Saturday, June 24, 2017

खोटी आश्वासने आणि आयुष्याची धूळधाण

खोटी आश्वासने आणि आयुष्याची धूळधाण

काल दुपारनंतर थोडा निवांतपणा मिळाला. दोन लेख वाचायचे होते. मला ई-मेलने पाठविले होते. त्यांची प्रिंट काढली आणि वाचले. लेख काढून वाचल्यावर वाटले, लगेच त्यां लेखकांना फोनवर सांगावे, 'खरंच छान ! आवडले !'. मात्र लगेच फोन करायचे राहून गेले. माझ्या मित्राच्या पत्नीची प्रकृती पहायला येथे औरंगाबादलाच दवाखान्यात गेलो. तेथे माझा मित्र होताच, गांवी असतो तो. शाळेत बरोबर होतो आम्ही. तो व्यवसायाने डॉक्टर आहे. त्याला येथे थांबावे लागल्याने, त्याचा तेथील दवाखाना विस्कळीत झाला होता. बस, मग अशीच एकमेकाची ख्यालीखुशाली विचारून झाली. सौ. वहिनींची तब्येत काळजी करण्यासारखी नव्हती, पण काळजी होतीच. आॅपरेशन मोठे होते.
या लेखांचा विषय त्यावेळी डोक्यात होताच, नुकतेच वाचलेले होते. जगांत दु:ख आहे, संकटे आहेत, अनिश्चितता आहे, सुखेनैव आयुष्य जगतां येईल पण अशा नोकऱ्या आहेत, तशाच आकाशाला गवसणी घालता येईल अशा संधी आहेत; या निमित्ताने मोठमोठ्या लोकांच्या सहवासात रहायला मिळते. त्यातून मिळणारा अनुभव आहे, घेतला जाणारा धडा आहे. आपल्यावर अवलंबून आहे, आपण त्यांना तोंड कसे द्यायचे. आमच्या या रेषेत गप्पा सुरू होत्या, अडीअडचणींच्या व सुखदु:खाच्या ! गतकाळातील अनुभवांच्या !
काल वाचलेल्या लेखांपैकी एक होता, सौ. मंगला बर्दापूरकर यांचा ! श्री. प्रविण बर्दापूरकर यांचा 'स्थित्यंतरं आणि स्थलांतरं' हा दुसरा लेख, त्यांचा हा पूर्वप्रसिद्ध झालेला लेख वाचला. सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे जाण्याची इच्छा असलेल्याला, त्याचेकडील अत्यंत मर्यादित साधनसामुग्रीवर किंबहुना नसलेल्या साधनसामुग्रीवर प्राप्त परिस्थितीत पुढे जायचे असेल तर कायकाय अडचणी येतात, हे स्वानुभव असल्याने जास्त जाणवले. आज लिहावेसे वाटले ते श्री. प्रविण बर्दापूरकर यांच्या लेखामुळे ! वेगवेगळ्या ठिकाणी भेटलेली माणसं अापले अनुभवविश्व समृद्ध करतात, काही तरी शिकवतात.
सौ. बर्दापूरकर यांचा लेख पण सुंदर, त्याचेबद्दल थोडे नंतर ! यांत कोणाला 'पुरूषप्रधान, मनुवादी संस्कृतीचा वास' आला तर समजो बापडे, मात्र माझेकडे वातावरण तसे नाही.
या लहानपणच्या अडचणी तुमचे शिक्षण संपले, तुम्ही उद्योगाला लागले, दोन पैसे कमवायला लागले म्हणून संपणार नसतात. ज्या ठिकाणी तुम्ही काम करत असतात ही सर्व मंडळी तुमच्याकडे पहात असते. तुम्ही लक्षवेधक काम करत असाल व तुमच्या कामाने जर तुमच्या मालकाला जास्त लाभ होणार असेल तर मग ही तेथील सर्व मंडळी तुमच्या प्रत्येक कामाकडेच नव्हे तर तुमच्या प्रत्येक कृतीकडे डोळ्यांत तेल घालून बघत असतात ! तुमच्या कौतुकासाठी नाही तर तुम्हाला कसे अडचणीत आणता येईल यांसाठी ! तुमच्या दुर्दैवाने जर तुमच्या वरिष्ठांस जर तुमच्यापासून, तुमच्या कामसूपणामुळे धोका आहे असे वाटले तर अवस्था जास्त बिकट होत जाते. मग कार्यालयांत कामाच्या ठिकाणी गट पडतात, अडवणूक सुरू होते, मालकाकडे कामाचे चुकीचे व खोटे रिपोर्टिंग सुरू होते. ही अवस्था ज्याच्या लवकर लक्षात येईल आणि जो काही त्याचेसंबंधी भलतेसलते होण्यापूर्वीच योग्य निर्णय घेवून तेथे रामराम ठोकतो, तो हुशार समजावा किंवा मग त्याला तशी संधी मिळते, तो भाग्यवान मानावा !
श्री. प्रविण बर्दापूरकरांनी 'लोकमत'मधील त्यांचा ते दिल्लीला असतांनाचा अनुभव लिहीलेला आहे. 'एखाद दिवशी तुम्ही भारतात नसतांना टर्मिनेशनची आॅर्डर दिली गेली तर मी आहेचा पूर्णपणे नाहीच होऊन जाईन !' हे वाक्य यांतील अस्थैर्य दाखवते. अत्यंत हे वाचल्यावर त्यांच्यातील हुशारीने, स्पष्टतेने त्यांना वाचविले की त्यांचे योग बलवत्तर होते म्हणून ते सुखरूप बाहेर पडून, यशाची नवनवी शिखरे सर करते झाले हे त्यांनाच जास्त माहीत ! या आजच्या स्थानापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांनी घेतलेले कष्टच त्यांचे हे स्थान सहजसाध्य नाही तर कष्टसाध्य आहे हे दर्शवतात; म्हणूनच हे तात्पुरते वा पद असे पर्यंतच नाही तर कायम आहे. लेख सुंदरच ! आपल्याला आपल्या पण गतकालीन घटनांची आठवण देण्याइतका समर्थ आहे.
त्यांचा योगावर, भविष्यावर विश्वास आहे की नाही याची मला कल्पना नाही. मात्र माझा आहे. प्रत्येक वेळी सारख्याच क्षमतेच्या दोन माणसांनी केलेल्या कामाला सारखेच फळ मिळत नाही, तेव्हा याचे कुठेतरी तारतम्याने गणित मांडावे लागते. तुमच्या कर्तृत्वानेच काम पुढे सरकते, पूर्णत्वास जाते पण फळ मिळण्यास बऱ्याच वेळा नशिबाची साथ लागते. त्यांतील त्यांच्या वाट्याला आलेली विविध महत्त्वपूर्ण कामे, जबाबदाऱ्या आणि वेगळ्या विचारांतील पत्रकारितेतील प्रयोग ! यासाठी बुद्धीनिष्ठ प्रयोगशीलता हवी व तशी संधी देखील मिळायला हवी. त्यांच्या आयुष्यातल्या विविध व्यक्ती पाहिल्या की हे जसे त्यांच्या कामाचे फळ आहे तसेच त्यांचा योग पण आहे आणि ही नशिबाची साथ श्री. प्रविण बर्दापूरकर यांना आहे, हे जाणवले !
------ --------- --------
एक सर्वसामान्य घरातील मुलगा आपल्या लिखाणातील कौशल्याने महाविद्यालयीन काळापासून वर्तमानपत्र लेखनाकडे ओढला गेला. दोन पैसे मिळत असतील, घरच्यासाठी ते हवेच असायचे. त्याचे काम पाहून एका बऱ्यापैकी नावाजलेल्या वर्तमानपत्रात त्याने काम करायला सुरूवात केली. तिथं बऱ्यापैकी बस्तान बसले, नांव होवू लागले, पुरस्कार वगैरे मिळाला. दुसऱ्या स्पर्धक वर्तमानपत्राने हे हेरले आणि हा माणूस आपल्याकडे हवा, हे ठरविले. तिकडले व्यवस्थित बसलेले बस्तान सोडून या माणसांच्या आश्वासनावर हा इकडे आला. नविन असलेल्या माणसाला इकडे कोणाच्यातरी हाताखाली सुरूवातीला काम करावेच लागणार होते. त्या प्रमाणे सुरू झाले. काही काळ गेला.
या ठिकाणच्या प्रस्थापितांना याचे काम सहन होईना. मग हा आणि याचा सोबत एखाद दुसरा एका बाजूला आणि यांचे विरूद्ध इतर बहुसंख्य, असे सुरू झाले. याच्या कामांत पदोपदी अडथळ्यांची शर्यत सुरू झाली, जाणीवपूर्वक ! कामांची क्षमता कमी दिसावी यासाठी. मग बदली झाली, ती पण यांच लोकांच्या हाताखाली ! खोटे रिपोर्टिंग नित्याचे ! अपमानास्पद वागणूक ! या प्रत्येक घटना सांगता येत नाही किंवा दाखवता येत नाही. मात्र अनुभवता येतात. वर्तमानपत्रातील मंडळींचा वावर मोठ्या, प्रसिद्ध लोकांत म्हणून ही त्रासदायक मंडळी पण मोठी व प्रसिद्ध ! शेवटी अशी वेळ आली की याला ते वर्तमानपत्र सोडावे लागले ! स्वेच्छेने सोडावे लागले, सोडणे भाग पाडले गेले का तेथून जबरदस्तीने हाकलले गेले, हा प्रश्न होता. तो येथे सांगण्याचा विषय नाही. मात्र हाच विषय पुढे कायद्याचा व न्यायालयीन प्रश्न बनला. त्याला स्वत:ची अशा अपमानास्पद परिस्थितीत नोकरी गेल्यावर हक्करक्षणासाठी न्यायालयात दावा करावा लागला. निरोद्योगी, गरीब माणूस असला की त्याच्या सत्य विधानाकडे पण कोणाचे लक्ष नसते.
खालील न्यायालयात निकाल विरूद्ध लागला. वरिष्ठ न्यायालयात त्या विरूद्ध दाद मागीतली, तिथं पण पदरी त्याच्या अपयश आलं. आता उच्च न्यायालयात जावे लागणार होते. तो माझ्याकडे आला, सर्व घटना तपशीलवार सांगू लागला ! मला त्याच्या बोलण्यातला खरेपणा, कळकळ व त्याचेवर झालेला अन्याय जाणवत होता. न्यायालय हे भावनेवर चालत नाही तर उपलब्ध पुराव्यावर चालतात. निर्णय आपल्या बाजूने हवा असेल तर तशी भावना निर्माण होईल असा पुरावा हवा ! इथं तर खालील दोन न्यायालयांचा निकाल विरूद्ध ! पुरावा दिसत नव्हता, त्याची सांगडही घातली नव्हती. असे असेल तर आपले काम अजूनच कठीण होते.
मी त्याला त्याच्या प्रत्येक म्हणण्याला पुरावा दाखव सांगू लागलो. तो वैतागला, पण शिकलेला व हुशार असल्याने सावरला. माझ्या म्हणण्यातले तथ्य त्याला समजले. 'खालचे दोन्ही न्यायालये तुमची शत्रू आहेत का म्हणून त्यांनी विरूद्ध निकाल दिला ?' असा प्रश्न उच्च न्यायालयाने दिला तर काय उत्तर देणार ? हे मला सांग. यांवर तो शांत झाला व कागदपत्र गोळा करायला लागला. प्रत्येक घटनेची काही तरी कच्ची पक्की, चिठ्ठीचपाटी हवी. बघताबघता सुमारे ३०० च्या आसपास कागद जमले, हे पुराव्यांमध्ये खाली नव्हते. 'का दाखल केले नाही ?' हे विचारले तर 'असं कोणी सांगीतलं नाही' हे उत्तर ! परिस्थिती कठीणच होती.
माझा न्यायसंस्थेवर व माणसांतल्या देवावर पूर्ण विश्वास आहे. मी दोन कारणांवरून दोन वेगवेगळे पिटीशन तयार केले, सोबत नविन पुरावा देण्याची परवानगी मिळावी हा अर्ज तयार केला आणि ना. उच्च न्यायालयांत हा भलामोठा गठ्ठा दाखल केला. सामनेवाल्या बड्या वर्तमानपत्राला व त्याच्या संपादकास नोटीस निघाली. या कामांत माझ्या विरूद्ध प्रतिथयश वकिलच येणे स्वाभाविक होते. अपेक्षेप्रमाणे झाले. पत्रकारांसाठीच्या कायद्यातील तरतुदी व याची वस्तुस्थिती यांवर खल झाला. न्यायालय थोडे अनुकूल झाले. दुसऱ्या पिटीशनची अवस्था यापेक्षा वाईट ! दोन तीन वेळा ते वेगवेगळ्या न्यायालयांत इकडून तिकडे गेले.
Why you have not filed all these documents in lower court ? Whether that is permissible to be considered a fresh in writ jurisdiction ? हे दोन प्रश्न गोळीसारखे न्यायाधीशांकडून माझ्याकडे आहे.
My Lord, There is no any provision and procedure to deprive my client from getting justice ! Kindly see, the chronological events and documents as prepared with list. I am sure, the evidence and answer would be there though there may not be any document about unfair labour practise and the manner in which my client was driven from the industry.
मा. न्यायाधीश शांततेने ती मी तयार केलेली दस्तऐवजांची यादी व थोडक्यात लिहीलेला तपशील वाचत होते. थोड्या वेळाने त्यांनी मान वर केली, त्या मोठ्या वर्तमानपत्राच्या वकिलाकडे पाहिले. 'Yes, Mr. you have to pay the damages and compensation.' आता आश्चर्य करायची पाळी त्याची होती. असे काही होईल, ही कल्पनाच नव्हती त्याला. त्याने काही सांगायचा प्रयत्न केला तर, ' Yes, Mr. Counsel, you know the jurisdiction of writ court ! Make statement about compensation at 2.30 or we will pass order !' शेवटी मीच सांगीतले, 'पक्षकाराला कळवतो व उद्या येथे बोलवतो.' दुसऱ्या दिवशी पहिल्या क्रमांकावर ते काम ठेवले.
मी पक्षकारांस कळवले, सकाळी चर्चा केली. 'आपली खरोखर जेवढी रक्कम घेणे आहे, ती आपण सांगू,' ही मी कल्पना दिली. समोरच्याने पण अंदाज काढला होताच. कोर्टासमोर काम निघाल्यावर मी रक्कम सांगीतली, व्याजासहीत हिशोब करून ! न्यायालयाने मला व्याज सोडायला लावले व वर्तमानपत्र मालकाने मूळ देणे रक्कम द्यावी, हे सांगीतले. नकार येण्याचा प्रश्नच नव्हता. त्याप्रमाणे आदेश झाला व सर्व केसेस काढून घ्यायचे ठरले. बाहेर आल्यावर, त्यांचे वकिल मला म्हणाले, 'ही बातमी पेपरांत देवू नका.वगैरे ' मी कबूल झालो. ही घटना आता जुनी झाली. त्याला आता 'बातमीमूल्य' आहे का नाही, याची मला कल्पना नाही.
माझ्यापुरता एक वकिल म्हणून हा प्रश्न समाधानकारकपणे पक्षकाराच्या हितात सुटला ! --- पण ज्या बुद्धीमान तरूण पत्रकाराने कोणाच्यातरी शब्दाखातर ऐन उमेदीत आपले सुखाचे आयुष्य केवळ समोरचा दिलेले आश्वासन पूर्ण करेल, चांगली संधी मिळेल, आपले भविष्य सुधारेल या विश्वासाने पणाला लावले, त्याच्या आयुष्याचे हे धिंडवडे निघाले त्याचे काय ? ते मोठे संपादक नंतर मानमरातबात निवृत्त झाले, ते वर्तमानपत्र उत्तम सुरू आहे, त्या मालकाला किंवा संबंधीत आश्वासन देणाऱ्याला ही घटना लक्षात तरी आहे की नाही, देव जाणे ! पण मला मात्र ही घटना आठवली, तर आजही वेदना देते.
श्री. प्रविण बर्दापूरकरजी तुमचा लेख वाचला ! अन् हे सर्व आठवले -- तुमच्या या व्यवसायाने मुद्दाम वाताहत केलेल्या किंवा त्याच्या कमी हुशारीने किंवा नशिबाने त्याच्या पत्रकार आयुष्याची वाताहत झालेल्याचा काय दोष होता ?

