Sunday, May 10, 2020

सिटीझनशिप ॲक्टमधील तरतुदींचा आणि देशाच्या सुरक्षिततेचा विचार करून मा. सर्वोच्च न्यायालय आणि भारतातील मा. उच्च न्यायालयांनी याविषयी वेळोवेळी विविध निवाडे दिले आहेत.
आपण सर्व वेगवेगळ्या विचारधारेचे असलो, तरी भारतीय संविधान मानत आहात, असे मी मानतो. जी मंडळी कोणी भारतीय संविधान मानतच नसतील, अशांसाठी हे लिहीलेले नाही, त्यांची जागा भारतात आहे हे म्हणणे मग, केवळ धाडसासेच नाही तर बेकायदेशीर आहे.
आपल्या भारतातील ही सर्व न्यायालये भारतीय संविधानानुसारच स्थापन झालेली असून, त्यांनी दिलेला निर्णय आपल्यापैकी कोणाच्याही विचारधारेप्रमाणे नसला, त्याच्याविरूद्ध असला, कदाचित आपले विचार चुकीचे ठरवत असला, तरी मान्य करून पाळणे भाग आहे. त्याबद्दल आपल्याला वाईट वाटणे स्वाभाविक आहे, तथापि तरीदेखील या देशाचा नागरिक आणि कायद्याचे, न्याययंत्रणेने दिलेल्या निर्णयाचे पालन करणे, त्याचे समर्थन करून अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे.
ना. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यांपैकी काही निवाडे खाली देतो आहे. आशा आहे, आपण ते वाचून मनन केले, तर आपल्याला समजतील.
1. Abdul Kuddus Vs Union of India
2. Kamalakhya Dey Vs Union of India
3. Rupajan Begum Vs Union of India
4. Committee for C. R. of C.A.P. Vs State of Arunachal Pradesh
5. Assam Samilita Vs Union of India
काल श्री. सुनील तांबे यांच्या पोस्टवरील वाचून प्रतिक्रिया दिली. तिथं काहींच्या प्रतिक्रिया वाचल्या आणि मला माझ्या शिक्षकांनी मी शाळेत शिकत असतांना विचारलेला, एक प्रश्न आठवला.
दारू पिणे वाईट आहे, म्हणून पिऊ नको, हे कोणाला सांगावे ? —- जो पीत नाही त्याला.

28.12.2019
नुकताच, ‘बोराडेंचे बोल आणि हुल्लडबाजांच्या टोळ्या’ हा श्री. प्रवीण बर्दापूरकर यांचा लेख वाचला.
त्यात वास्तव सांगीतलेले आहे, दोघांनीही ! जेष्ठ साहित्यिक श्री. रावसाहेब बोराडे यांनी, तसेच प्रसिद्ध लेखक व पत्रकार श्री. प्रवीण बर्दापूरकर यांनी ! हे जरी असलं, तरी आपला समाज व समाजातील व्यक्ती, आता इतक्या काही घाणेरड्या वळणावर आणि टोकदार कड्यावर पोहोचलेल्या आहेत, की बोलणारा लाजतो, की हे कसे काय चारचौघात बोलणार ? लिहीणारा संकोचतो, की हे लिहीणे उचित होणार नाही, जरी वास्तव असले तरी ! मात्र हे कार्य करणारे काही लाजत नाही. निर्लज्जपणाच्या कळसावर आहोत आपण, का अजून पण पुढे काही आहे, परमेश्वर जाणे !
आपण सध्या काय बघत नाही ? जातीपातीच्या माध्यमातून कोणाला नोकऱ्या मिळविता येतात किंवा कोणाच्यातरी हिसकाविता येतात, राजकारण हवे तसे करता येते आणि हव्या त्या अपेक्षित व्यक्ती निवडता येतात व काहींच्या राजकारणातील त्यांना मिळालेल्या संधी घालवता येतात, त्याचे आयुष्य संपवतां येते, त्याला नेस्तनाबूत करता येते. हे सर्व काळजीपूर्वक बघतो.
आपण विविध ठिकाणी टोळ्यांचा उपयोग करून ‘समजावतो आहे’ या भावनेने, हवा तसा ‘इतिहास सांगून’ वेगळा इतिहास ‘घडवत’ समाजाची आपल्या ‘सर्व प्रकारच्या सामर्थ्याने’ दिशाभूल करतो. वेळप्रसंगी दहशतीने आपले व्यवस्थीत बस्तान बसवितो. सर्वसामान्यांच्या अगतिकतेचा, गरिबीचा, अज्ञानाचा आणि कोणत्यातरी गटात असल्याने त्यांना वाटणाऱ्या सुरक्षिततेच्या भावनेने, त्यांचा पाठिंबा मिळवतो. प्रसंगी दडपशाहीचा वापर करून, लोकशाहीने सत्ता प्रस्थापित करता येते, हा धडा घालून देतो. ----- त्यातीलच हा एक भाग, 'साहित्यिक' पण बनता येते यामार्गाने !
आम्हाला शाळेत असतांना मराठीच्या पुस्तकांत, विविध लेखकांचे धडे, कविता असायच्या. त्यांचा थोडक्यात परिचय धडा वा कविता सुरु होण्यापूर्वीच्या परिच्छेदात दिलेला असायचा. त्यांत एक वाक्य बऱ्याच वेळा असायचे, ते म्हणजे 'हे अमुक ठिकाणी भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते'. आश्चर्य हे की ही मंडळी साहित्यिक आहेत, लिखाण करतात हे त्यांचा तो धडा किंवा कविता वाचण्याच्या पूर्वीच आम्हाला माहीत असायचे. त्यांच्याबद्दल ही जास्तीची माहिती असायची. त्यामुळे आमचे काही अडत नसे, कारण कोणी लेखक-कवींची नांवे विचारली तर आम्हाला त्यांची नांवे माहीत असायची.
संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत नामदेव, संत तुकाराम, संत निळोबा, संत चोखोबा, संत एकनाथ वगैरे संत मंडळी तर, त्यांचा असा काही परिचय नसून पण, आमच्या मनांत ठाण मांडून बसलेली होती.
मात्र अलिकडील काही साहित्य संमेलनाध्यक्षांची नांवे वाचली, आणि आपले मराठी वाचन, आता आपल्या शालेय काळाएवढे देखील राहीलेले नाही, याची कल्पना आली. काळजी वाटली, का वाईट वाटले, ते सांगत नाही. वास्तविक अलिकडच्या काळातील ज्यांची नांवे माहिती होती, ती काही इथं कुठे विशेषत्वाने दिसत नव्हती. ही जाणीव माते फारच वाईट वाटायला लावणारी होती. ------------- आपला लेख वाचला आणि दिलासा मिळाला मनाला ! आपले मराठी वाचन, इतके काही अजूनही वाईट नाही, याचे समाधान वाटले.
टीप - मा. रा. रं. बोराडे, आणि आपले नांव, मला शालेय वयापासून माहीत आहे.
© ॲड. माधव भोकरीकर

19.1.2020
कोणत्याही प्रोफेशनचा बिझिनेस होण्यामागील एक कारण - पूर्वी लबाडीचे अनुभव कमी होते, तोपर्यंत ‘प्रोफेशन’ होता. लबाडीचे अनुभव वाढले, अगदी परवडेनासे झाले, प्रोफेशनचा ‘बिझिनेस’ झाला !
22.1.2020


एखादा क्षण वा घटना, आपल्या गतकाळातील आठवणींची सूत्रात ओवलेली माळ ओघळवायला पुरेसा असतो. एकदा का ते आठवणी बांधून ठेवणारे सूत्र तुटले, की आठवणी भराभर सांडायला कितीसा उशीर ? त्या माळेतील मोती ओघळायला लागले, की मग एरवी एकत्र गुंफलेल्या आठवणींचे मोती, विखरून घरभर सैरावेरा धावायला लागतात ! ते वेचून पुन्हा त्यांची माळ बनवणे महाकर्मकठीण ! कितीही काळजीपूर्वक शोधले, आणि गुंफायचे ठरविले, तरी दोनचार चुकार आठवणींचे मोती, सापडत नाही. दडून बसतात कुठेतरी मनाच्या घरातील कोपऱ्यात ! ते पुरेसे असतात, आपल्या डोळ्यातून पाणी काढायला !

