाधिकारी याचेसमोर निर्माण झाले.

'सेवाजेष्ठतेप्रमाणे जरी बरोबर असले तरी या पदाला शासननंतर मंजुरी देईल का? शिक्षणाधिकारी असतांना त्यांच्या समक्ष असे बोलणे योग्य नाही, नंतर काही भानगडी कोर्ट-कचेऱ्या झाल्या तर कोण तोंड देणार? पुन्हा या 'आरक्षणाच्या संबंधाने' असल्याने कोण काय खरे-खोटे बोलेल, कसे छापेल याचा नेम नाही, नसती झेंगट मागे लागण्याची शक्यता.' वगैरे संभाव्य बाबी संस्थाचालकांसमोर उभ्या राहिल्या.

मात्र ही बातमी जशी शिक्षकांच्या खोलीत माहीत पडली तसे ''गणित-भूमिती आणि भौतिकशास्त्र' शिकवणाऱ्या शिक्षकाचे डोळे भरून आले, त्यांनी त्या त्यांच्या विद्यार्थी-शिक्षकाच्या पाठीवर हात ठेवला आणि त्या विद्यार्थी-शिक्षकाची अवस्थाही काही फारशी वेगळी नव्हती. शिक्षणाधिकारी यांची मती गुंग झाली, ते निघून गेले. संस्थेच्या पदाधिकारी यांनाही चर्चा करण्याव्यतिरिक्त काही काम उरले नव्हते, शेवटी असे ठरले की 'जळगावला जावून त्यांना भेटायचे आणि ही निष्कारण निर्माण झालेली समस्या सोडवायची.' संस्थेचे पदाधिकारी शिक्षणाधिकारी यांना जळगाव येथे भेटले, त्यांनी संस्थेच्या पदाधिकारीयांना स्पष्टपणे सांगितले, 'तुमच्या सेवाजेष्ठतेप्रमाणे नांव पाठवून द्या.' संस्थेने वादविवाद, गुंतागुंत निर्माण न होता विषय संपला म्हणून सुटकेचा निश्वास सोडला,

त्याप्रमाणे 'गणित-भूमिती आणि भौतिकशास्त्र' शिकवणाऱ्या शिक्षकाचे नांव सेवाजेष्ठतेप्रमाणे गेले, ते मंजूर झाले, त्यानुसार 'गणित-भूमिती आणि भौतिकशास्त्र' शिकवणारे शिक्षक 'मुख्याध्यापक' झाले, त्यांच्या देखरेखीखाली हा त्यांचा विद्यार्थी-शिक्षक फक्त शिक्षकच राहिला, अगदी कोणतीही कटुता मनांत देखील न येवू देता, ते शिक्षक यथावकाश 'मुख्याध्यापक' म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांचा विद्यार्थी, ज्याने 'मुख्याध्यापकपद' आरक्षणाचे शस्त्र असतांना नाकारले, ते मुख्याध्यापक झाले, ते देखील निवृत्त झाले. आता कालौघात 'गणित-भूमिती आणि भौतिकशास्त्र' शिकवणारे शिक्षक या जगात नाहीत आणि त्यांचा तो पद नाकारणारा विद्यार्थीही या जगात नाही.

मला ही घटना आठवण्याचे कारण म्हणजे, बऱ्याच वर्षांनी त्यांच्या, म्हणजे मुख्याध्यापक पद नाकारणाऱ्या त्या शिक्षकांच्या, नातेवाईकांची माझी भेट झाली, भेटीत गप्पा-टप्पा झाल्यावर 'वर्तमानपत्रातील नुकतीच मुस्लिम आणि मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधाने' बातमी बघितली, होणाऱ्या कोर्ट-कचेऱ्या बघितल्या आणि मग हा विषय निघाला. त्यांनी सांगितले 'ते शिक्षक स्वतः शिक्षणाधिकारी यांना भेटले होते, माझ्या समक्ष घडलेली घटना आहे. त्यांनी शिक्षणाधिकारी यांना सांगितले 'मी मला ज्यांनी शिकवलेले आहे त्यांचा मुख्याध्यापक होणार नाही. मी सांगितल्याप्रमाणे करा, मला पुढे संधी आहे, मात्र माझ्या या गुरूला, या आयुष्यात तरी नाही आणि माझ्या गुरूची संधी मी नाकारली, याचे पातक मला घ्यायचे नाही आणि ते आयुष्यभर घेवून माझ्या मुलाबाळांना देखील द्यावयाचे नाही. माझ्यावर मी मुख्याध्यापक व्हावे, ही संधी सोडू नये म्हणून खूप दडपण आहे. तेंव्हा मी यासाठी पुनःपुनः येवू शकणार नाही.' शिक्षणाधिकारी खुर्चीतून उठून उभे राहिले, दरवाज्यापावेतो त्यांना सोडायला आले, 'मला आपल्याला भेटून आनंद झाला, माझे जीवनाचे सार्थक झाले' 'धन्य ती शाळा, धन्य ते शिक्षक आणि धन्य त्यांचे विद्यार्थी' वारे वा! असे म्हणाले.' आम्ही निघून आलो आणि मग पुढचे तुम्हास माहितच आहे, तेच शिक्षक 'मुख्याध्यापक' झाले आणि मग माझे काका झाले.' माझी मती गुंग झाली होती, मी भारतात आहे का कोठे आहे हा प्रश्न मला पडला होता आणि त्याच वेळी मला अभिमानपण वाटला की अशा दोन्ही शिक्षकांचा आणि ज्या शाळेत असे शिक्षक होते त्या शाळेचा मी विद्यार्थी आहे, हीच मुल्ये आपणांस पुढे न्यावयाची आहेत.

घडलेली घटना येथे संपली आणि मग प्रश्न उभे राहिले, आपले घटनादत्त असलेले आरक्षणाचे अधिकार असे नाकारायचे का? 'हजारो वर्षे आमच्यांवर अन्याय होत आहे त्याचे परिमार्जन म्हणून आम्हास आरक्षण दिलेले आहे, उपकार म्हणून नाही' या तत्वाचे काय करायचे? घटनेने दिलेले आरक्षणाचे अधिकार 'खुल्या व्यक्तीसाठी खुळ्यासारखे सोडून देणे योग्य राहील का मूर्खपणाचे राहील; तसेच फायद्याचे राहील का तोट्याचे ठरतील? हे अधिकार सोडून देणे, म्हणजे नीतीमूल्य पाळणे ठरेल, का अधिकार असलेल्याचे अधिकार आपण उपभोगणे अन्याय्य ठरेल? खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत, मी उत्तरे शोधतोय, काहींची उत्तरे मला मिळालेली आहेत पण जाहीरपणे ती सांगावीत का सांगू नये ही समस्या आहे.