Monday, June 12, 2017

शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा ।

शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
दिव्यला देखून नमस्कार || १ ||
तिळाचे तेल कापसाची वात | दिवा जळो सारीरात ।
दिवा लावला देवांपाशी | उजेड पडला तुळशीपाशीं |
माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ ||
असे आणि यांसारखे श्लोक मी बालपणांत सायंकाळी देवासमोर म्हणायचो. मला म्हणायला सांगीतले जाई. मग त्यानंतर बऱ्याचवेळा परवचा म्हणावा लागे, कारण तो गुरूजींनी सांगीतलेला असे, रोज म्हणायला. गुरूजी बऱ्याच वेळी हे विचारत पण नसत; पण न जाणो, विचारले तर 'परवचा म्हटला नाही' हे सांगण्याचे दु:ख नको असायचे.
हे श्लोक, परवचा म्हणण्याचा फायदा काय ? आपण हे म्हणतो आहे, देवापाशी मागणे मागतो आहे पण खरोखर देव आहे का ? दिव्याला नमस्कार करून शत्रुची बुद्धी का शत्रुत्वाची बुद्धी खरोखरच नष्ट होते का ? नष्ट नाही झाली तर काय करायचे ? मग त्याची तक्रार कोणाकडे करायची ? रात्रभर दिवा का लावायचा व त्याचा उजेड तुळशीपाशी का पडला पाहिजे ? त्यामुळे काय होईल ? असे प्रश्न मला पडत, नाही असे नाही. काही वेळा मी विचारत पण असे. वेगवेगळी उत्तरे असत. त्यामधे -- 'देवबाप्पा सर्व पहातो. असे म्हटले की त्याला बरं वाटते, मग तो तुला छान तुला हवं ते देईन. तुला खूप मोठे व्हायचे ना ? मग हे म्हटलं पाहीजे.' वगैरे उत्तरं असत. त्यातल्या त्यात मला 'खूप मोठे होण्यासाठी हे सर्व म्हणणे आवश्यक आहे.' हे स्पष्टीकरण बरं वाटे.
त्यातला खरा अर्थ काही त्यावेळी समजत नसे पण लहानपणीच्या अडचणी व समस्या पाहून त्या दूर करण्याचा एक सोपा उपाय आपल्याजवळ अाहे याचे मला नेहमी समाधान वाटत असे. 'अधिकस्य अधिकं फलं' या नात्याने मी त्यांत विविध श्लोकांची, भगवद्गीता, तीस पर्यंतच्या पाढ्यांची, पावकी-निमकी वगैरेंची पण भर टाकली होती.
सर्वांच्या उन्नतीची, सुखाची मागणी केल्यावर मी कसा सुखी होणार ? मी कसा मोठा होणार ? फक्त हे म्हटल्याने खरंच मी मोठा होतो का ? मोठा म्हणजे नेमके काय ? हे मला सर्वार्थाने नीट समजले आहे असे वाटत नाही. यापैकी काहीही न म्हणणारे देखील मोठे झालेत, तेवढेच किंवा त्याच इयत्तेत राहिले नाही. त्यांचीही यथावकाश शिक्षणं झालीत, ते पण पोटापाण्याला लागलीत, त्यांची पण लग्न झालीत, ते पण संसाराला लागले ! मग हे सर्व लहानपणी म्हटल्याने मला काय मिळाले आणि त्यांना काय मिळाले नाही ?
बऱ्याच गोष्टी मनांत येतात ! कधीतरी यांतील काहीही न म्हणणाऱ्यांपैकी, एखादा भेटतो. मस्तपैकी गाडीघोडी, मोठा बंगला बाळगून असलेला आणि लक्ष्मीचे सौख्य अंगावर दिसत असलेले जाणवते. मात्र आश्चर्यकारकपणे म्हणतो, 'तुझं बरं होतं, त्यावेळेस तू सर्व ऐकलं आणि म्हणून इथपर्यंत आलास. आम्ही पहा.' ते दु:खात असतील अशी माझी अजिबात कल्पना नसते. त्यांच्याकडे पाहिल्यावर मीच एकंदरीत दु:खात असावयास हवा, असे मला वाटते.
मला पण बरीच दु:ख आहेत, नाही असे नाही. माझी पण काही दु:खे असावीत असे त्यांना अजिबात वाटत नाही. माणसं दुसऱ्याच्या हक्काचे आपल्याला मिळावं म्हणून का आटापिटा करतात व त्यांचे हक्क, मिळकत हिरावून घेतात ? आपली कर्तव्ये सोयीस्करपणे विसरून व स्वत:च्या वेळी कर्तव्यापालन टाळून, दुसऱ्याने कर्तव्यपालन कसे करावयास हवे हे निर्लज्जपणे कसे सांगू शकतात ? सर्व कबूली झाल्यावर, असे काही ठरलेच नव्हते असे का बदलून जातात ? पण त्यांना या माझ्या समस्या या समस्यांच वाटत नाही; 'हे असे होतंच रहाते, जगाची रीतच आहे.' असं सांगतात.
मग लक्षात येते माझ्याजवळ काय आहे आणि त्यांच्याजवळ काय नाही.