© ॲड. माधव भोकरीकर

19.1.2020

आपल्या सासरची मंडळी अखंड आपले कौतुक न करता, आपल्या नवऱ्याचेच कौतुक, न थकता करत असतील, तरी वाईट वाटून घेऊ नये, अथवा रागावू नये ! —-अर्धांगिनी असल्याने, अर्धे कौतुक आपलेच आहे, हे गृहीत धरावे
17.1.2020

आपण शपथ किती वेळा घेतो -
१. विवाहाचे वेळी शपथ घेतली जाते, तो योग बहुदा सर्वांनाच येतो.
२. न्यायालयातील साक्षीस गेलो, तर घ्यावी लागते. हा योग क्वचितच !
आमदार, खासदार, मंत्रीपदाची संधी मिळाली तर शपथ घ्यावी लागते, ती संविधानात सांगीतल्याप्रमाणे ! — शपथ घेतल्यानंतर ती पाळायची पण असते, हे किती जणांच्या लक्षात रहाते ?
अजून एक सुंदर आठवण झाली, श्री. मंगेश वाघमारे यांची पोस्ट वाचल्यावर ! आम्हाला इयत्ता सहावीला मराठीत धडा होता, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा बहुदा - ‘शपथ घ्या, शपथ घ्या’ या नांवाने धडा होता. लोकमान्य टिळकांना अटक झाल्याने, भावना अनावर झालेल्या शिक्षकाच्या मनस्थितीचे वर्णन आहे त्यांत ! हा धडा नेहमीप्रमाणेच आमचे मराठीचे शिक्षक श्री. एस्. आर. कुलकर्णी (ज्यु) यांनी अप्रतिम शिकवला होता.

4.1.2020

सत्य हे माणसाला डोळस बनवते. त्याची दृष्टी अधू असेल, तर झणझणीत अंजनाचे काम करत, त्यांस लख्ख दृष्टीदान करते. मात्र लख्ख दृष्टी मिळाल्यानंतर, जे काही दिसेल, ते सोसायची तयारी हवी; अन्यथा ‘अज्ञानात सुख’ असे वाटायला नको.

ऐपत असेल तर सर्व विकत घेता येतं, पण नाण्याचा खणखणीतपणा नाही घेता येत. कोणत्याही जमीनीवर खण्णकन आवाज करत वाजणारी नाणी कमी झाली आहेत. अलिकडे चकचकीत, चमचमणाऱ्यांचा ‘बद्द’ असाच आवाज येतो.


अलिकडच्या मनस्ताप देणाऱ्या घटना बघीतल्या, विशेषत: जनतेला भेटीचे औदार्य पण न दाखवणारे राज्यकर्ते बघीतले, की कित्येक विचार मनांत येतात. फार थोडे मांडतां येतात.
पूर्वजांच्या पुण्याईची फळे सर्वांनाच मिळतात असे नाही, काहींच्या वाट्याला अजूनही काटेच येतात. पांडवांचा वनवास बारा वर्षांनी व वर्षाच्या अज्ञातवासाने, प्रभू रामचंद्रांचा वनवास चौदा वर्षांनी संपतो. हे सर्व अवतारी पुरूष !
राणा प्रताप यासारख्या रणधुरंधराचा वनवास मरेपर्यंत संपला नाही, शेवटपर्यंत आपल्या चितोडच्या स्वातंत्र्यासाठी झगडणारा स्वातंत्र्यवीर गवताच्या गादीवर झोपताझोपता स्वर्गवासी झाला !

काहींचा वनवास त्यांच्या मृत्युनंतर संपतो, त्यांच्या योगदानाची जाणीव कृतज्ञतेने ठेवली जाते. काही दुर्दैवी जीवांचा वनवास, मात्र त्यांच्या मृत्युनंतर पण संपत नाही.
या ऐतिहासिक पुरूषांची, भल्याभल्यांची ही अवस्था तुम्हीआम्ही केली, तर अलिकडचेच असलेल्या तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा ? —- शिंतोडे उडवायला काय जाते आमचे ! गंगोदकाचे काय आणि गटारीच्या पाण्याचे काय ? आमची जशी लायकी ते पाणी आम्हाला आवडेल !
4.1.2020

लग्न ठरवतांना, शक्यतोवर मुलाकडे मुलीकडची मंडळी जातात, कार्यक्रमाला ! पूर्वी पंचक्रोशीतील मुलगी असायची, ओळखीपाळखीतील असायची, कोणाच्यातरी नात्यागोत्यातील पण असायची, अपरिचित किंवा त्रयस्थपणा कमी असायचा, त्यामुळे नवीन नातं लवकर जोडले जायचे. आता वधूवर वेगवेगळ्या गांवातील असतात, बऱ्याच वेळा दूरचे असले, पूर्वपरिचय नसला तर कोणाबद्दल विशेष माहिती नसते. त्यामुळे वधूवरसूचक मंडळे निघालीत. त्यांच्याकडून काहीतरी समजते.
दूरदूरवरून दुसरीकडे जायचे म्हटले, तरी पैसा आणि वेळ खर्च होणारच ! नंतर त्यातून निष्पन्न काय होईल, ते पण अनिश्चितच ! त्यामुळे आपण जागेवरून न हलता, समोरचा पाहुणा फक्त कार्यक्रमापुरताच आपल्याकडे कसा येईल, हे बघीतले जाऊ लागले. ही युक्ती दोन्हीबाजूने होऊ लागली. मुलाकडचे ‘मुलाला वेळ नसून, रजा मिळत नाही. पद्धतीनुसार मुलीला घेऊन या. घर पहाणे होईल.’ अशा स्वरुपाची कारणे सांगायची, आणि मुलीकडे जायला टाळायची. मुलीकडची ‘मुलाकडे कार्यक्रम व्हायची पद्धत जुनी झाली आहे. मुलीला ठिकठिकाणी मिरवायचे ते बरोबर दिसत नाही.’ वगैरे सांगू लागली. इथपर्यंत ठीक होते, पण एकदा जायचे नाही, म्हटल्यावर काहीही कारणे पुढे येऊ लागली.
एकदा शेजाऱ्यांच्या मुलीला स्थळ आले होते. मुलगी खान्देशची, तर स्थळ दूरचे, पाचशे किलोमीटरवरचे ! त्यावेळचे संभाषण कानावर पडले, तसे देतो.
मुलीकडचे - तुम्ही रात्री तेथून बसले, की सकाळी इथं आरामात याल. मुलीला तिकडे घेऊन यायचे, म्हणजे उतरायचे तर तिकडे कोणी नातेवाईक, स्नेही नाही. लाॅजमधे रहायचे, त्यापेक्षा तुम्ही या. तुमचे नातेवाईक, स्नेही तरी आहेत इकडे !
मुलाकडचे - ते ठीक आहे. पण कोणाकडे कशाला जायचे ? इथून तुमचे ठिकाण फार लांब आहे. जमणे कठीण आहे, तुम्हीच या !
मुलीकडचे - पहा बुवा, आम्ही मुलीकडचे आहे, हे ठीक आहे ! पण इकडून तिकडे आणि तिकडून इकडे, अंतर तर सारखेच ना ?
मुलाकडचे - पण लांब आहे फार !
मुलीकडचे - आम्हाला पण तितकेच लांब आहे.
या अशा संवादातून काय साधते ?
1.1.2020

एखाद्याने नेहमीप्रमाणेच सध्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरूद्ध तर्कटी पोस्ट केल्यावर, त्यांत कायद्याच्या विचार केल्यावर, पोस्टकर्त्याचे म्हणणे चुकीचे असल्याने माझेकडून अनावधानाने प्रतिक्रिया सहजपणे दिली गेली. त्यांतील कायद्यानुसार चुकीचे काय, ते मी सांगीतले. वास्तविक मोफत सल्ला द्यायला नको, त्याची किंमत नसते, हे मी त्या क्षणी विसरलो.
थोड्या वेळांत त्यांवर बाकी कसलाही विचार न करता, आपण सर्वज्ञानी असल्याच्या आवेशांत, एकाने मला सरकारच्या बाजूने असल्याचे समजून, मला माझ्या कायदेशीरपणात, बेकायदेशीरपणा भासवत, पोस्टकर्त्याला माझ्या नादी लागू नये, म्हणून ‘तर्कशुद्ध’ सल्ला दिला.
मला ती प्रतिक्रिया वाचल्यावर कुतूहल, की एवढा तत्वचिंतक पण बेकायदेशीर सल्ला कोणी दिला, म्हणून बघीतले, तर काय, —- ती व्यक्ती इथे माझ्या मित्रांच्या यादीत नव्हती. इतके बरे वाटले म्हणून सांगतो ! अलिकडे कशावर समाधान वाटेल, ते सांगता येत नाही !
नाही त्या वाटेला सूज्ञ माणसाने जाऊ नये, हा सल्ला जुनीजाणती मंडळी देतात, ते उगीच नाही.
30.12.2019

सत्य पचायला कायम जड असते. ज्यांचा कोठा हलका असतो, ते सत्याच्या वाटेला गेले, की त्यांना ढाळ व्हायला लागतात.
27.12.209

अष्टपैलू व्यक्तीमत्व - आर. बी. जोशी सर !