११ जून २०१७

डॉक्टर आणि वकिल

डॉक्टरांचा आणि वकिलांचा संबंध हा न्यायालयीन कामकाजात बऱ्याच वेळा येतो. फौजदारी खटल्यांत तर जखमांचा तपशील, त्यांचे स्वरूप, संभाव्य कारण म्हणजे अपघात किंवा घातपात, जखमेचे वय, त्याचा शरीरावरील परिणाम वगैरे सर्व बाबी या वेळी डॉक्टर किंवा तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला सांगाव्या लागतात.
दिवाणी स्वरूपांच्या घटनांवर पण वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष ही खूप परिणाम करू शकते. अपघातामुळे झालेली शरीराची हानी, त्यांत त्याची कमी झालेली कार्यक्षमता, त्यामुळे मिळणाऱ्या नुकसान भरपाईवर ही साक्ष महत्वाची ठरते. या व्यतिरिक्त अलिकडे विवाहासंबंधी निर्माण होणाऱ्या वादविवादांत देखील डॉक्टरची साक्ष किंवा मत हे बहुतांशी निर्णायकच असू शकते. मानसिकदृष्ट्या अपंगत्व, शारिरीक परिस्थिती व त्याचा वैवाहिक जीवनावर होणारा भलाबुरा परिणाम, मुलंबाळं होण्यावरील परिणाम वगैरे विविध बाबींवर डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरते ती ते त्या विषयांत तज्ञ म्हणून समजले गेल्याने. त्यांची साक्ष ही भारतीय पुरावा कायद्यानुसार तज्ञ व्यक्तीने दिलेली साक्ष म्हणूनच पाहिली जाते व तसेच त्याचे मूल्य विचारात घेवून प्रकरणाचा निर्णय दिला जातो.
आम्हाला जळगांव येथे विधी महाविद्यालयांत शिकवायला फारच निष्ठावान मंडळी लाभलेली होती. आमचे कॉलेज हे सकाळी असायचे. जळगांवमधील नामांकित वकील हे आम्हाला त्यांचा मौल्यवान वेळ खर्च करून शिकवायला येत, ते देखील अत्यंत नियमीतपणे ! त्यांना काही मानधन मिळायचे की नाही कोणास ठावूक ? अर्थात त्यांचा रोज शिकवायला येण्याजाण्याचा खर्च व दिला जाणारा वेळ यांचा जर हिशोब केला तर, ही मंडळी पदरमोड करूनच आम्हाला शिकवत असावी. जळगांव सारख्या ठिकाणी विधी महाविद्यालय चालले व टिकले पाहिजे हीच त्या मागची खरी भावना असावी।
प्राचार्य माथुरवैश्य हे जर वगळले तर सर्वच जण हे मानधनावर शिकवत. अॅड. जी. एस्. फालक हे 'Transfer of Property Act' व अॅड. एस्. एम्. इस्माईल हे 'Negotiable Instruments Act वगैरे शिकवत, ते आता नाहीत. अत्यंत सोपी उदाहरणे देवून त्यांनी कठीण विषय सोपा करून सांगत. अॅड. एल्. एल्. बेंडाळे हे Law of Torts and Land Laws शिकवीत. त्यांच्या शिकविण्याची व उदाहरणे देण्याच्या पद्धतीने आम्ही आपसांतील गप्पाच मारतो आहोत असे वाटे. अॅड. प्रकाश पाटील यांनी Law of Contract शिकवला. त्यांच्या पूर्वी मला बी. कॉम्. करतांना 'भारतीय करारांचा कायदा' हा विषय मी नूतन मराठा कॉलेजला असतांना अॅड. उज्वल निकम शिकवीत. त्यामुळे या कायद्याशी मी तसा परिचित होतो.
अॅड. काझी हे Mohmedan Law शिकवत. अॅड. वसंतराव सरोदे हे हिंदु कायदा व भारतीय पुराव्याचा कायदा शिकवत. हिंदु कायद्यातील तरतुदी, त्यांचा उगम हा तसा आपण सर्वच जण आसपास समाजातील रूढी, परंपरांमधे पहात असल्याने ते समजण्यास काही जड गेले नाही. मात्र त्यांची शिकवण्याची हातोटी ही विलक्षण होती. अॅड. हरिभाऊ चौधरी हे आंतरराष्ट्रीय कायदा व भारतीय राज्यघटना शिकवीत. शिकवतांना ते आणि आम्ही विद्यार्थी सारखेच रंगून जात. प्राचार्य माथुरवैश्य हे दिवाणी व फौजदारी दंडप्रक्रिया संहिता, कंपनी कायदा शिकवीत. त्यांचे पण शिकवणे उत्तम !
कै. अॅड. अच्युतराव अत्रे हे पहिल्या वर्षी भारतीय दंड संहिता व दुसऱ्या वर्षी न्यायशास्त्र शिकवीत. इंडियन पीनल कोड शिकवतांना एक बेअर अॅक्ट घेवून येत आणि संपूर्ण तास ते आम्हाला मंत्रमुग्ध करीत. कायद्यातील प्रत्येक पूर्णविराम, अर्धविराम व स्वल्पविराम यांना अर्थ असतो, हे त्यांनी शिकवले. कायद्यातील तरतूद वाचतांना कुठे व कसे थांबले पाहिजे हे अनुभवांनी, उदाहरणांसहीत दाखविले. त्यामुळे अर्थ कसा बदलतो हे पण दाखवले. आजही त्यांची उदाहरणे मी युक्तीवाद करतांना त्याच त्यांच्याच स्वरात डोक्यांत येतात. न्यायशास्त्र शिकवावे तर त्यांनीच ! एक छोटी निळसर कव्हर असलेली डायरी ते घेवून येत आणि 'हक्क व अधिकार, 'नितीमूल्ये व कायदा' वगैरे तत्व अत्यंत सुंदर सोप्या पद्धतीने सांगत. या सर्व मंडळींचे इंग्रजी इतके काही सोपे असे की आपण काही वेगळ्या, परक्या भाषेत ऐकतो आहे हे देखील जाणवत नसे. विद्यार्थ्यांना माझ्या पुढील वर्षी तर त्यांनी घरी देखील शिकवण्या घेवून शिकवले, मोफत शिकवले. आमच्या भागातील व सर्वांना सुपरिचित असलेले अॅड. उज्वल निकम हे अॅड. अच्युतराव अत्रे यांना गुरूस्थानी मानत.
काय ही मंडळी समाजाचे देणे लागत असतील परमेश्वरालाच माहीत ! ही सर्व मंडळी हाडाची वकील नसून हाडांची जन्मजात शिक्षक असावी ! आम्ही वकिल झाल्यानंतरही आम्हाला यांना विचारायला काही संकोच वाटत नसे आणि ते पण विद्यार्थी समोर आहे असंच सांगत.
विषय होता डॉक्टरांचा ! मी वकिल होवून साधारणत: ३-४ वर्षे झाली असावीत. मी असाच जळगांवला मा. न्या. आर. सी. चव्हाण यांच्या कोर्ट हॉलमधे काम ऐकत बसलेलो होतो. ते सिव्हील जज, सिनीअर डिव्हीजन म्हणून होते तिथं ! नंतर यथावकाश ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पण झाले. तिथे नेहमीच अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणांत काम सुरू असे इथे ! शिकायला सोपे व्हायचे त्यामुळं ! शिपायाने कामातील वकिलांचा पुकारा केला, त्यातील सामनेवाले वकिल नव्हते. केस वैवाहिक नातेसंबंधाची होती. बहुतेक मुलीला अपत्य होवू शकेल का नाही, या संबंधीचा विषय होता. मुलीकडील साक्षीदार म्हणून डॉ. सौ. उषा दावलभक्त आल्या होत्या भुसावळहून ! सोबत डॉ. माधव दावलभक्त, त्यांचे पती पण होते. दोन्ही या भागातील प्रख्यात डॉक्टर ! दवाखाना सोडून न्यायालयातील साक्षीला आले होते.
मुलाकडील वकिल नसल्याने न्यायाधीशांनी कामाचा खोळंबा होवू नये म्हणून डॉ. सौ. दावलभक्त यांची साक्ष सुरू केली आणि त्या वकिलांना निरोप देण्यास शिपायांस सांगीतले. साक्ष पूर्ण होत असतांनाच वकिलांचा कारकून आला आणि संबंधीत वकिल बाहेरगांवी असल्याने आज येवू शकणार नाही म्हणून सांगीतले. 'मी मुदत देणार नाही. काम चालवण्याची व्यवस्था करा. हा निरोप वकिलांना द्या.' असे न्यायाधीशांनी सांगीतले. दरम्यान डॉक्टर हे साक्षीच्या कामासाठी महत्वाचे असले तरी त्यांची जास्त आवश्यकता ही समाजातील रुग्णांसाठी, त्यांच्यावरील उपचारासाठी जास्त आहे. त्यांना साक्षीसाठी वारंवार न्यायालयात यायला लागू नये. अशा स्वरूपात आदेश करून काम दुपारपर्यंत पुढे ठेवले. डॉक्टरांना थोडं थांबून घ्या म्हणून न्यायाधीशांनी सांगीतले.
थोड्या वेळाने अॅड. अत्रे त्या न्यायालयात आले. त्यावेळेस दुसरे काम सुरू होते. ते संपले. न्यायाधीशांनी त्यांना 'कोणत्या कामात' हे विचारले कारण त्यांचे दिवाणी न्यायालयामध्ये येणे हे जवळपास नसायचेच ! त्यांचेकडे फक्त फौजदारी काम ! त्यांनी 'डॉक्टरांची साक्ष होती, माझ्या ज्युनियरचे काम आहे. ज्युनिअर आज नाही. डॉक्टरला परत पाठवणे बरोबर नाही. यापेक्षा महत्वाची असलेली त्यांची कामे ताटकळतात. म्हणून उलटतपासणीसाठी मी आलो आहे. मला त्यांची पूर्वीची तपासणी दाखवा, मी काम चालवतो.' असे सांगीतल्यावर न्यायाधीशांना आणि डॉ. दावलभक्तांना पण बरे वाटले. अॅड. अत्रे यांची न्यायवैद्यक शास्त्रातील ख्याती एवढी होती की डॉक्टरपण त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची विचारपूर्वक उत्तरे देत कारण या विषयापुरते त्यांचे ज्ञान डॉक्टरला पण काही वेळा अडचणीत आणत असे. त्यांनी पूर्वीचा जबाब वाचला व उलटतपासणी सुरू केली. ती अस्खलितपणे पूर्ण झाली. यांना त्या केसमधले काहीही माहिती नाही, हे कोणाला जाणवले पण नाही. डॉक्टरांनी त्यांचे कोर्टातच आभार मानले.
'आॅफीसमधील कोणाचेही काम असले तर माझा ज्युनिअर म्हणून माझी जबाबदारी येते. ज्यावेळी डॉक्टर सारखा साक्षीदार असतो, त्यावेळी त्याच्या व्यवसाय व व्यावसायीक प्रतिष्ठेचे समाजातील महत्व आपणच समजून घ्यायला हवे. काही वेळा त्यांच्या सेवेवर लोकांचे जीव अवलंबून असतात. आपल्या न्यायसंस्थेकडून त्यांना त्रास व्हायला नको. म्हणून मी आलो.' अशा स्वरूपातले बोलणे अॅड. अत्रे यांचे न्यायाधीशांशी झाले. त्यांनी त्याच कामांत यापूर्वी नुकतीच झालेली अशा स्वरुपाची आॅर्डर सांगीतली. 'चला, या निमित्ताने तुम्ही आमच्या दिवाणी कोर्टात आलात. बरं वाटलं.' न्यायाधीशांनी हे म्हटल्यावर सर्वांनाच हसू आले.
समाजातील प्रत्येक घटकाने आपापली जबाबदारी ओळखून जर काम केले तर किती सहज व सुरळीत काम होते. परवा डॉक्टर यांच्या साक्षीसंबंधाने पुराव्याचा कायदा वाचत बसलो होतो, अन् ही आठवण आली.
आताच माझे मित्र श्री. प्रफुल्ल कुलकर्णी यांनी सांगीतले की आता सौ. डॉ. उषा दावलभक्त आपल्यात नाहीत. त्या नुकत्याच दि. २९ मे रोजी हे जग सोडून गेल्या.

३ जून २०१७

Saturday, June 3, 2017

बा कायद्या - चेतन किशोर जोशी यांचा काव्यसंग्रह

बा कायद्या - चेतन किशोर जोशी यांचा काव्यसंग्रह

श्री. चेतन किशोर जोशी यांचा 'बा कायद्या ! हा काव्यसंग्रह त्यांनी मला मागील भेटीत प्रेमाने दिला. तो वाचूनही कधीचाच झाला पण त्यावर काही अद्याप लिहीले नाही, त्याला पहिले कारण माझा थोडा आळस हे समजता येईल पण दुसरे कारण की हे वाचल्यावर मी माझ्या कॉलेजच्या दिवसांत, त्या भावविश्वात गेलो.
त्यातील सर्वच कविता मनाची वेदना स्पष्ट करणाऱ्या आहेत, पण मला 'भारत बंद', 'रक्तरंजित जबाबदारी', 'पुन्हा एकदा ... स्वातंत्र्यलढा', 'चर्चा', 'कुलूपबंद जातीयता', 'पैसा झाडाला लागत नाही' या जाणवल्या !
आसपासच्या अनुभवातून जो राग, नैराश्य, वैफल्य, उद्वेग येतो तो स्वाभाविकपणे व्यक्त होतो. पण ही परिस्थिती असली तरी समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य आपण सोडून देणे सर्वथैव अयोग्य आहे, एवढेच नाही तर ते अंतीमत: घातकारक ठरते. याचे उत्तर 'पुन्हा जन्म घ्या' यातून दिलेले आहे.
हा विचार त्यांना मला वैयक्तिकपणे सांगता आला असता पण मी थेट येथेच व्यक्त केला. आपणासही या निमित्ताने त्यांचे काव्यरूपातील विचार वाचता येतील.
Chetan Kishor Joshi आपण माझेसमोर आपल्या काव्यरूपातील भावना व्यक्त केल्यात, त्यासाठी मला विश्वासू समजले,धन्यवाद !

२८ फेब्रुवारी २०१६

आरक्षण

आरक्षण

काल सहज गप्पा सुरू होत्या त्या नव्या पिढीतील मुलाबरोबर ! शास्त्र या विषयांत 'पीएच्. डी' करत होता, त्याच्या अभ्यासाची धडपड पहाता त्यांचे काम लवकर पूर्ण होईल असे वाटले.
बोलताबोलता विषय निघाला आणि त्याच्या मनातला सल बाहेर आला, 'मैंने आजतक रिजर्व्हेशन का लाभ नहीं लिया!' 'क्यू, क्या हो गया ?' मी विचारले. चर्चा बराच वेळ चालली, त्यात अजिबात आक्रस्ताळेपणा वा आकांडतांडव किंवा समाजाला दोषरूपी शिव्या देणे अथवा परिस्थितीचे भांडवल करणे यापैकी काहीही नव्हते. त्या चर्चेतून निघालेल्या बाबी आपल्या सर्वांना विचारात पाडणाऱ्या व विचार करायल्या लावणाऱ्या निश्चितच आहेत.
समाजांत आपण तीन वर्ग समजू - बुद्धीवादी, व्यापारी व उद्यागपती, शेतकरी वर्ग ! गेल्या काही वर्षातील या रिझर्व्हेशन धोरणात सुधारणा हवी, ज्यांना गरज नाही त्यांनी स्वत:हून घेवू नये. आपल्या दोन-तीन पिढ्यांनंतर तरी हे कायमचे त्या कुटुंबाने सोडून दिले पाहिजे, त्याचसोबत या योग्य व्यक्तीला नक्की मिळतील हे पाहिले पाहिजे. आपल्या देशाला या सवलती देणे परवडत नाही, देश तोट्यात जात आहे.
दुसरे म्हणजे या अनिश्चित व धरसोडीच्या धोरणाने प्रामाणिकपणावर विश्वासून असणारे व्यापारी-उद्योगपती यांचा विश्वास डळमळीत झाला, त्यांना परदेशातील संधी खुणावीत असल्याने त्याचे देशाकडे दुर्लक्ष झाले. त्यातून होणारे फायदे परदेशी गेले.
बुद्धीवादी लोकांची येथे काही खरे नाही ही भावना झाली. येथे शिकायचे, उत्तम शिक्षण परदेशांत घ्यायचे आणि तिकडेच स्थायिक व्हायचे ! कोणाला, काहीही सांगून परिणाम होणार नाही तर उलट आपल्या दैनंदिन व्यवहारात विघ्ने निर्माण होवून आपले जगणे कठिण होईल, याची खात्री असल्याने विचारवंतांचे जे काम समाजप्रबोधन ते मागे पडले.
असे काही नाही, 'रिझर्व्हेशन हे काही भारत तोट्यात पडण्याचे कारण म्हणता येणार नाही, अजूनही खूप मोठी व महत्वाची कारणे आहेत. हा समाज सर्वांगाने पुढे यावा, विकसीत व्हावा तर आरक्षण हवे आहे. 'हे पहा, मला गरज नाही, मी घेतले नाही त्याने देशाचे काहीतरी तर रुपये वाचले असतील, तेवढे जरी मी वाचवू शकलो तरी खूप आहे. आणि महत्वाचे म्हणजे-उद्या असे कोणी म्हणायला नको की यांना देवूनदेवून भारत तोट्यांत गेला.