अष्टपैलू व्यक्तीमत्व - आर. बी. जोशी सर !
माझे गांव रावेर ! तसे छोटे गांव, माझ्या बालपणी, शालेय काळांत तर अजूनच लहान ! आपले गांव लहान असले, की जसे तोटे असतात, तसे बरेच फायदे पण असतात. तोटे म्हणजे, तुम्ही किंवा तुमची कामगिरी, कृत्य फार काळ कोणापासून लपून रहात नाही, त्याची फळे लगेच तुम्हाला मिळतात. मग फायदा म्हणाल, तर हीच गोष्ट तुमच्यासाठी फायद्याची ठरते. किरकोळ गोष्टी पण तुमचे संबंध, आयुष्यासाठी पक्के करतात.
मी बऱ्यावेळा प्रभाकरकाकांकडे, माझ्या वडिलांसोबत जायचो. तिथं आमचा वावर हा, त्यांच्या घरात ‘आसेतुहिमाचल’ असा असायचा. प्रभाकरकाका, म्हणजे डाॅ. प्रभाकर आठवले, माझ्या वडिलांचे बालपणापासूनचे मित्र ! तिथं पहिल्यांदा मी त्यांना, जोशी सरांना बघीतलं, नंतर पण मला, बऱ्याचवेळा ते तिथं दिसायचे. वडिलांना घरी परत जातांना, ‘ते कोण ?’ विचारल्यावर, ‘ते रामभाऊ जोशी सर ! आपल्या शाळेत आहेत. मात्र त्यांना काका म्हणायचं !’. त्यावेळी मराठी चौथीत असावा मी, पुढच्या वर्षी पाचवीत, मग कदाचित हायस्कूलमधे जायला मिळेल, हा अंदाज !
सरदार जी. जी. हायस्कूलमधे मी पाचवीमधे गेलो, तसा प्रवेश घेतला. उन्हाळ्याच्या सुटीनंतर शाळा नुकतीच सुरू झाली असली, की वर्गात आणि मैदानावर होणाऱ्या तासांचा, जो अविस्मरणीय गोंधळ सुरू असायचा, त्याला त्यावेळी अजिबात तोड नसायची, कदाचित आज पण तोड नसावी. आपल्याला वाटते, की वर्गात कोणीतरी शिकवायला येईल, म्हणून आपण काहीतरी पुस्तक काढून तयार असावे, तोच ‘एका रांगेत शांततेने नीट ग्राउंडवर चलायची’ सूचना आलेली असायची. ही वेळापत्रकाप्रमाणे नियमीत तास होण्याच्या सुरुवातीची अवस्था असायची, त्यामुळे वेळापत्रक हे फक्त शिक्षकांनाच माहीत असायचे, विद्यार्थ्यांना नाही. तसे बघीतले, तर आम्हाला एका पिशवीत त्या वर्षाची, सर्व वह्या आणि पुस्तके शाळेत नेण्याची रोजची सवय असल्याने, येणाऱ्या शिक्षकांनी कोणतेही पुस्तक सांगीतले, तरी आम्ही ते काढत असू. वह्यांचा अंदाज मात्र काही वेळा चुकत असे. त्यांवर आमचा उपाय ठरलेला होता. सर्वसमावेशक अशी ‘रफ वही’ त्याचवेळी कामास यायची. ज्या विषयाची वही आणलेली नसायची, त्यासाठी ही ‘रफ वही’ !
‘मोठ्या वर्गांना चांगले सर असतात, आपल्याला नाही’, असा भेदभाव का करतात, याचे कारण मला नेमके शाळेत असेपावेतो तरी समजले नाही. दीक्षित सर, जोशी सर, बोरोले सर, पुराणिक सर, भोकरीकर सर, पाटील सर, वानखेडे सर, वाणी सर, लोहार सर, जमादार सर, पितळे बाई वगैरे सर्व मंडळी आम्हाला का नको ? त्यांना वरच्या वर्गावरच का ? मात्र आमचे शालेय जीवन संपल्यावर लक्षात आले, तसं काही नसतं ! सर्वच शिक्षक चांगले असतात, जे आपल्याला शिकवत नसतात, त्यांची आपल्याला उत्सुकता असते.
माझी नववीपर्यंत तर सकाळचीच शाळा होती, दहावी व नंतरच्या वर्गाची शाळा दुपारून असायची. पाचवीत त्या शाळेत गेलेला मी, बघताबघता दहावीला गेलो. माझा दहावी, ‘अ’ चा वर्ग ! रोज दुपारी अकरा साडेअकराला शाळेत जायला निघायचो, तर मग मात्र शाळेत जातांना, सर शाळेच्या रस्त्यावर दिसायचे !
हो, आर. बी. जोशी सर ! अगदी गोरापान वर्ण, सरळ व धारदार नाक, अगदी घारे डोळे, गोलसर चेहरा ! नाक वर ओढतांना जिवणी डाव्याउजव्या, अशा दोन्ही बाजूला नेत नाक वर ओढण्याची लकब ! ओठ कायम घट्ट बंद केलेले पण काहीतरी बोलायला उत्सुक असलेले वाटतील, अशी ठेवण ! बेताची उंची, ढगळढगळ पॅंट, बहुदा काळसर वा करड्या रंगाची, क्वचित शेवाळ्या रंगाची पण ! शक्यतोवर पांढरा शर्ट, त्यांची पहिली गुंडी बहुदा लावलेली नसायची, आणि शर्टची निम्मी काॅलर मानेवर बरोबर उभी असलेली, आणि निम्मी काॅलरच्या नेहेमीच्या ठिकाणी ! शर्टच्या डाव्या खिशात दोन-तीन पेन व छोटी डायरी ! हे आपण त्यांना समोरून बघीतले तर क्षणांत लक्षात येईल, असे व्यक्तीमत्व ! हातात बहुतेक कडुलिंबाची लवचिक, आपल्या पेराएवढी जाड हिरवीगार आणि दीडहात भरेल, अशी काडी ! आणि छोटीछोटी पावले टाकत, चालण्याची सवय ! हे पाठमोरे बघीतले, तरी लक्षात येईल, अशी ठेवण !
मी दहावीला गेलो, तसे ते एकदा वर्गावर आले. हातात इंग्रजीचे पुस्तक ! आम्हाला आश्चर्यच वाटले, बराच वेळ ग्राउंडवरच दिसणाऱ्या सरांच्या हातात इंग्रजीचे पुस्तक ! त्यांनी शिकवायला सुरूवात केली, ती म्हणजे अवांतर गप्पांनी, इंग्रजी भाषा कशी सुधरवता येतील, या दृष्टीने ! त्यांनी आम्हाला इंग्रजीतला दुसरा धडा, ‘Rubber’ यांवरचा होता. इंग्रजी पण इतक्या सोप्या पद्धतीने शिकवता येते, हे समजले. ते आम्हाला, जवळपास दोन महिनेच जेमतेम असतील, नंतर पुराणिक सर आले. विद्यार्थ्यांना विषय सोप्या पद्धतीने शिकवणे, हे सोपे अजिबात नाही; हे आज पण एखादा युक्तीवाद करतांना लक्षात येते.
जोशी सर, विद्यार्थ्यांत जास्त रमत, ते ग्राउंडवरच ! ते शारिरिक शिक्षण का एन् डी एस् आम्हाला शिकवायचे. एन् डी एस् चा अर्थ मला अजून समजला नाही. मात्र हा तास असला, की शाळेच्या भल्यामोठ्या मैदानावर जायचे. काही वेळा सायन्स हाॅलच्या शेजारच्या छोट्या खोलीतून, लाकडी डंबेल्स, लेझीम यांची पोती ग्राउंडवर न्यावी लागत. ती न्यायला दोन जण लागायचे, पण तयार मात्र प्रत्येक जण असायचा. ग्राउंडवर मग कवायत शिकवायचे, त्याचे वेगवेगळे हात ! डंबेल्सचे वेगवेगळे हात, लेझीमचे विविध हात त्यांनी शिकवायचे ! क्रिकेटची बॅट हातात कशी धरायची, आणि तशीच का धरायची ? फटक्यांचे विविध प्रकार - कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, लेट कट, फ्लिक, वगैरे प्रकार शिकवले. क्रिकेट बाॅलवर फिरकी गोलंदाजी करतांना पकड कशी असते, आणि जलद गोलंदाजी करतांना पकड कशी असते ? बोटांची ठेवण, फेकण्याची पध्दत कशी असावी ? बेसबाॅल कसा खेळायचा, त्याचे नियम ! लांब उडी, उंच उडी ! किती वेळात किती अंतर पळायला हवे ! शाळेच्या ग्राउंडवरील माझ्या पाचवीच्या वर्गाला लागून तीन कडूलिंबाची झाडे होती, त्या झाडाचे खोड जरा बसता येईल असे होते. त्या खोडावर बसून जोशी सरांनी आम्हाला कित्येक वेळा बैठ्या व मैदानावरील विविध खेळाच्या गोष्टी सांगीतल्याचे प्रसंग अजून डोळ्यांसमोर येतात. हे सर्व ऐकल्यावर, खेळल्यावर अंगात वेगळाच उत्साह आणि हलकेपणा यायचा !
आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, म्हणजे २६ जानेवारीला आमच्या शाळेच्या मैदानावर मोठी परेड व्हायची. पोलीस, गृहरक्षक दल, स्काउट व गाईड, एन् सी सी चे विद्यार्थी, आमच्या दोन्ही शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची कवायत ! तहसीलदार, फौजदार, स्वातंत्र्य सैनिक, गांवातील प्रतिष्ठित मंडळी देखील यायची, हे बघायला उत्साहाने ! ही गर्दी असायची बघायला ! त्यावेळी सर्व नियंत्रण असायचे ते या ग्राउंडवर काम करत असलेल्या शिक्षकांचे ! त्यांत कोल्हे सर, बोरोले सर, व्ही. ई. पाटील सर आणि आमचे जोशी सर ! ग्राउंडची साफसफाई, त्यांवर पाणी टाकून धूळ उडणार नाही, असे बघणे. चुन्याच्या भुकटीने बरोबर सुती दोरीच्या रेषेत खुणा करून, कोण कुठे बसणार याचे विभाग करणे ! खूप तयारी असायची.
काही असो, त्यांच्या हातातील काडी, त्यांची खूण बनली असेल, ओळख बनली असेल पण, त्यांच्या हातात असलेली पेरभर जाड, अशी हिरवीगार कडुलिंबाची काडी, कधी कोणाच्या अंगावर लालतांबडे वळ उमटण्यास कारणीभूत झालेली, मी बघीतली नाही. विद्यार्थ्यांशी त्यांचे संबंध अगदी मित्रत्वाचे ! खेळासंबंधाने त्यांना काहीही विचारा, हवी ती माहिती मिळणार ! या खेळामुळे, त्यांच्यातील भाषेचा शिक्षक दबला असावा, असे आता उगीच मला वाटते.
दहावीला बोर्डाच्या परिक्षेला फाॅर्म भरायचा होता, त्यावेळी वानखेडे सर आणि जोशी सर आम्हा सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वरच्या मजल्यावर मोठ्या वर्गात घेऊन गेले. तिथं गेल्यावर परिक्षेचा फाॅर्म कसा भरायचा, हे त्यांनी अगदी तपशीलवार सांगीतले, स्पेलिंगसहीत ! बोर्डावर वळणदार अक्षरांत लिहून ! आपल्या विद्यार्थ्याला कोणत्याही कारणांमुळे संकट येऊ नये, याची पुरेपूर काळजी शाळा व त्यांतील शिक्षक घेत असत. असं काही आठवलं, की आज पण बोट धरून लहानग्याला चालायला शिकवणारी आई आठवते.
मी अकरावीला गेल्यावर आम्ही गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही जणांनी ‘हंगर स्ट्राईक’ नांवाची एकांकिका बसवली. त्यावेळी मात्र आम्ही सर्व जण जमायचो, ते जोशी सरांच्या घरी, मठाजवळ, विखे चौकात ! तिथं घरासारखे वातावरण, काकू घरातले काम करत, आमचे काम ऐकत असायच्या ! त्यांची मुले म्हणजे आमच्याच शाळेत, आमच्यापेक्षा मोठी ! शाळेत होणारे नाटक, त्याची तयारी घरात चालली आहे, हे कोणत्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवडणार नाही ? त्यांनी नाटकांतील वाक्य कसे उच्चारावे, त्यांतील भाव कोणता, तो कसा व्यक्त करायचा, व्यवस्थित सांगीतले. करून पण दाखवायचे. या आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली बसवलेल्या एकांकिकेचे प्रयोग गणेशोत्सवाच्या निमीत्त गांवात पण इतरत्र केले.
आमच्या शाळेत नाट्यवेडे आणि काम करण्याची हुन्नर असणारे, दोन शिक्षक ! एक म्हणजे, बालाजीवाले सर आणि दुसरे आर. बी. जोशी सर ! गांवात सांस्कृतिक वातावरण निर्माण व्हावे, टिकावे आणि वाढावे यासाठी, आवर्जून प्रयत्न करणारी जी मंडळी होती, त्यांत जोशी सर होते. संगीताची आवड, हा अजून एक गुण त्यांच्यात होता. आमच्या घराच्या मागे नाल्यावरील, बालवाडीत बहुदा ‘देव नाही देव्हाऱ्यात’, तसेच नंतर ‘अमृतवेल’ या नाटकाची तालीम चालत असायची. त्या नाटकाचा प्रयोग या सर्व मंडळींनी, उत्साहाने गांवात केला. मला जसं आठवते, तसेच ‘साष्टांग नमस्कार’ हे आचार्य अत्रे यांचे नाटक त्यांनी बसवले होते, त्याचा गांवात प्रयोग केला होता. रावेर सारख्या छोट्या गांवात, काही उत्साही मंडळी असतात, आपल्या त्यावेळच्या तुटपुंज्या पगारात, जेमतेम असलेल्या उत्पन्नात हे सांस्कृतिक वातावरण जपतात, जिवंत ठेवतात, ही फार मोलाची गोष्ट आहे. आज आपल्याला विशेष वाटणार नाही, मात्र संपूर्ण गांवातील टेलिफोन धारकांची यादी वहीच्या एका पानावर संपायची ! कोणाला निरोप द्यायचा असेल गांवात, तर त्याच्या प्रत्यक्ष घरीच जाऊन निरोप द्यावा लागे, त्यावेळची ही गोष्ट आहे.
मध्यंतरी वडील गेल्यानंतर, माझी आई माझेजवळ औरंगाबादला होती. ‘मी मित्राच्या लग्नाला पुण्याला गेलो होतो, त्यावेळी श्री. किशोर जोशी भेटले होते’, हे सांगीतले. तिच्या लक्षात येईना, मग ‘जोशी सरांचा मुलगा’ हे सांगीतल्यावर लक्षात आले.
‘पहा, त्याची आई कमलाबाई आणि मी, मडकेताई समितीच्या कार्यक्रमाला नेहमी असायचो. कशी आहे रे, तब्येत त्यांची ? कशी असणार, माझ्यासारखीच असणार !’ आईच्या आठवणी सुरू झाल्या. माझी आणि काकूंची भेट झाली नाही, पण किशोर जोशी, त्यांच्या मुलाची मात्र झाली.
‘मला पण घेऊन चल एकदा ! बरीच जण गांव सोडल्यापासून भेटलीच नाही बघ ! भेटावे वाटते. तब्येतीने हिंमत होत नाही.’ आई बोलत होती.
आता जोशी सर पण नाही आणि जोशी काकू पण नाही. त्यांनी रावेर सोडल्यावर त्यांची भेट झालीच नाही. अधूनमधून बातमी समजायची, ती डाॅ. राजेंद्र आठवले यांच्याकडून ! मला पण गांव सोडून बरीच वर्षे झालीत, तरी काही आठवणी येत रहातात. आज संध्याकाळी बातम्या ऐकत होतो. त्यात परवाच्या ‘प्रजासत्ताक दिनाची तयारी’ वगैरे बातमी होती. बातमी ऐकली, मन थेट मागे गेले, सन १९७७-७८ सालात ! काही तरी आठवलं आणि लिहीत बसलो ! — एक मात्र बरं वाटते, आशादायक वाटते, आमची पिढी म्हणजे पुढची पिढी, हे गांवातील नाते अजून जपतेय, पूर्वीसारखेच ! यापुढचं आपण काय सांगणार ?
© ॲड. माधव भोकरीकर
(जोशी सर आणि जोशी काकूंचा फोटो - सरांचे चिरंजीव श्री. किशोर जोशी यांचेकडून मिळाला)