२ मार्च २०१६

नेहमीच राया तुमची घाई

नेहमीच राया तुमची घाई

दोन-तीन दिवसांपूर्वी मी मुंबईला गेलो होतो, taxi तून जातांना एक गाणे ऐकू आले आणि मन खूप मागे गेले. माझ्या शालेय दिवसांत, गणेशोत्सवात गणेशमंडळ नेहमी 'ऑर्केस्ट्रा' बोलावत असत. दूरदर्शन एवढे प्रचलीत झालेले नव्हते आणि करमणुकीची साधने तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे - कीर्तन, प्रवचन, भाषण, भजन आणि आमच्या सारख्यांना व बहुजनांना आवडणारे म्हणजे रस्त्यावर 'सिनेमे' दाखविणे आणि 'ऑर्केस्ट्रा' ! मग तेथे होणारी गर्दी विचारू नका ! 'ऑर्केस्ट्रा'त त्यावेळच्या प्रसिध्द गाण्यावर नाच अवश्य ठेवलेला असे. तेंव्हा नेहमी नाचासाठी गायले जाणारे लावणीवजा गाणे म्हणजे ----- 'नेहमीच राया तुमची घाई, नका लावू गाठोडं बांधायला,येऊ कशी कशी मी नांदायला --------' आणि मग होणारा शिट्ट्यांचा पाऊस आणि 'होओओओओ --------' असा गर्दीचा आवाज ! हा अनुभव काहींच्या आठवणीत असेल ! अलीकडे त्याची मजा कळणार नाही.
बस, तेच गाणे आपल्यासाठी ! रोशन सातारकर यांनी गायलेले, विठ्ठल शिंदे यांनी स्वरसाज चढविलेले आणि श्रावण गायकवाड यांचे हे सदाबहार आणि सासरी येण्यास नाखूष असलेल्या माहेरवासिणीचे गीत ----
नेहमीच राया तुमची घाई
नका लावू गठुडं बांधायला
येऊ कशी तशी मी नांदायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला
सण वर्षाचा आहे दिवाळी
आज र्‍हावू जाऊ उद्या सकाळी
जेवन करते पुरणाची पोळी
भात मी घातलाय रांधायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला
गाव हाय आपलं बारा कोसं
डोकं तुमचं असं वो कसं ?
उन्हतान्हात चालण्याचं त्रास
दिल्याति चपल्या सांधायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला
बाबा गेले हो परगावा
निरोप त्यांचा घ्यायाला हवा
नाही विचारलं थोरल्या भावा
आई गेली पाणी शेंदायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला
तुम्हाला सजना सांगत्ये ऐका
चालावू नका तुमचा हेका
तुम्हीच सांगा हे बरं हाय का
श्रावण लागलाय सुंदायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला


महाशिवरात्र

महाशिवरात्र

आज महाशिवरात्र ! भगवान शंकर आणि जगन्माता पार्वतीचा विवाह दिन ! या उत्सवात पुष्पदंताच्या 'महिम्न स्त्रोताने' आपण सामील होवू या !
बहुतांशपणे 'शिखरिणी वृत्तातील' ही कमालीची कारुण्यपूर्ण प्रार्थना, केंव्हाही म्हटली तरी त्या जगन्नियंत्यासमोर आपले लघुत्व जाणवून देते, मनाला एक प्रकारची शांती देते !
आपण सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा !
॥ शिवमहिम्न स्तोत्र पुष्पदन्त ॥
॥ ॐ नमः शिवाय॥ ॥ अथ श्री शिवमहिम्नस्तोत्रम्‌॥
महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी
स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः ।
अथाऽवाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन्‌
ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः॥ १॥
अतीतः पंथानं तव च महिमा वाङ्मनसयोः
अतद्व्यावृत्त्या यं चकितमभिधत्ते श्रुतिरपि।
स कस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः
पदे त्वर्वाचीने पतति न मनः कस्य न वचः॥ २॥
मधुस्फीता वाचः परमममृतं निर्मितवतः
तव ब्रह्मन्‌ किं वागपि सुरगुरोर्विस्मयपदम्‌।
मम त्वेतां वाणीं गुणकथनपुण्येन भवतः
पुनामीत्यर्थेऽस्मिन्‌ पुरमथन बुद्धिर्व्यवसिता॥ ३॥
तवैश्वर्यं यत्तज्जगदुदयरक्षाप्रलयकृत्‌
त्रयीवस्तु व्यस्तं तिस्रुषु गुणभिन्नासु तनुषु।
अभव्यानामस्मिन्‌ वरद रमणीयामरमणीं
विहन्तुं व्याक्रोशीं विदधत इहैके जडधियः॥ ४॥
किमीहः किंकायः स खलु किमुपायस्त्रिभुवनं
किमाधारो धाता सृजति किमुपादान इति च।
अतर्क्यैश्वर्ये त्वय्यनवसर दुःस्थो हतधियः
कुतर्कोऽयं कांश्चित्‌ मुखरयति मोहाय जगतः॥ ५॥
अजन्मानो लोकाः किमवयववन्तोऽपि जगतां
अधिष्ठातारं किं भवविधिरनादृत्य भवति।
अनीशो वा कुर्याद्‌ भुवनजनने कः परिकरो
यतो मन्दास्त्वां प्रत्यमरवर संशेरत इमे॥ ६॥
त्रयी साङ्ख्यं योगः पशुपतिमतं वैष्णवमिति
प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः पथ्यमिति च।
रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिल नानापथजुषां
नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव॥ ७॥
महोक्षः खट्वाङ्गं परशुरजिनं भस्म फणिनः
कपालं चेतीयत्तव वरद तन्त्रोपकरणम्‌।
सुरास्तां तामृद्धिं दधति तु भवद्भूप्रणिहितां
न हि स्वात्मारामं विषयमृगतृष्णा भ्रमयति॥ ८॥
ध्रुवं कश्चित्‌ सर्वं सकलमपरस्त्वध्रुवमिदं
परो ध्रौव्याऽध्रौव्ये जगति गदति व्यस्तविषये।
समस्तेऽप्येतस्मिन्‌ पुरमथन तैर्विस्मित इव
स्तुवन्‌ जिह्रेमि त्वां न खलु ननु धृष्टा मुखरता॥ ९॥
तवैश्वर्यं यत्नाद्‌ यदुपरि विरिञ्चिर्हरिरधः
परिच्छेतुं यातावनलमनलस्कन्धवपुषः।
ततो भक्तिश्रद्धा-भरगुरु-गृणद्भ्यां गिरिश यत्‌
स्वयं तस्थे ताभ्यां तव किमनुवृत्तिर्न फलति॥ १०॥
अयत्नादासाद्य त्रिभुवनमवैरव्यतिकरं
दशास्यो यद्बाहूनभृत रणकण्डू-परवशान्‌।
शिरःपद्मश्रेणी-रचितचरणाम्भोरुह-बलेः
स्थिरायास्त्वद्भक्तेस्त्रिपुरहर विस्फूर्जितमिदम्‌॥ ११॥
अमुष्य त्वत्सेवा-समधिगतसारं भुजवनं
बलात्‌ कैलासेऽपि त्वदधिवसतौ विक्रमयतः।
अलभ्या पातालेऽप्यलसचलितांगुष्ठशिरसि
प्रतिष्ठा त्वय्यासीद्‌ ध्रुवमुपचितो मुह्यति खलः॥ १२॥
यदृद्धिं सुत्राम्णो वरद परमोच्चैरपि सतीं
अधश्चक्रे बाणः परिजनविधेयत्रिभुवनः।
न तच्चित्रं तस्मिन्‌ वरिवसितरि त्वच्चरणयोः
न कस्याप्युन्नत्यै भवति शिरसस्त्वय्यवनतिः॥ १३॥
अकाण्ड-ब्रह्माण्ड-क्षयचकित-देवासुरकृपा
विधेयस्याऽऽसीद्‌ यस्त्रिनयन विषं संहृतवतः।
स कल्माषः कण्ठे तव न कुरुते न श्रियमहो
विकारोऽपि श्लाघ्यो भुवन-भय- भङ्ग- व्यसनिनः॥ १४॥
असिद्धार्था नैव क्वचिदपि सदेवासुरनरे
निवर्तन्ते नित्यं जगति जयिनो यस्य विशिखाः।
स पश्यन्नीश त्वामितरसुरसाधारणमभूत्‌
स्मरः स्मर्तव्यात्मा न हि वशिषु पथ्यः परिभवः॥ १५॥
मही पादाघाताद्‌ व्रजति सहसा संशयपदं
पदं विष्णोर्भ्राम्यद्‌ भुज-परिघ-रुग्ण-ग्रह- गणम्‌।
मुहुर्द्यौर्दौस्थ्यं यात्यनिभृत-जटा-ताडित-तटा
जगद्रक्षायै त्वं नटसि ननु वामैव विभुता॥ १६॥
वियद्व्यापी तारा-गण-गुणित-फेनोद्गम-रुचिः
प्रवाहो वारां यः पृषतलघुदृष्टः शिरसि ते।
जगद्द्वीपाकारं जलधिवलयं तेन कृतमिति
अनेनैवोन्नेयं धृतमहिम दिव्यं तव वपुः॥ १७॥
रथः क्षोणी यन्ता शतधृतिरगेन्द्रो धनुरथो
रथाङ्गे चन्द्रार्कौ रथ-चरण-पाणिः शर इति।
दिधक्षोस्ते कोऽयं त्रिपुरतृणमाडम्बर-विधिः
विधेयैः क्रीडन्त्यो न खलु परतन्त्राः प्रभुधियः॥ १८॥
हरिस्ते साहस्रं कमल बलिमाधाय पदयोः
यदेकोने तस्मिन्‌ निजमुदहरन्नेत्रकमलम्‌।
गतो भक्त्युद्रेकः परिणतिमसौ चक्रवपुषः
त्रयाणां रक्षायै त्रिपुरहर जागर्ति जगताम्‌॥ १९॥
क्रतौ सुप्ते जाग्रत्‌ त्वमसि फलयोगे क्रतुमतां
क्व कर्म प्रध्वस्तं फलति पुरुषाराधनमृते।
अतस्त्वां सम्प्रेक्ष्य क्रतुषु फलदान-प्रतिभुवं
श्रुतौ श्रद्धां बध्वा दृढपरिकरः कर्मसु जनः॥ २०॥
क्रियादक्षो दक्षः क्रतुपतिरधीशस्तनुभृतां
ऋषीणामार्त्विज्यं शरणद सदस्याः सुर-गणाः।
क्रतुभ्रंशस्त्वत्तः क्रतुफल-विधान-व्यसनिनः
ध्रुवं कर्तुः श्रद्धा-विधुरमभिचाराय हि मखाः॥ २१॥
प्रजानाथं नाथ प्रसभमभिकं स्वां दुहितरं
गतं रोहिद्‌ भूतां रिरमयिषुमृष्यस्य वपुषा।
धनुष्पाणेर्यातं दिवमपि सपत्राकृतममुं
त्रसन्तं तेऽद्यापि त्यजति न मृगव्याधरभसः॥ २२॥
स्वलावण्याशंसा धृतधनुषमह्नाय तृणवत्‌
पुरः प्लुष्टं दृष्ट्वा पुरमथन पुष्पायुधमपि।
यदि स्त्रैणं देवी यमनिरत-देहार्ध-घटनात्‌
अवैति त्वामद्धा बत वरद मुग्धा युवतयः॥ २३॥
श्मशानेष्वाक्रीडा स्मरहर पिशाचाः सहचराः
चिता-भस्मालेपः स्रगपि नृकरोटी-परिकरः।
अमङ्गल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं
तथापि स्मर्तॄणां वरद परमं मङ्गलमसि॥ २४॥
मनः प्रत्यक्चित्ते सविधमविधायात्त-मरुतः
प्रहृष्यद्रोमाणः प्रमद-सलिलोत्सङ्गति-दृशः।
यदालोक्याह्लादं ह्रद इव निमज्यामृतमये
दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत्‌ किल भवान्‌॥ २५॥
त्रयीं तिस्रो वृत्तीस्त्रिभुवनमथो त्रीनपि सुरान्‌
अकाराद्यैर्वर्णैस्त्रिभिरभिदधत्‌ तीर्णविकृति।
तुरीयं ते धाम ध्वनिभिरवरुन्धानमणुभिः
समस्तं व्यस्तं त्वां शरणद गृणात्योमिति पदम्‌॥ २७॥
भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सहमहान्‌
तथा भीमेशानाविति यदभिधानाष्टकमिदम्‌।
अमुष्मिन्‌ प्रत्येकं प्रविचरति देव श्रुतिरपि
प्रियायास्मैधाम्ने प्रणिहित-नमस्योऽस्मि भवते॥ २८॥
नमो नेदिष्ठाय प्रियदव दविष्ठाय च नमः
नमः क्षोदिष्ठाय स्मरहर महिष्ठाय च नमः।
नमो वर्षिष्ठाय त्रिनयन यविष्ठाय च नमः
नमः सर्वस्मै ते तदिदमतिसर्वाय च नमः॥ २९॥
बहुल-रजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः
प्रबल-तमसे तत्‌ संहारे हराय नमो नमः।
जन-सुखकृते सत्त्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः
प्रमहसि पदे निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः॥ ३०॥
कृश-परिणति-चेतः क्लेशवश्यं क्व चेदं क्व च तव गुण-सीमोल्लङ्घिनी शश्वदृद्धिः।
इति चकितममन्दीकृत्य मां भक्तिराधाद्‌ वरद चरणयोस्ते वाक्य-पुष्पोपहारम्‌॥ ३१॥
असित-गिरि-समं स्यात्‌ कज्जलं सिन्धु-पात्रे सुर-तरुवर-शाखा लेखनी पत्रमुर्वी।
लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारं न याति॥ ३२॥
असुर-सुर-मुनीन्द्रैरर्चितस्येन्दु-मौलेः ग्रथित-गुणमहिम्नो निर्गुणस्येश्वरस्य।
सकल-गण-वरिष्ठः पुष्पदन्ताभिधानः रुचिरमलघुवृत्तैः स्तोत्रमेतच्चकार॥ ३३॥
अहरहरनवद्यं धूर्जटेः स्तोत्रमेतत्‌ पठति परमभक्त्या शुद्ध-चित्तः पुमान्‌ यः।
स भवति शिवलोके रुद्रतुल्यस्तथाऽत्र प्रचुरतर-धनायुः पुत्रवान्‌ कीर्तिमांश्च॥ ३४॥
महेशान्नापरो देवो महिम्नो नापरा स्तुतिः। अघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरोः परम्‌॥ ३५॥
दीक्षा दानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिकाः क्रियाः। महिम्नस्तव पाठस्य कलां नार्हन्ति षोडशीम्‌॥ ३६॥
कुसुमदशन-नामा सर्व-गन्धर्व-राजः
शशिधरवर-मौलेर्देवदेवस्य दासः।
स खलु निज-महिम्नो भ्रष्ट एवास्य रोषात्‌
स्तवनमिदमकार्षीद्‌ दिव्य-दिव्यं महिम्नः॥ ३७॥
सुरगुरुमभिपूज्य स्वर्ग-मोक्षैक-हेतुं
पठति यदि मनुष्यः प्राञ्जलिर्नान्य-चेताः।
व्रजति शिव-समीपं किन्नरैः स्तूयमानः
स्तवनमिदममोघं पुष्पदन्तप्रणीतम्‌॥ ३८॥
आसमाप्तमिदं स्तोत्रं पुण्यं गन्धर्व-भाषितम्‌।
अनौपम्यं मनोहारि सर्वमीश्वरवर्णनम्‌॥ ३९॥
इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्कर-पादयोः।
अर्पिता तेन देवेशः प्रीयतां मे सदाशिवः॥ ४०॥
तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर।
यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः॥ ४१॥
एककालं द्विकालं वा त्रिकालं यः पठेन्नरः।
सर्वपाप-विनिर्मुक्तः शिव लोके महीयते॥ ४२॥
श्री पुष्पदन्त-मुख-पङ्कज-निर्गतेन
स्तोत्रेण किल्बिष-हरेण हर-प्रियेण।
कण्ठस्थितेन पठितेन समाहितेन
सुप्रीणितो भवति भूतपतिर्महेशः॥ ४३॥
॥ इति श्री पुष्पदन्त विरचितं शिवमहिम्नः
स्तोत्रं समाप्तम्‌॥