24.1.2020

Image may contain: 2 people
आताच श्री. विद्याधर जोशी यांची त्यांच्या विद्यार्थ्याबद्दल , अथर्व कुलकर्णीबद्दलची पोस्ट वाचली. मला माझे शालेय आणि महाविदयालयीन काळातील, खूप शिक्षक डोळ्यांपुढे आले.
मुलगा जेव्हा छोटा असतो, तेव्हापासून त्याच्या डोळ्यांसमोर त्याचे आदर्श असतात. त्या आदर्शासारखे वागण्याचा त्याचा प्रयत्न असतो. बालवयांत त्याचे आदर्श आई-वडील, आजी-आजोबा व घरातील माणसे असतात. त्यांचे ऐकायचे, त्यांच्यासारखे वागायचा त्याचा प्रयत्न असतो. त्यांनी, त्यांचे काही काम केल्यावर शाबासकी दिली, की ब्रह्मानंद होतो. त्यांना कोणी वाईट म्हटले, की हा त्यांच्याशी त्याच्या कुवतीप्रमाणे भांडतो, मोठ्याने भोकाड पसरतो किंवा कट्टी घेतो. मग याची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, की आपला विजय झाल्याच्या आनंदात, कट्टीची बट्टी किंवा बो होते.
त्यानंतर हा शाळेत गेल्यावर तेथील शिक्षक, शिक्षिकांच्या वागण्याचा परिणाम याच्यावर होतो. त्यांचे वर्तन शिकवणे चांगले असेल, तर याला चांगले वळण लागण्याची शक्यता वाढते, अन्यथा चुकीची दिशा पण तो पकडू शकतो. शाळेत गेल्यावर केवळ शिक्षक वा शिक्षिका यांचाच विद्यार्थ्यांवर परिणाम होतो, असे नाही; तर तेथील कारकून, शिपाई, त्यांच्यासोबत असणारे विद्यार्थी यांच्या पण वागण्याचा परिणाम होत असतो. इतकेच नाही, तर शाळेबाहेर असलेले दुकानदार जिथे हा अधूनमधून का होईना, पण जात असेल, त्यांचा पण परिणाम त्याच्यावर होतो. ओल्या मातीच्या गोळ्यासारखी याची अवस्था असते, त्यातून तुम्ही पणती बनवू शकतात वा माठ बनवू शकतात.
शालेय शिक्षण संपवून, हा महाविद्यालयांत गेला, की याच्यावर बऱ्यापैकी संस्कार झाले असल्याने, तुलनेने नंतर कमी बदल होतो; मात्र या वयापर्यंत त्याला अनुभव आल्याने, भल्याबुऱ्याची थोडीफार समज आली असते. त्यामुळे त्याला अगोदरच्या चुका त्याच्या लक्षात आणून दिल्या, त्या त्याला समजल्या, तर त्यात तो बऱ्यापैकी सुधारणा पण करू शकतो.
मी नूतन मराठा काॅलेजला बी. काॅम. केले. तेथील प्राचार्य डाॅ. सोनवणे, प्रा. वाघ, प्रा. एस्. वाय्. पाटील, प्रा. सौ. शकुंतला साळुंके, प्रा. भावसार, प्रा. बी. बी. देशमुख, प्रा. लाहोटी अगदी यांचाच नाही, तर सर्वांचाच माझ्यावर लोभ होता. कोणाच्याही नांवावर अभ्यासाचे पुस्तक घ्यायला मला नेहमीच परवानगी असायची. काॅलेजमधील स्टाॅफकडून पण नेहमी सहकार्यच असायचे. कोणत्याही स्पर्धेसाठी, विशेषत: वक्तृत्व वा वादविवाद, तर आम्ही कधीही नकार ऐकला नाही. स्टाॅफमधील श्री. महाडीक यांनी तर एकदा, स्टाॅफकडून पैसे गोळा करून स्पर्धेसाठी पाठविले होते. आम्ही बक्षीसे पण बऱ्यापैकी आणायचो, हा पण एक मुद्दा होता. मी आणि आम्ही काही मित्र जवळपास दिवसभर काॅलेजवर असायचो.
मी टी. वाय्. बी. काॅम. च्या वर्गात होतो. दुपारची वेळ होती. काॅलेजचे तास केव्हाचेच संपले होते. आम्ही मित्रमंडळी वर्गासमोरच ग्राउंडवर बाजूला कोपऱ्यात उभे होतो. तिकडून प्रा. शेखर सोनाळकर आणि प्रा. विवेक काटदरे हे आले. आमच्याकडे पाहून हसले.
‘पिरीयडस् नाही आता, मग काय करत आहात ?’ प्रा. सोनाळकर.
‘नाईक सरांकडे अकाउंटन्सीच्या क्लासला गेलो होतो, तो आटोपला. घरी जाता जाता, थांबलो इथे. थोड्यावेळाने जाऊ घरी’. मी.
‘तुम्हाला आम्ही काॅलेज असो वा नसो, पण इथेच जास्त वेळ बघतो. आता पुढच्या वर्षी काही तुमचे काॅलेज नाही. कसं होणार तुमचं ?’ प्रा. सोनाळकर. सरांच्या त्या एका प्रश्नांत किती प्रश्न होते ? आम्हाला क्षणभर काही बोलता आले नाही. गप्प रहाण्यासारखाच प्रश्न होता तो.
‘त्यांचे काॅलेज नसले, म्हणून काय झाले ? आपण तर आहोत ना इथं ! येतील ते !’ प्रा. काटदरे.
आणि खरं सांगतो, ही घटना सन १९८२ सालातील. मात्र आज पण आमच्या काॅलेजच्या कोणत्याही सरांशी माझे तेवढेच स्नेहाचे व आदराचे संबंध आहे, जेवढे त्यावेळी होते. आमच्या शिक्षकांनी आम्हाला कसलेही हातचे राखून न ठेवता भरभरून दिले, मग आपले विद्यार्थी म्हणून काम आहे, त्यांच्या शिकवण्याच्या बदल्यात आपण, त्यांना नंतर काय देतो ?
आपल्या आदर्शाला धक्का लागलेला सहन न होणे, ही बुद्धी प्रत्येकालाच उपजत असते, पुढे ती विकसीत होत जाते. अशावेळी आपल्याला काळजी एवढीच घ्यायची असते, की ती बुद्धी अतिरेकी व अंध समर्थनार्थ झुकायला नको. त्याचे विपरीत परिणाम अंतीमत: समर्थन करणाऱ्यालाच सहन करावे लागतात, भोगावे लागतात. आम्ही नशीबवान, आमच्या कोणत्याही आदर्शाला तडे गेलेले आम्हाला दिसले नाही. प्रश्न आम्हा विद्यार्थ्यांचा आहे, की आम्ही त्यांच्या परिक्षेत कितपत उत्तरलो !
© ॲड. माधव भोकरीकर

27.1.2020

काॅटवजा पलंग आणि संक्रांतीचे हळदीकुंकू !

काॅटवजा पलंग आणि संक्रांतीचे हळदीकुंकू !
रावेरला वकीली करत असतांना, आमच्या वकील मंडळीत वातावरण अगदी मोकळे असायचे. काही जणांना तर घरगुती गोष्टींची पण विचारपूस करण्यात संकोच वाटत नसे. कोणास कोणती गोष्ट, वस्तू घ्यायची असली, तर सहजपणे दुसऱ्यांस, ‘ही वस्तू कशी हवी, कोठून घ्यावी’ म्हणून विचारले जाई.
दिवस हे असे जानेवारी फेब्रुवारीचे होते. माझ्या एका वकील मित्रांना लोखंडी पट्ट्यांचा पलंगवजा काॅट घ्यायचा होता. त्यांनी मला सहज विचारले, ‘कुठून घ्यावा ?’
‘आयता घेऊ नका. चांगला तयार करून घ्या !’ मी.
‘तयार करून घेतला, की वेळ जाईल. तो पैसे पण जास्त सांगतो, वेल्डिंगवाला !’ ते वकील.
‘तुम्ही पैशाकडे पाहू नका. त्यांना जवळचा माल खपवायचा असतो. ते काहीही आश्वासन देतात. तुम्ही मजबूत तयार करून घ्या, स्वत:च्या देखरेखीखाली.’ मी.
‘आपल्याला कोणता एवढा मजबूत हवा आहे ? मी एकटा किंवा एखादे वेळी पोरगा झोपेल त्यांवर !’ ते.
विषय तेवढ्यावर राहीला. दोन-तीन दिवस गेले. आणि एके दिवशी बोलताबोलता, ‘काल संध्याकाळी त्याचा माणूस एकटा घेऊन आला पलंग ! अगदी काॅट करा, आणि उलगडून पलंग करा. मस्त आहे !’ ते वकील.
‘एकटा घेऊन आला ? अहो, आमच्याकडील जुना पलंग उचलायला दोन माणसं लागतात. तुम्ही अजून ऐका. त्याला पलंग तुमच्यासमोर बनवून द्यायला सांगा ! तुमच्याकडे माणसांची वर्दळ जास्त असते.’ मी.
‘जाऊ दे आता. बघू नंतर ! उद्यापरवाचे हळदकुंकू आहे. ते झाल्यावर पाहू !’ ते. हा विषय पण तेवढ्यावरच थांबला. मला मात्र संभाव्य धोका दिसत होता.
तिसरा दिवस उजाडला, आणि मी कोर्टात आल्याआल्याच त्यांनी, ‘तू म्हणत होता, ते खरं होतं !’ असे म्हणत, ‘निष्कारण फटका’ बसल्याचे सांगीतले. काय झाले हे विचारल्यावर -
‘परवाच आमच्याकडे संक्रांतीचे हळदीकुंकू होते. सर्व बायका आलेल्या. हिने नवीन काॅट घेतला म्हणून सांगीतले. त्याचा उलगडून पलंग करता येतो, हे पण सांगीतले.’ ते.
‘बरं मग !’ मी.
‘अरे, बरं मग काय ? त्या बायका ऐकता होय ? तीन जणी एकदम त्यांवर बसल्या !’ ते.
‘बरं मग !’ मी.
‘बरं मग काय ? त्या तिन्ही अशा होत्या.’ त्यांनी दोन्ही हातांच्या काखा फुगवत ‘त्या लठ्ठ असण्याची’ खूण केली. मला काय झाले असावे, हा अंदाज आला, पण मी बोललो नाही.
‘बरं मग ?’ मी.
‘अरे बरं मग काय ? मी काय मुकीमबुवांचे किर्तन सांगतोय ? पहिले कुच्चऽऽऽ असा आवाज आला. त्या इकडेतिकडे बघेपर्यंत, त्या पलंगाच्या एका बाजूचे दोन पाय एका दिशेला, तर दुसऱ्या बाजूचे दोन पाय त्याच्या विरूद्ध दिशेला गेले. पलंगाची मधली बाजू जमिनीकडे वाकत, त्याची हळूहळू झोळी व्हायला लागली. त्यांना उठता येईना. त्यांच्या हातातील तिळगूळ उडाला. त्या कशाबशा पडतापडता उठल्या, बाकीच्या खाली बसलेल्या भरकन दूर सरकल्या !’ ते.
‘मग आता ?’ मला प्रसंग आठवून हसू आवरेना.
‘दुसऱ्या दिवशी त्या पलंगवाल्या माणसाला बोलावले आणि ते सर्व दाखवले आणि काय झाले ते सांगीतले ! निर्लज्ज माणूस !’ ते.
‘काय ?’ मी.
‘म्हणतो, एका माणसाऐवजी तीन बाया बसल्यावर हे असेच होणार !’ ते.
‘पलंग परत घ्यायचे काय म्हणाला ?’ मी.
‘मोडीच्या भावात हा परत घेतो, नविन चांगला बनवून पाठवतो.’ ते.
‘पाय सरळ करून घ्या आणि पलंगाच्या खाली आडव्या बीमसारखी मजबूत ॲंगलची पट्टी लावा. स्वस्तात होईल.’ मी.
मी काही बोलायच्या आंत, ते म्हणाले, ‘चल. मला माहीत आहे. लालचंदकडे चहाला जाऊ !’
© ॲड. माधव भोकरीकर
Dhananjay Chincholikar

27.1.2020

नंदाघरी नंदनवन फुलले !

नंदाघरी नंदनवन फुलले !
शालेय वयात आमच्याकडे रेडिओ नव्हता. गल्लीत एक-दोन जणांकडे होता. आमच्या घरासमोर असलेले ना. रा. भावे सर, यांच्याकडे पण होता. त्यांना गाण्याची आवड पण होती. रेडिओवरची गाणी, ही फक्त आपल्यालाच ऐकता यावी, अशी कोणाची भावना नसायची. त्यामुळे हे असे कार्यक्रम निदान अर्ध्या गल्लीला तरी ऐकता यायला हवेत, असा रेडिओचा आवाज असायचा. व्हाल्वचे रेडिओ असायचे आणि कार्यक्रम नीट ऐकू यावे म्हणून घरात जाळीचा पट्टा लावलेला असायचा.
आकाशवाणीवर विविध कार्यक्रम लागायचे. जळगांव आकाशवाणी नंतर सुरू झालं. त्यावेळी जास्त ऐकले जायचे, ते मुंबई आणि पुणे केंद्र ! आकाशवाणी मुंबई केंद्रावर ११ वाजता हिंदी बातम्या असायच्या ५ मिनीटांच्या, आणि त्यानंतर लागायचा कामगारांसाठी कार्यक्रम ‘कामगार सभा’ ! रोज वेगवेगळे गीत प्रकार असायचे. शुक्रवारी लोकगीते आणि गुरूवारी भक्तीगीते, हे ठरलेले असायचे. इतरवेळी भावगीते, नाट्यगीते वा मिश्रसंगीत !
गुरूवारी ‘आर एन् पराडकर’ यांनी गायलेले दत्तभजन हमखास, आणि शुक्रवारी रोशन सातारकर व सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या लावण्या असायच्या. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ‘नाचत ना गगनात नाथा’ व ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ हे असायचे. भावगीतांचा दिवस असला की आशा भोसले, लता मंगेशकर यांच्या सोबत अजून एक नांव असायचे, ‘सुमन कल्याणपूर’ ! यांनी गायलेली सुंदर भावगीते, चित्रपटगीते नियमीत लागायची. ऐकायला खूप छान वाटायची आणि अजून पण वाटतात. त्यात,
असावे घर ते अपुले छान
एकतारी सूर जाणी
कशी करू स्वागता
कशी गौळण राधा बावरली
केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
चल उठ रे मुकूंदा
जिथे सागरा धरणी मिळते
रिमझिम झरती श्रावणधारा
देव माझा विठू सावळा
नंदाघरी नंदनवन फुलले
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले
अशी कितीतरी गीते असायची. आज त्यांचा जन्मदिन ! आमचे संगीत जीवन ज्यांनी समृद्ध केले, त्यांच्याप्रति ही एक भावांजली -
नंदाघरी नंदनवन फुलले
बोल बोबडे श्रीरंगा चे
गोकुळात घुमले
रिंगण घाली शाम सावळा
बाळकृष्ण तो रांगत आला
हात धरून चालू लागला
पुढेपुढे ग पाऊल पडले
हातच चिमुकला उंच नाचवी
छमछम वाळा मधुर वाजवी
स्वतःला हसूनी जगास हसवी
कौतुक करते गोकुळ सगळे
गीत - योगेश्वर अभ्यंकर, संगीत - दशरथ पुजारी आणि गायिका - सुमन कल्याणपूर
© ॲड. माधव भोकरीकर

28.1.2020

आठवणीतील व्यक्ती - पं. विनायक फाटक !