७ मार्च २०१६

लग्नाच्या वरातीतील गाणी

लग्नाच्या वरातीतील गाणी

कधी नव्हे ती दारावरून जात असलेल्या लग्नाच्या वरातीत जुनी गाणी वाजत होती, नवल वाटले ! कारण अलिकडील लग्नातील नवरदेवाच्या मिरवणुकीतील गाणी ऐकली की नवरदेवाचे काय होत असेल ते त्याला माहीत पण ऐकणारे हतबुध्द होतात.
त्यावरून असेच जुने गाणे आठवले, 'जेलर' या १९५८ सालातील चित्रपटातील ! हे चिरपरिचित जादुई आवाजातील लता मंगेशकर यांनी चितारलेल्या भावनांचे गीत ! गाण्यातील भाव शब्दरूप केले ते 'राजेंद्र कृष्ण' यांनी आणि नितांत सुंदर अशा चालीने सजविले ते 'मदन मोहन' यांनी ! सोहराब मोदींचा हा चित्रपट,
--------------------------------------
हम प्यार में जलनेवालों को चैन कहाँ हाय, आराम कहाँ
प्रीत की अंधियारी मंज़िल में चारों ओर सियाही
आधी राह में ही लुट जाए इस मंजिल का राही
काटोंपर चलनेवालों को चैन कहाँ हाय, आराम कहाँ
बहलाए जब दिल ना बहले तो ऐसे बहलाये
ग़म ही तो है प्यार की दौलत ये कहकर समझाये
अपना मन छलनेवालों को चैन कहाँ हाय, आराम कहाँ

https://www.youtube.com/watch?v=r6G-MwuvC1c


२८ मार्च २०१६

समर्थ रामदासांचे छत्रपती संभाजी महाराजांना पत्र

समर्थ रामदासांचे छत्रपती संभाजी महाराजांना पत्र

छत्रपती संभाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामींनी लिहीलेले पत्र ! खालील मूळ पत्राचे छायाचित्र टाकल्यावर ते वाचता येईल असे द्या म्हटल्यावर येथे ते सर्व पत्र देत आहे. कृपया वाचावे आणि त्यावर चिंतन करून आपले 'समर्थ रामदास स्वामी', 'छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज' आणि 'समर्थांचे महाराजांच्या जीवनातील स्थान व महत्व' याचा विचार करावा.
अखंड सावधान असावे| दुश्चित कदापि नसावे|
तजविजा करीत बसावे| एकांत स्थळी||१||
काही उग्रस्थिती सांडावी| काही सौम्यता धरावी|
चिंता लागावी परावी अंतर्यामी||२||
मागील अपराध क्षमावे| कारभारी हाती धरावे|
सुखी करुनि सोडावे| कामाकडे||३||
पाटवणी तुंब निघेना| तरी मग पाणी चालेना|
तैसे सज्जनांच्या मना| कळले पाहिजे||४||
जनांचा प्रवाहों चालिला| म्हणजे कार्यभाग आटोपला|
जन ठायी ठायी तुंबला| म्हाणिजे खोटे||५||
श्रेष्ठी जे जे मेळविले| त्यासाठी भांडत बैसले|
मग जाणावे फावले| गनिमासी||६||
ऐसे सहसा करू नये| दोघे भांडता तिसय्रासी जाए|
धीर धरून महत्कार्य| समजून करावे||७||
आधीच पडला धस्ती| म्हणजे कार्यभाग होय नास्ती|
याकारणे समस्ती| बुद्धि शोधावी||८||
राजी राखता जग| मग कार्यभागाची लगबग|
ऐसे जाणोनिया सांग | समाधान राखावे||९||
सकळ लोक एक करावे| गनीम निपटुन काढावे|
ऐसे करीता कीर्ति धावे| दिगंतरी||१०||
आधी गाजवावे तडाके| मग भूमंडळ धाके|
ऐसे न होता धक्के| राज्यास होती||११||
समय प्रसंग वोळखावा| राग निपटुन काढावा|
आला तरी कळो नेदावा| जनांमध्ये||१२||
राज्यामध्ये सकळ लोक| सलगी देवून करावे सेवक|
लोकांचे मनामध्ये धाक| उपजोचि नये||१३||
बहुत लोक मेळवावे| एक विचारे भरावे|
कष्टे करोनी घसरावे| म्लेंच्छांवरी||१४||
मतामतांचा गलबला। कोणी पुसेना कोणाला।
जो जे मतीं सांपडलां। तयास तेंचि थोर।
मुलाचे चालीने चालावे। मुलांचे मनोगत बोलावे।
तैसे जनास शिकवावे। हळूहळू।
महंतें महंत करावे। युक्तिबुद्धीने भरावे।
जाणते करून विखरावे। नाना देसी।
सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे।
परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे।।
आहे तितुके जतन करावे| पुढे आणिक मेळवावे|
महाराष्ट्र राज्य करावे |जिकडे तिकडे||१५||
लोकी हिम्मत धरावी| शर्तीची तरवार करावी|
चढ़ती वाढती पदवी| पावाल येणे||१६||
देव मस्तकी धरावा। अवघा हलकल्लोळ करावा।
मुलुख बुडवावा की बडवावा। स्वराज्या कारणे।
देशद्रोही तितुके कुत्ते । मारोन घालावे परते।
देवदास पावती फत्ते। यदर्थी संशयो नाही।
धर्मासाठी झुंजावे|झुंझोनी अवघ्यासी मारावे ||
मारिता मारिता घ्यावे|राज्य आपुले
शिवरायास आठवावे| जीवित्व तृणवत मानावे|
इहलोकी परलोकी राहावे| कीर्तीरुपे||१७||
शिवरायांचे आठवावे स्वरूप| शिवरायांचा आठवावा साक्षेप|
शिवरायांचा आठवावा प्रताप| भुमंडळी||१८||
शिवरायांचे कैसे चालणे| शिवरायांचे कैसे बोलणे|
शिवरायांची सलगी देणे| कैसे असे||१९||
सकळ सुखांचा त्याग| करुनी साधिजे तो योग|
राज्यसाधनाची लगबग| ऐसी असे||२०||
त्याहुनी करावे विशेष| तरीच म्हणावे पुरूष|
या उपरी आता विशेष| काय लिहावे||२१
समर्थाचिया सेवका वक्र पाहे। असा सर्व भूमंडळी कोण आहे।
जयाची लीला वर्णिती लोक तीन्ही। नुपेक्षी कदा रामदासाभिमानी।।

८ एप्रिल २०१६



आकाशवाणी संगीत सभा आठवण

आकाशवाणी संगीत सभा आठवण

काल सायंकाळी झी पुरस्कार सोहळ्यात श्री. महेश काळे यांचे नाट्यगीत सुरू होते, घाईत असल्याने पूर्ण ऐकता आले नाही, पण अप्रतीम !
त्यावरून एक आठवण आली, ती पं. प्रभाकर कारेकर यांच्या आकाशवाणी जळगांव यांनी आयोजित केलेल्या संगीत सभेची ! साथीला तबल्यावर होते Jayant Naik ! त्यावेळी श्री. कारेकरांनी बहुतेक 'चंद्रिका ही जणू' हे नाट्यगीत म्हटले, छान म्हटले !
हे नाट्यगीत रूपक तालात आहे. मला हेच नाट्यगीत दादरा तालात देखील माहीत होते. मी ते ऐकलेले होते. बैठक चांगली रंगात आली होती. मी चिठ्ठी पाठवली आणि त्यांत त्यांना हेच नाट्यगीत 'दादरा' तालात म्हणण्याची विनंती केली होती. चिठ्ठी त्यांचेपर्यंच पोचली, त्यांनी वाचली ! वा ! 'इथे हे माहित आहे तर !' अशासारखे उद्गार काढले. त्याबाबत माहिती सांगीतली आणि तालाशी समर्थपणे खेळत ते नाट्यगीत म्हटले. श्री. जयंत नाईक हे आकाशवाणीचे 'अ' दर्जाचे तबलावादक आहेत, त्यांची अप्रतीम साथ ! श्रोत्यांना नविन काही ऐकल्याचे समाधान ! त्यावेळच्या श्रोत्यांत श्री. Vasant Damle साहेब होते !
ते नाट्यगीत महेश काळे यांचे जमले तर ऐकायला पाठवा.

११ एप्रिल २०१६

सेंट झेवियर मधील संगीत संमेलन

सेंट झेवियर मधील संगीत संमेलन

मुंबईला बहुतेक 'सेंट झेविअर कॉलेजमघ्ये' संगीत संमेलन होते, तीन दिवसांचे ! पं. भीमसेन जोशी यांनी गायलेला हिंडोल व भैरवी, विदुषी गंगूबाई हनगल यांनी गायलेला दुर्गा, पं. फिरोज दस्तूर यांचे 'गोपाला --', उस्ताद बिस्मील्लाखान यांनी सनईवर वाजवलेली 'तेरे सुर और मेरे गीत' याची धून ! श्रोतृवर्गात होते - पं. साई बँकर, अमोल पालेकर वगैरे !
सर्वात कळस झाला - पं. रविशंकर यांचे सतारवादन - साथीला तबल्यावर दोन्ही बाजूला पितापुत्र म्हणजे उस्ताद अल्लारखां आणि झाकिर हुसेन ! कल्पना करा ! त्याच दरम्यान बातमी आली की उस्ताद झाकिर हुसेन यांना भारत सरकारतर्फे पद्मपुरस्कार 'पद्मश्री' जाहीर झालेला आहे ! त्या आनंदात व श्रोत्यांच्या आग्रहाच्या प्रेमात उस्ताद झाकिर हुसेन यांची थरारक तबलासाथ त्याला मिळालेला उस्ताद अल्लारखां यांचा मजबूत वडिलधारा आधार आणि हे दोन्ही पितापुत्र चालले आहे ते पं. रविशंकर यांच्या दैवी सतारवादनासोबत ! सतारवादन लक्ष देवून ऐकावे का पितापुत्रांची तबलासाथ ऐकावी ? माझी अवस्था 'अनंतहस्ते कमलावराने घेता किती घेशील दो कराने' (कर्णाने) !

१७ एप्रिल २०१६

मराठीची आवड का निर्माण होत नाही ?

मराठीची आवड का निर्माण होत नाही ?

राजकवी भा. रा. तांबे यांची 'सायंकाळची शोभा', बालकवी त्रंबक बापूजी ठोमरे यांची 'श्रावणमासी' अशासारख्या निसर्गकविता तसेच कविवर्य कुसुमाग्रज यांची 'पृथ्वीचे प्रेमगीत' सारखी भव्य कल्पना असलेली कविता आणि विचारवंत रा. श्री. जोग वा आचार्य दादा धर्माधिकारी यांच्यासारखे विचारप्रवर्तक लेख तसेच आचार्य अत्रे वा राम गणेश गडकरी वा वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर यांच्यासारख्यांच्या नाटकातील उतारे तसेच श्री. कृ. कोल्हटकर, चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे यांच्यासारखे विनोदी धडे आजकालच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांत का नसतात ?
मराठीची आवड का निर्माण होत नाही वा तिची प्रगती का होत नसावी याचा 'संशोधनाअंती' काढलेला निष्कर्ष !

१७ एप्रिल २०१६

शाळेची सुटी आणि आजोळ

शाळेची सुटी आणि आजोळ 

माझी शाळेची परिक्षा झाली की मी शाळेला सुटी लागली असे समजायचो ! बऱ्याच उशीरा समजले की खरी सुटी ही 'रिझल्ट' लागल्यानंतर लागते ! मला लगेच पोष्टकार्ड आलेले असायचे, आजोळी आजोबांकडून बोलावणे यायचे ! मी जायचो !
मग सर्वप्रथम सुरू व्हायचे ते 'भगवद्गीता' शिकणे, रोज पाच श्लोक ! हे त्यावेळी त्रासदायक वाटे पण त्यानंतर त्याची आयुष्यभर पुरणारी उपयुक्तता समजली !
सर्वात मला आवडणारी वेळ म्हणजे सकाळी ११ वाजेची ! आकाशवाणी मुंबई - कामगारांसाठी कार्यक्रम ! 'कामगारसभा'! मग ती विशिष्ट संगीतधून ! गुरूवार असेल तर 'भक्तीगीते', शुक्रवार असेल तर 'लोकगीते' ! नाट्यगीते केव्हा असत लक्षात नाही ! पण 'नाचत ना गगनांत नाथा' हे पं. जितेंद्र अभिषेकींच्या आवाजातील नाट्यगीत वा 'श्रीगुरूदत्ता जय अवधुता' हे आर. एन्. पराडकरांचे गाणे लागले वा 'काय मी करू, विंचू चावला' हे संत एकनाथांचे शाहीर साबळे यांच्या आवाजातील गाणे ऐकले की मन कसे प्रसन्न होई !
त्याचवेळी 'खानदेश मीलचा' भोंगा होई आणि हा सर्व कामगारवर्ग त्यांच्या मुलाबाळांनी वा घरच्या धनीणीने आणलेला डबा झाडाखाली सोडून खात असत ! कामगारसभा संपे, पुन्हा संगीतधून वाजे आणि हा कामगारवर्ग पुन्हा 'खानदेश मील' मध्ये गुप्त होई. मी पण आपली तेथील बैठक हालवी !
खानदेश मील, कामगारसभा, संगीतधून आणि माझी आजोळची शालेय सुटी - सर्व गेले !

२० एप्रिल २०१६

आजच्या रामायणातील रजक

आजच्या रामायणातील रजक

आज सध्याच्या पंतप्रधानांबाबत अथवा कोणी खंबीरपणाने चांगले काम करत असेल त्यांच्याबाबत जे त्यांचे चारित्र्यहनन करण्याच्या स्वरूपातील प्रश्न विचारत असतील आणि त्याबाबत 'मर्यादापुरूषोत्तम प्रभू रामचंद्र व त्यांच्या कर्तणुकीचा दृष्टांत' देत असतील तसेच केवळ एका धोब्याच्या संशयावरून प्रत्यक्ष रामचंद्रांनी आपल्या पत्नीचा त्याग केला हा दाखला देत असतील तर हा दृष्टांत अनाठायी व येथे योग्य नाही.
कारण येथे फरक म्हणजे तेव्हा प्रश्न विचारणारा पण 'सत्ययुगातील धोबी' म्हणजे प्रजेतील एक होता, त्याला ना प्रभू रामचंद्रांच्या राज्याची अपेक्षा होती ना त्यांस प्रभू रामचंद्रांना राज्यावरून हुसकावून लावायचे होते ना सीतामाईंबाबत द्वेष होता.
आजची गाठ ही शंका उपस्थित करणाऱ्या 'कलियुगातील एका किंवा समानधर्मी व समानध्येयी 'राज्यकर्त्याशी' आहे की ज्याचे ध्येय तुमचे राज्य हिसकावणे हे आहे वा तुम्हाला पदच्युत करणे हे आहे कारण तुम्ही सत्तास्थानावर असल्याने त्यांच्या पूर्वींच्या कृष्णकृत्यांची चौकशी होवून त्यांना शासन होण्याची शक्यता आहे, हे कोणासही आवडणारे नाही. सबब येथे वैयक्तिक हितसंबंध आहे रामायणकालीन रजकाचे नव्हते.
तेव्हा हा विषय आजची राज्यपद्धत लक्षात घेता राजाच्या केवळ वैयक्तिक बाबीसंबंधी नसून त्याच्या संपूर्ण राज्यावर व प्रजेवर होणाऱ्या परिणामांबाबत आहे. म्हणून अशा बाबींमुळे, त्याच्या वैयक्तिक इच्छाआकांक्षांमुळे जर इतर निरपराध प्रजा निष्कारण अडचणीत येणार असेल, त्यांचे हितसंबंध धोक्यात येणार असतील तर त्यांच्या या वर्तनांस त्याच दृष्टीने पाहिले पाहिजे कारण हे वर्तन 'मधुतिष्ठति जिव्हाग्रे, ह्रदयी तु हलाहल' या स्वरूपाचे आहे.

७ मे २०१६

तिलककामोद

तिलककामोद 

आज सकाळी औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावर 'उंबरठा' या चित्रपटातील 'कवी वसंत बापट' यांचे 'पं. हृदयनाथ मंगेशकर' यांनी संगीतबध्द केलेले आणि 'लता मंगेशकर' यांनी गायलेले 'गगन सदन तेजोमय' हे अप्रतिम गीत लागलेले होते. हे गीत बऱ्याच वेळा 'भक्तीगीत' म्हणूनही लावतात. परमेश्वराचे इतक्या आर्ततेने हृदयापासून केलेलं ध्यान खरच मनाला समाधान देवून जाते आणि शांतता देते, मनाला एक आधार मिळतो. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची महती मी काय सांगणार ? मनाला उभारी देणारे हे दिव्य संगीत आम्ही पिढ्यानपिढ्या सांभाळत आलेलो आहोत.
हे गीत 'तिलक कामोद' रागातील आहे. 'षाडव-संपूर्ण' असलेला हा राग 'खमाज' थाटातील आहे. लहानपणी घरी माझी आई विद्यार्थ्यांना शिकवत असतांना, त्या रागाची ही जी अप्रतिम 'पकड' आहे - 'प नी सा रे ग सा रे ग सा' ही म्हटली की उस्फुर्तपणे 'अब सुनो हे नाथ' ही 'चीज' गळ्यातून बाहेर पडे. आजही हे स्वर ऐकले की ती शिकवणी आठवते आणि 'अब सुनो हे नाथ' कानांत घुमते !
आपल्या मराठी भाषेतील 'सं. स्वयंवर' या नाटकातील 'नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर' यांचे 'पं. भास्करबुवा बखले' यांनी संगीतसाज चढविलेले नाट्यगीत 'मम सुखाची ठेव' हे याच रागातील ! वि. सी. गुर्जर यांचे बालगंधर्व यांनी गायलेले 'नंदकुमार' या नाटकातील 'दहन खर हृदया' हे मा. कृष्णराव यांनी संगीत दिलेले पदही सुंदर आहे ! तसेच 'तुरले मानस उदास' हे पं. राम मराठे यांनी गायलेले 'संत कान्होपात्रा' या नाटकातील मा. कृष्णराव यांनी संगीत दिलेले पदही सुंदर आहे. 'रवि मी चंद्र कसा मग' हे नाट्याचार्य कृ. प्र. खाडीलकर' यांचे सं. मानापमान या नाटकातील 'गोविंदराव टेंबे यांनी स्वरात सुंदर बांधलेले आणि अत्यंत गाजलेले नाट्यपद आपण कसे विसरणार ?
हिंदी चित्रपट संगीतातील 'गोदान' या चित्रपटातील 'पं. रविशंकर' यांनी संगीत दिलेले आणि 'हिया जरत रहत दिन रैन' हे 'दीपचंदी' तालातील 'तिलक कामोद' रागातील सुंदर गीत आवर्जून ऐकावेसे वाटते.
मात्र हा विषय मला ज्या गाण्यावरून आठवला ते हे 'उंबरठा' चित्रपटातील गीत -
गगन, सदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश, देई अभय
छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वार्‍यातून, तार्‍यांतुन
वाचले तुझेच नाम
जगजीवन, जनन-मरण
हे तुझेच रूप सदय
वासंतिक कुसुमांतून
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतुन
प्रेमरूप भासतोस
कधि येशील चपलचरण
वाहिले तुलाच हृदय
भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ
भावमधुर गीत नवे
सकलशरण, मनमोहन
सृजन तूच, तूच विलय

७ मे २०१६

जगी ज्यास कोणी नाही

जगी ज्यास कोणी नाही

आज का कोणास ठावूक, सुरेल आवाजात सुमन कल्याणपूर यांनी गायलेले मधुकर जोशी यांचे दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेले हे ह्रदयस्पर्शी गीत आठवले. ते आपली एकटेपणाची, आपण एकाकी असल्याची भावना निश्चीतपणे घालवते व आपणास भक्कम आधार देते. आमचे तुकाराम महाराज नाही का पांडुरंगाला म्हणतात, -
जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती ।
चालविसी हाती, धरोनिया ।।
आपल्या पाठीशी असलेल्या परमेश्वराने वेगवेगळ्या प्रसंगी व रूपात आपले अस्तित्व दाखविले आहे. तेव्हा हे माझे आवडते गीत -
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे
बाळ सोडुनी ते दिधले कुंतीने जळात
घरी रधिकेच्या परि ते वाढले सुखात
कर्णराज म्हणुनी त्याचे नाव अमर आहे
भक्त बाळ प्रल्हादाला छळीले पित्याने
नारसिंह रूपे त्याला रक्षिले प्रभूने
अलौकिक त्याची महती अजुनी विश्व गाये
साधुसंत कबिराला त्या छळिति लोक सारे
पांडुरंग रक्षी त्याला प्राशुनी निखारे
आसवेच त्यांची झाली दुःखरूप दोहे

१५ मे २०१६

तपश्चर्या

तपश्चर्या

आज सकाळी एका गायिकेच्या आवाजात अलीकडील सिनेमातील गाणे ऐकले ! थोडे वाईट वाटले, 'नाकांत गात होती ! आपला आवाज हा कोमल असावा असे वाटणे ठीक आहे पण तो नाकांतून नसावा, अनुनासिक नसावा कारण हा संगीतशास्त्राप्रमाणे गायकाचा दोष मानला जातो. गायकाचा आवाज हा स्वच्छ, मोकळा आणि नैसर्गिक असावा, त्याने आवाजाला कोमल कृत्रिमपणा देवू नये किंवा कृत्रिम कोमलपणा देवू नये. आवाजाची साधना हे अवघड काम असते त्याला निसर्गदत्त प्रज्ञेसोबत निरंतर तपश्चर्येची साथ लागते तेंव्हा ती दगा देत नाही !
बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे साधरणतः १९८८ मध्ये मी 'विदुषी गंगुबाई हंगल' यांचा 'दुर्गा' राग मुंबईला ऐकला होता. दुर्गा, भूप, सारंग, बागेश्री, देस, खमाज, काफी, भीमपलास वगैरे राग प्राथमिक अभ्यासक्रमांत असतांत. वाटले 'दुर्गा' रागांत काय गातील ? पण त्यांनी गायलेले अजूनही कानांत आहे. आपल्याला माहित आहे, त्यांचा आवाजाचा पोट कसा होता मात्र त्या आवाजाच्या दर्जाबद्दल शंका त्यांच्या त्या वयातही घेत येत नव्हती !
हे आठवण्याचे कारण दोन-तीन दिवसांपासून लता मंगेशकर आणि सचिन तेंडूलकर यांच्या संबंधाने चर्चा सुरु आहे. त्याबद्दल अद्याप त्यांची काहीच प्रतिक्रिया नाही, साहजिकच आहे ! ते ज्या उंचीवर आहेत तेथून त्यांना कोणी दिसते आहे की नाही कोणास ठावूक ? प्रत्येकाच्या आवाजाची प्रत वेगळी असते, सर्वच लता मंगेशकर होणार नाहीत आणि ते अपेक्षीतही नाही. काही आशा भोसले असतील, काही गीता दत्त असतील, काही सुमन कल्याणपूर असतील तर काही वाणी जयराम असतील ! काही शमशाद बेगम असतील तर काही सुरैय्या असतील ! प्रत्येकाचा आवाज वेगळा आहे पण दर्जाबद्दल बोलत येणार नाही. आपले नाणे खणखणीत असले तर त्याचा आवाज दूरपर्यंत जातो आणि मग आवाज शोधतशोधत लोक येतात.
जगातील सर्वकालीन क्रिकेटचा संघ बनवायचा असेल तर तुमची इच्छा असो व नसो, डावाचा प्रारंभ सुनील गावस्कर करणार आणि चौथ्या क्रमांकावर सचिन तेंडूलकर येणार, हे नक्की आहे ! त्यांच्या तपश्चर्येचे ते फळ आहे !
आता लता मंगेशकर यांचा आवाज ऐका आणि अलीकडील कुणाचाही ऐका !

१ जून २०१६

मालकंस

मालकंस

'सा ग म ध नी सा, सा नी ध म ग सा', हे आरोह-अवरोह 'ग, ध आणि नी' कोमल स्वर लावून सुरुवात केली की ओठावर आपोआप शब्द येतात, 'मालकंस' ! अतिशय प्रसिद्ध आणि जनमानसांत खूपच प्रचलित असलेला राग ! मलापण खूप आवडतो ! याचा थाट भैरवी !
केवळ हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातच याचे रसिक नाही तर या रागाची असलेली आवड ही झिरपत सिनेसंगीतात, नाट्यसंगीतात देखील गेली आहे. सिनेसंगीतातील 'बैजू बावरा' या संगीताने गाजलेल्या चित्रपटातील 'महंमद रफी' यांनी गायलेले आणि नितांतसुंदर संगीताने 'नौशाद' यांनी सजविलेले 'शकील बदायुनी' यांचे 'मन तडपत हरी दर्शन को आज' हे 'भक्तीगीताची' मान्यता मिळालेले गीत असो, किंवा 'नवरंग' या चित्रपटातील 'पं. भरत व्यास' यांचे 'सी. रामचंद्र' यांनी सजविलेले 'आधा है चंद्रमा, रात आधी' हे चित्रपटातील देखील अतिशय सुंदर चित्रित केलेले गीत आणि तितक्याच समर्थपणे 'महेंद्र कपूर आणि आशा भोसले' यांनी अमर केलेले गीत असो ! अशी कितीतरी गीते सांगता येतील !
नाट्यसंगीतात 'वीरदुंदुभी' या नाटकातील 'वीर वामनराव जोशी' यांचे 'पं. वझेबुवा' यांनी संगीत दिलेले 'मास्तर दिनानाथ' आणि त्यानंतर 'पं. जितेंद्र अभिषेकी' यांनी गायलेले प्रसिद्ध नाट्यगीत कोण विसरणार ? तसेच 'आचार्य प्रल्हाद केशव अत्रे' यांच्या 'पाणीग्रहण' या नाटकातील 'उगवला चंद्र पुनवेचा' हे 'श्रीनिवास खळे' यांनी संगीतबद्ध केलेले आणि प्रख्यात गायिका 'बकुल पंडित' यांनी रसिकांपर्यंत पोचाविलेले 'आचार्य अत्रे' यांचीच नाट्यपद आपणांस परिचित आहेच !

४ जून २०१६

मिया मल्हार

मिया मल्हार

आता मृग नक्षत्र लागले ! पावसाची आपण सर्वंच वाट पाहत आहोत ! मागील दोन-तीन वर्षे वरुणराजाआपल्याला हुलकावणी देत आहे ! वरुणराजाने यंदा तरी आपली अवकृपा करू नये आणि त्याच्या कृपेच्या वर्षावात आपणास चिंब भिजवावे, हीच प्रार्थना !
संगीतातील 'मिया मल्हार' हा राग कोणाला माहित नाही ? संगीतसम्राट तानसेन याचे कर्तृत्व असलेला हा राग ! 'काफी थाट' असलेल्या या रागाची 'जाती संपूर्ण' आणि 'म वादी' आणि 'सा संवादी' आहेत.
पावसाचा आणि या रागाचा फार जवळचा संबंध आहे. या रागाच्या गायनाने पाऊस येतो ही समजूत ! बस आपला एक प्रयत्न, आपण सर्वांसाठी पाऊस आणण्याचा !
मराठीमधील 'कुहू कुहू कुहू येई साद' हे गीत 'मिया मल्हार' या रागात गुंफलेले आहे ! कवयित्री वदन विटणकर यांची ही रचना गायली आहे, अनुराधा पौडवाल यांनी आणि स्वरसाज चढविलेला आहे, अनिल - अरुण यांनी !
'दुख बरे दिन बिते रे भैय्या' हे 'मदर इंडिया' या चित्रपटातील 'नौशाद' यांनी स्वरबद्ध केलेले 'आशा भोसले. मन्ना डे, मोहंमद रफी, शमशाद बेगम' यांनी गायलेले गीत ! तसेच 'गुड्डी' या हिंदी चित्रपटातील 'वाणी जयराम' या गुणी व प्रतिभावंत गायिकेने गायलेले 'बोल रे पपी हरा' हे गीत आपण सर्वांना माहित आहे. गीत गुलझार यांचे आणि संगीत वसंत देसाई यांचे ! अत्यंत साधेपणाने, प्रभावी आणि अतिशय मोजक्याच वाद्यांसह 'वाणी जयराम' यांनी गायलेले हे गीत !

९ जून २०१६

कै. डॉ. नरहर पुरुषोत्तम जोशी ! - रावेरचे संघाचे कायम कार्यालय


कै. डॉ. नरहर पुरुषोत्तम जोशी ! - रावेरचे संघाचे कायम कार्यालय 

नाशिक जिल्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग 'त्रिंबकेश्वर' येथील 'ज्योतिष्यातील गाढा व्यासंग' असलेले 'शासकीय वैद्यकीय अधिकारी' डॉ. नरहर पुरुषोत्तम जोशी हे रावेर, जि. जळगांव येथे नोकरीनिमित्ताने आले आणि त्यांनी आपली नोकरी सोडून रावेरलाच आपली कर्मभूमी मानली, तेथेच आपली वैद्यकीय सेवा रावेरच्या जनतेला द्यावयास सुरुवात केली. त्यांचे प्रशस्त घर आणि दवाखाना म्हणजे आमच्या सारख्यांना आमच्या घरापेक्षा वेगळे वाटतच नसे. मी शाळेत असल्यापासून त्यांच्याकडे घरगुती संबंध असल्याने जात असे. अगदी माझी मुलगी लहान असतांना नेहमी माझे सोबत येत असे, त्यावेळी 'तिच्या त्या आजीला' तिच्यासाठी खाऊ सापडत नसेल तर त्यांचे घरातील ना सापडणारे डबे या 'आजी-आजोबांना' ही तीन वर्षांची चिमुरडी सांगत असे ! ही गोष्ट झाली १९९६-९७ काळातील !
अगदी पूर्वीपासून म्हणजे त्यांच्या नूतन घराचे व दवाखान्याचे बांधकाम झाल्यावर 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' यांच्या येणाऱ्या प्रचारकांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे त्यांच्या घराचे वरच्या मजल्यावरील स्वतंत्र खोल्या ! एवढेच नाही तर सर्व घरात त्यांना नेहमीच मुक्त संचार असे ! काहीवेळा ऐनवेळी परिवारातील कार्यकर्त्यांच्या मुक्कामाची अगदी कोणाचीही अडचण असली तरी ती रावेर येथे आम्हाला कधीही जाणवली नाही ती - कै. डॉ. जोशींमुळे ! अगदी संघाच्या कार्यक्रम घेण्यासाठी जागेची कधीही कोणतीही अडचण त्यांनी आम्हा रावेरवासीयांना कधीही जाणवू दिली नाही !
माझ्या तेथे नेहमी येण्याजाण्यामुळे परिवारातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडणाऱ्यांच्या भेटीगाठी-ओळखी तेथे त्यांचेच घरांत विविध बैठकांच्या निमित्ताने, गप्पागोष्टींच्या निमित्ताने झाल्यात ! रावेर येथील अत्यंत विपरीत परिस्थितीत ज्यांनी भारतीय जनता पक्षाची धुरा सांभाळली ते आमदार आणि खासदार राहिलेले डॉ. गुणवंतराव सरोदे, सध्या केशव प्रतिष्ठानची जबाबदारी पाहत असलेले श्री. भरत अमळकर, रावेर येथील प्रसिद्ध डॉ. अनंत अकोले, शोभराजशेट चंदनानी, माजी आमदार अरुणदादा पाटील ! जुनेजाणते कार्यकर्ते काका शिंदे, नाना लष्करे, एकनाथराव अकोले, तसेच तरुण वर्ग म्हणजे जयंत कुलकर्णी, अशोक शिंदे, मधुकर बारी किती नावे सांगावीत ? एवढेच नाही तर सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वाची जबाबदारी सांभाळत असलेले श्री. भैय्याजी जोशी, पुणे (शिरूर) येथील प्रसिद्ध वक्ते प्रा. सु. ह. जोशी, भारतीय जनता पक्षाचे शरदराव कुलकर्णी, जळगावचे जिल्हा प्रचारक राहिलेले शरदराव ढोले व सौमित्र गोखले, जळगांव जिल्ह्याची 'रा. स्व. संघाची' जबाबदारी असलेले श्री. बापूराव मांडे ! रावेरचे प्रचारक राहिलेले लालचंद टाटीया, अप्पा कुलकर्णी, नाना उपाख्य वि. वि. नवरे, अनिल वळसंगकर या सर्वांच्या भेटीगाठी तेथे होत असत ! यांतील काही नावे आता पडद्याआड गेलीत !
निसर्ग हा प्रत्येकावर परिणाम करत असतो ! वयोमानाने त्यांच्याकडून होईना, त्यांची दोन्ही मुले नाशिकलाच असतात, डॉ. उत्तमकुमार जोशी आणि श्री. विवेक जोशी ! हे त्यांना तेथे नेहमीच कायमसाठी बोलावीत असत, पण रावेरमय झालेल्या डॉ. नरहर पुरुषोत्तम जोशी यांना रावेर सोडून जाण्याची कल्पनाच सहन होत नसे, हे खूप वेळा माझ्याशी बोलत ! 'तिथे नाशिकला काय करणार ? येथे तुम्ही सर्व येतात, बैठक होतात, चर्चा होते मग त्यांत माझा सहभाग असला आणि नसला तरी काय फरक पडतो ? ज्योतिष्याची चर्चा होते, मुलांना संस्कृत शिकविण्यात वेळ जातो ! आनंद वाटतो ! तेथे गेले की माझे समाजातील अस्तीत्व एकदम कमी होऊन जाईल, सगळे आयुष्य येथे गेले' ------ पण निसर्ग आणि त्यांची नाती पक्की ठरली, साधारणतः १७ एप्रिल २००१ ला त्यांनी रावेर कायमचे सोडले आणि नाशिकला गेले, ते पुन्हा आपल्या गावी गेले, नाशिककर झाले ! आमच्या नेहमीच्या भेटीगाठी साहजिकच कमी झाल्या, मात्र नाशिकला गेलो की त्यांचेकडे एक चक्कर असायचीच ! गेली पंधरा वर्षे हा नेम सुरू होता ! अगदी माझी मुलगी नुकतीच दोन महिन्यांपूर्वी तेथे गेली तर त्या 'आजी-आजोबांना' झालेला आनंद तिला सांगतासुद्धा येईना ! त्यांच्या तेथे असलेल्या नातसुनेला एवढेच समजले की 'यांच्या हे खूपच जवळचे आहेत', त्यांच्या वागण्याने नवीन पिढीतील संबंध दृढ होण्याची शक्यता वाढली !
नुकताच आता त्यांच्या सुनेचा फोन आला, 'काल डॉ. नरहर पुरुषोत्तम जोशी गेल्याचे त्यांनी सांगितले' माझ्याशी काकू फक्त एवढेच बोलू शकल्या - 'तुमचे काका गेले' !
हा फोन आला आणि एवढ्या आठवणी झरझर आल्या ! आता डॉ. नरहर पुरुषोत्तम जोशी हे आपल्यात नाहीत, आठवणी काढत बसण्याव्यतिरिक्त आपण काय करणार ?

२५ जून २०१६

बातम्या

बातम्या

मला वर्तमानपत्रातून समजलेल्या घटनांतील बातमी किंवा बातम्यांमागील घटना -
१. तुम्हाला जनतेची सेवा करायची असेल तर तुमच्याजवळ मंत्रीपद हवेच आणि ते पण विशिष्ट खात्याचेच ! नाहीतर समाजसेवाच जमणार नाही !
२. तुमच्या स्वातंत्र्याचे आणि देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांवर कोणत्याही पद्धतीने आक्रमण करून त्यांच्या कामात प्राणघातक अडथळा आणणाऱ्यांच्या स्वातंत्र्याचे महत्व हे आपल्या देशाच्या, देशातील कायदा पाळणाऱ्या नागरिकांच्या प्राणापेक्षा व त्यांच्या स्वातंत्र्यापेक्षा जास्त आहे.
३. कोणत्याही बंडखोर, आक्रस्ताळी, या देशाला आपले न मानणाऱ्या लोकांना त्याच्या इच्छेविरूद्ध आपल्या देशांत ठेवू शकत नाही हा अन्याय आहे ! त्यांच्या मागण्या मान्य करत रहायच्या, तो म्हणतील तो प्रदेश त्यांना देत रहायचा या नादात या देशावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांवर अन्याय झाला तरी हरकत नाही म्हणजे हळूहळू देण्यासारखा प्रदेशच उरणार नाही आणि ही सर्व देशावर प्राणापलिकडे प्रेम करणारी देशांतील मंडळी आणि त्यांचे अस्तित्व त्यांच्या आक्रमकांच्या स्वाधीन होतील.
४. आत्महत्या फक्त अनुसूचीत जाती-जमातीतील किंवा बहुजन समाजातील लोकच करतात असे नाही तर उच्चशिक्षीत व उच्च समजल्या जाणाऱ्या समाजातील लोक पण करतात तथापि त्यांच्या बातमीचा उपयोग नसल्याने ती घटना उचलून धरली जात नाही.

१२ जुलै २०१६

आषाढी एकादशी ! देवशयनी एकादशी !

आषाढी एकादशी ! देवशयनी एकादशी !

आज आषाढी एकादशी ! देवशयनी एकादशी !
आज भगवान विष्णू हे आपल्या दुधाच्या सागरांत म्हणजे 'क्षीरसागरांत' 'शेषावर' शयन करतात, म्हणून ही देवशयनी एकादशी ! शेषावर शयन करणारे म्हणून भगवान विष्णूंना 'शेषशायी भगवान' या नावाने पण उल्लेखितात !
आपल्या महाराष्ट्रातील पंढरपूर हे या दिवशीच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. या दिवशी असंख्य भक्तांचा मेळा हा पांडुरंगाच्या दर्शनासाठी 'देवशयनी एकादशीच्या' निमित्ताने जमतो, की कित्येक वर्षांची समाज मेळ्याची परंपरा आम्हाला जवळ आणते ते परमेश्वराच्या निमित्ताने आणि परमेश्वराजवळ ! आपसातील भेदाभेदांचे अमंगळ टाकून देण्यासाठी ! चंद्रभागेच्या तीरावर जमतो ते या 'पंचमहाभूतांपैकी' 'आप' याची आराधना पुढील चार महिन्यांसाठी करून, त्याची कृपादृष्टी संपादन करून 'पृथ्वीशी' हितगुज करून धनधान्याची नवनिर्मिती पुढील चार महिन्यांत मनसोक्त करायला मिळावी आणि त्या आराधनेला यश मिळावे हे मागणे त्या 'पंढरपूरच्या पांडुरंगाकडे' मागणे साठी ! पावसाळ्यातील निसर्गाची, त्याच्या तांडवाची मजा अनुभवत महाराष्ट्रभर हा सोहळा अनुभवत सर्व भक्त मंडळी वेगवेगळ्या दिशेने पांडुरंगाच्या पंढरपूरकडे येत असतात.
ज्यांचे अभंग 'बापरखुमादेवीवरू' वाचल्यावर आपण ओळखतो ते 'संत ज्ञानेश्वर' यांची पालखी आळंदीहून निघते, प्रत्यक्ष पांडुरंगाला आपल्या भोळ्या भक्तिभावाने जेवायला लावणाऱ्या संत नामदेवांची पालखी निघते 'नरसी नामदेव' येथून, 'उपकारापुरता उरलेल्या संत तुकारामांची पालखी येते ती देहूहून, 'जे जे भेट भूत ते ते मानिजे भगवंत' समजणारे आणि 'गाढवामध्ये परमेश्वर पाहून त्याची तृषा 'गंगेच्या पाण्याने' शमविणारे 'संत एकनाथांची' पालखी निघते ती पैठणहून ! या सगळ्या वारकऱ्यांचा मेळा पंढरीला जमतो तो त्या पांडुरंगाला साकडे घालण्यासाठी, 'जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात' हे 'ज्ञानेश्वरीतील पसायदान' त्याच्याजवळ मागणेसाठी ! या सर्व वारकरी मंडळींना नक्कीच देवाचे द्वारी उभे राहिल्यावर 'ज्ञानदेवांचा हरिपाठ' अनुभवायला येत असेल !
दॆवाचियॆ द्वारीं उभा क्षणभरी . तॆणॆं मुक्ति चारी साधियॆल्या .. १..
हरि मुखॆं म्हणा हरि मुखॆं म्हणा . पुण्याची गणना कॊण करी .. २..
असॊनि संसारीं जिव्हॆ वॆगु करी . वॆदशास्त्र उभारी बाह्या सदा .. ३..
ज्ञानदॆव म्हणॆ व्यासाचिया खुणा . द्वारकॆचा राणा पांडवां घरीं .. ४..
कॊणाचॆं हॆं घर हा दॆह कॊणाचा . आत्माराम त्याचा तॊचि जाणॆ .. १..
मी तूं हा विचार विवॆक शॊधावा . गॊविंदा माधवा याच दॆहीं .. २..
दॆहीं ध्याता ध्यान त्रिपुटीवॆगळा . सहस्र दळीं उगवला सूर्य जैसा .. ३..
ज्ञानदॆव म्हणॆ नयनाची ज्यॊती . या नावॆं रूपॆं तुम्ही जाणा .. ४..

१५ जुलै २०१६

राजकारण

राजकारण

राणे - भाजप गुंडांचा पक्ष. भ्रष्ट, गुंडांचा मंत्रीमंडळातही समावेश.
मुख्यामंत्र्यांचे उत्तर - एक जरी गुन्हेगार मंत्री सापडला तर एक मिनिट त्याला ठेवणार नाही. पण साप - साप म्हणून भुई धोपटाल तर एकही मंत्री राजीनामा देणार नाही.
(पावसाळी अधिवेशनातील महाराष्ट्राचे मुख्यामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे आरोपांना उत्तर - संदर्भ : 'दैनिक दिव्य मराठी, दिनांक २१.७. २०१६)
मा. देवेंद्र फडणवीस धन्यवाद ! त्रिवार धन्यवाद !!! महाराष्ट्राच्या जनतेचीच नाही तर मी म्हणेल की देशाच्या जनतेचीही हीच अपेक्षा आहे ! ही जनता तुम्हा-आम्हाला दिसत नाही कारण आपण तिला पाहायला जात नाही आणि तशी आपल्याला उत्सुकताही नसते. ही जनता कोणाचीही जातपात पाहत नाही कारण तिला स्वतःची कोणतीही जात नसते. जात असते ती मुख्यमंत्र्यांना, जात असते ती विरोधी पक्षनेत्यांना, जात असते ती पक्षश्रेष्ठींना, जात असते ती आमच्या पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या पुढाऱ्यांना ! जनतेला कशाची आली आहे हो जात ? ती फक्त काम करणारा माणूस ओळखते, त्याला ठेवते आणि इतरांना नाकारते !
हीच ती जनता आहे की तिने आणीबाणीनंतर 'कै. इंदिरा गांधी' यांना अस्मान दाखविले आणि तीच जनता आहे की तिने नवीन सरकारचा निवडून आले नंतरचा किळसवाणा प्रकार पाहिल्यावर पुन्हा 'कै. इंदिरा गांधी' यांना निवडून दिले !
हीच जनता आहे की तिने माजी पंतप्रधान 'मा. अटलबिहारी वाजपेयी' यांच्या काळात आणि 'डॉ. अब्दुल कलाम' यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अणुपरीक्षण चाचणीनंतर भारतावर बड्याबड्या देशांनी घातलेल्या बहिष्काराला दाद दिली नाही आणि देशाला समर्थपणे तारून नेले !
हीच जनता आहे की मा. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतांना त्यांचेवर बेफाम आरोप होत होते, समर्थ समजल्या जाणाऱ्या देशाने त्यांच्या देशात येण्याची परवानगी त्यांना नाकारली तरी देखील तिने 'त्यांच्यातील देशभक्त व फक्त देशहिताला प्राधान्य देणारा कर्तव्यकठोर प्रशासक' पाहिल्यावर मोकळेपणाने , कसलाही आडपडदा न ठेवता अत्यंत भरभरून मते देऊन त्यांना निवडून दिले.
मा. देवेंद्र फडणवीस, तुम्ही पण हेच धोरण मनात आणि आपल्या वर्तनात सतत ठेवावे हीच जनतेची अपेक्षा आहे ! तुमच्या सत्तास्थानाला विरोधी पक्ष काय पण प्रत्यक्ष परमेश्वरही हात लावणार नाही ! तुमचे आणि प्रत्येक राज्यकर्त्याचे कर्तव्य हे 'परमेश्वरी अवतारापेक्षा' कमी नसते -
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

२१ जुलै २०१६

कृष्णामूर्थी - चेन्नईचा रिक्षावाला

कृष्णामूर्थी - चेन्नईचा रिक्षावाला

गेल्या दोन्ही वेळेस चेन्नईचा एकच रिक्षावाला मी कामासाठी फिरण्यासाठी सांगतो आहे, कृष्णमूर्ती नांव आहे त्याचे ! त्याची इच्छा मी त्याच्या रिक्षातून फिरत रहावे अशी असते; माझे येथील काम हे त्याच्या दृष्टीने दुय्यम असते अर्थात मी ज्या कामाला आलो आहे ते काम देखील मी करायला पाहिजे असेही त्याला वाटते, तो त्याचा चांगुलपणा !
काल ऐनवेळेस तिसऱ्या ठिकाणी जावून एक कागद आणायचा होता. हे आपणास ऐनवेळेस समजल्यानंतर आणि जेथे जायचे आहे, ते ठिकाण तीन किलोमीटरवर असून फक्त अर्धा तास आपल्याजवळ आहे हे समजल्यावर आणि या सर्वांना समजत असलेल्या हिंदी किंवा इंग्रजी भाषेची परिस्थिती पहाता, त्याने त्याच्या त्यावेळेला शाळेची मुले सोडायची असतांना देखील ज्या तडफेने रिक्षा हाकून मला त्या ठिकाणी नेले, याचे कौतुक निश्चितच करायला पाहिजे. तेथून तो कागद घेवून पुन्हा पहिल्या ठिकाणी पोहोचतां करायचा असल्याने तत्परतेने पुन्हा पहिल्या ठिकाणी आणून सोडणे आणि 'डोऽन्ट वरीऽऽ, कोऽल मी टेऽन मिनीऽटस् बिफोर, व्हेन यू वांऽन्ट टू रीऽटन यूवर होऽटेल' असे सांगून धीर देवून निघून गेला. संध्याकाळी परतायला बराच उशीर झाला. कुरकुर नाही. सकाळी साडेपाचला यायला सांगीतल्यावर, 'आई वीऽल बी हिऽयर, फाऽयू थर्टी अेट मोऽर्नींग' असे सांगून गेला.
सकाळी बरोबर माझा मोबाईल ५.२५ ला वाजला ! 'आय्यम हियर, रेऽडी'. रिक्षात बसलो, तो सुसाट निघाला. एका ठिकाणी थोडे थांबून, बजावून निघायचे होते ते झाले. परत विमानतळावर यायचे होते म्हटले, 'रस्त्यात काही तरी खावून घ्यावे'. मी कृष्णमूर्तीला सांगीतले. त्याने 'ओऽक्के' म्हणत संभाषण संपविले, रिक्षा सुसाट चालली. तो थांबायचे नांव घेईना. मी दोनदा प्रयत्न करून पाहिला, त्यावर 'वेऽट्ट' हे उत्तर ! मला वाटले याला बऱ्यापैकी भाडे घेवून पळायचे असेल, खाण्यापिण्यात वेळ घालवायचा नसेल. विमानतळ जवळ आल्याची खूण दिसायला लागली. शेवटी तो त्याच्या मनाने थांबला, 'हिऽयर, बेऽस्ट ईऽडलीऽऽ' ! मला उतरविले, मी त्याच्या मागोमाग एका बऱ्यापैकी हॉटेलात आलो.
त्याने त्यांच्याच भाषेत सूर लावून 'ईडलीऽऽ' आॅर्डर दिली. मग त्याला जाणवले, वडा देखील हवाच ! पुन्हा तसाच सूर लावून 'वऽडा' सांगीतले. माझ्यासमोर इडली, सांबार, वडा आणि दोन प्रकारच्या चटण्या आल्या ! त्यांची चव घेतल्यावर मग मला कृष्णमूर्तीच्या 'वेऽट्टऽ' चे रहस्य उमगले !
आजपर्यंत मला आवडलेला वडा-इडली-सांबार हा लातूर बसस्टँडच्या बाहेर आल्यावर थोडे बाहेर गेल्यावर एका हातगाडीवरचा होता. त्यानंतर त्याच्याशी समर्थ स्पर्धा करून ती जिंकली बासर येथील सरस्वती मंदीराच्या आवारातील एका हॉटेलने ज्याने केळीच्या पानावर हे पदार्थ वाढले होते. पण आज सकाळी या कृष्णमूर्तीने मला जेथे कोठे नेले ते ठिकाण आता बासर येथील हॉटेलच्या ज़बरदस्त स्पर्धेत आले आहे. मला तर वाटते हे काकणभर सरसच आहे ! मला घाई होती म्हणून मी निघालो, एवढेच सांगतो !

३१ जुलै २०१६