आठवणीतील व्यक्ती - पं. विनायक फाटक !
मी जळगांवी शिकायला होतो, सन १९७८ ते १९८५ या काळात ! अर्थात त्यापूर्वीपासून देखील जळगांवी जात असायचोच, कारण जळगांव माझे आजोळ ! आजोळी शास्त्रीय संगीताची बऱ्यापैकी आवड, तसेच माझी आई तर जळगांवचे प्रख्यात संगीतज्ञ पं. कै. गोविंदराव कुलकर्णी यांची विद्यार्थिनी ! त्यांनी आपले शिक्षण ग्वाल्हेर येथे पं. कृष्णराव पंडीत यांचेकडे राहून घेतले होते. त्यामुळे जळगांवच्या संगीतक्षेत्राशी आणि त्यांतील व्यक्तींशी संबंध हा जन्मापासूनच आला असे म्हणता येईल. त्यावेळी काही समजत नव्हतेच ! त्यांत कै. शरदराव धर्माधिकारी, कै. विनायकराव पुराणिक, कै. वसंतराव चांदोरकर, कै. बबनराव भावसार, कै. मुरलीधरबुवा जोशी आणि अजून काही मंडळी होती.
आज सायंकाळी असाच बसलो होतो. आठवण आली आकाशवाणी जळगांव केंद्राची ! मी जळगांवी शिकायला गेलो, त्यावेळेस जळगांव आकाशवाणी केंद्र नुकतेच सुरू झाले होतो. मी काॅलेजला जात असल्याने, एखाद्या काॅलेजकुमारास जितके ज्ञान असावे, तितके होते; मात्र आपल्याला किती ज्ञान आहे, असा समज असावा, तसा समज पण होता. विविध स्पर्धांमध्ये लुडबूड करण्याव्यतिरिक्त, मी आकाशवाणीची नाटकाची चाचणी परिक्षा त्या काळात पास झालो होतो. परिक्षक होते, पुरुषोत्तम दारव्हेकर ! मी माझ्या महाविदयालयीन काळातच आकाशवाणी कलाकार झालो होतो. त्यामुळे या निमित्ताने आणि युववाणीच्या निमित्ताने माझी आकाशवाणी जळगांव केंद्रात ये-जा असायची. तेथील युववाणी विभाग सांभाळणारे, कार्यक्रम अधिकारी श्री. अशोक बढे हे अत्यंत सज्जन गृहस्थ ! आम्हा मुलांचा आगाऊपणा ते सहन करायचे, हे आता आम्हाला समजतेय !
मी तबला शिकत होतो, जळगांवचे प्रसिद्ध तबलाशिक्षक बबनराव भावसार यांच्याकडे ! संगीताच्या परिक्षांची लेखी आणि प्रात्यक्षिक याची तयारी देखील ते चांगली करून घेत. त्यावेळी जळगांव आकाशवाणी केंद्रात श्री. विश्वनाथ मिश्रा, श्री. विनायक फाटक आणि श्री. नारायणराव दाभाडे, हे तबलावादक म्हणून होते.
त्यापैकी योगायोगाने भेट झाली होती, आमचे गुरूजी बबनराव भावसार यांच्यासोबत, ती श्री. विनायक फाटक यांची ! गोरापान उभट चेहरा, धारदार नाक आणि किंचीत घारेपणाची झाक असलेले डोळे, थोडा बारीक आवाज ! त्यावेळी त्यांना काही तबल्यासंबंधी लेखी माहिती हवी होती. त्यासाठी मला आमच्या गुरूजींनी माझी लेखी वही घेऊन त्यांच्या घरी बोलावले. मी ही संधी सोडणार नव्हतोच. तसे ते रिंगरोडवर आम्ही रहात होतो, त्या जवळच रहायचे. त्यांच्याकडे मला काही काम नसले, तरी जायला आवडायचे, कारण त्यांचा त्यावेळी रियाज सुरू असायचा. मला भरपूर काही ऐकायला मिळायचे, पण फार काही घेता आले नाही.
बोलण्याच्या ओघात माझी आवड, माझ्या आईचे संगीतातील शिक्षण, कै. गोविंदराव कुलकर्णी आणि आमचे संबंध वगैरे जसजसे माहिती होऊ लागले. तसा आमच्यातील नवखेपणा कमी होऊ लागला, मग जळगांव संबंधी अवांतर गप्पा पण होती. कधीतरी त्यांचे गुरू सामंत गुरूजी यांचा पण विषय निघे. ते जळगांवी होते, तो पावेतो जाणे होते. मात्र नंतर समजले, की त्यांची बदली पुण्याला झाली. बस, त्यानंतर भेट नाही.
माझी पण वाट संगीत क्षेत्रापासून दुसरी झाली. आज अचानक नांव दिसले, सौ. रेवा नातू, यांचे ! मग आठवले, अरे त्यावेळी त्यांना एक छोटी मुलगी होती, तीच असावी. त्यांचे काही तबलावादन ऐकता येते का, ते बघीतले. विहीर बघीतले. तेच होते. इतक्या वर्षांनंतर वयाचा परिणाम शरीरावर दिसणारच ! त्यांचे तबलावादन ऐकले. खूप बरे वाटले.
जुन्या आवडत्या व पुन्हा न अनुभवायला मिळणाऱ्या आठवणी, या नेहमीच हव्याहव्याशा वाटतात ! पं. विनायक फाटक यांना, यांतील थोडेफार आठवत असेल, किंवा नसेल ! मला आठवले, लिहावेसे वाटले, लिहीले झाले.
© ॲड. माधव भोकरीकर

30.1.2020
समजायला खूप सोपं, मात्र उमजायला कठीण आणि कृतीला तर कर्मकठीण ! —- खास आम्हा भरतखंडवासियांसाठी !
तसं बघीतलं, तर खूप सोपं आहे हो, की कोण बदललं आहे आणि कोण धोकेदायक आहे आणि कोण मदतनीस आहे, कोण शत्रू आहे आणि कोण मित्र आहे, ते शोधणे ! या निकषावर गेल्या दोन-चार हजार वर्षांपासून ते आजपावेतोचा इतिहास पहा आणि मग ठरवा, नंतर निष्कर्ष काढून, आपली वागणूक कशी असावी ते ठरवा, तटस्थपणे !
१. विविध देशांमधे त्यावेळी कोणते धर्म होते, कोणत्या धर्माची राजसत्ता होती, प्रजेचा धर्म कोणता होता, त्यांच्याशी राजसत्तेचे वर्तन कसे होते — परिस्थिती कशी, केव्हा आणि कधी बदलली ? — आता तिथं काय परिस्थिती आहे ?
२. विविध देशांमधे राजसत्तेचा कोणता प्रकार होता, हुकूमशाही वा राजेशाही वा लोकशाही वा अन्य काही ? ती राजसत्ता कशी राबवली जायची ? निरपेक्षपणे, भावनेच्या आहारी जाऊन, वा पक्षपातीपणे ? त्यांत काही बदल झाला का ? कशामुळे बदल झाला ? —- आज काय परिस्थिती आहे ?
३. विविध देशांमधे पूर्वी कोणती संस्कृती होती, तिचे काय वैशिष्ट्य होते, त्या संस्कृतींत जनता कशी रहात होती ? त्यांवर काही आक्रमणे झाली ? आक्रमकांनी काय केले ? पूर्वीच्या आणि सध्याच्या संस्कृतीची अवस्था - फरक चांगले आणि वाईट !
— आपसात बडबड करू नका. इतिहास आणि आजचे अनुभव, यांत काही साम्य आढळते का ? विचार करा, मनन करा, चिंतन करा. कोणालाही दोष न देता, पुढे कसे वागायचे ते ठरवा ! देशहिताच्या दृष्टीने, स्वार्थीबुद्धीने फक्त आपल्यासाठी नाही. देश राहीला, तर तुमचे अस्तित्व राहील !
—- नाहीतर, करमणूक म्हणून घ्या !

31.1.2020
एखादी यशस्वी व्यक्ती दिसली, की आपल्याला तिचे यश दिसतं, मात्र तिच्या त्या यशाच्या मागे, आणि त्यासाठी सोडून द्याव्या लागलेल्या तिच्या असंख्य भावभावना, तिचे बालपण, ही न दिसणारी वेदना दिसत नाही.

1.2.2020
स्वत:ला त्रास होत असला, तरी सर्वांना सांभाळून असलेला मुलगा व सून चांगली नसते, त्यांचा नित्य उद्धार केला जातो.
—- मात्र आपल्या आईवडीलांचा नित्य उद्धार करणारा मुलगा, म्हणजेच सासूसासऱ्यांची नित्य पाद्यपूजा करणाऱ्या सूनेच्या पुढे मात्र चुप्पी !

6.2.2020

इतिहास हा कोणाच्यातरी आवडीनिवडीनुसार घडलेला नसतो, अथवा कोणाच्या अनुकूल वा प्रतिकूल असा मांडता येत नाही. तो जसा असतो, तसाच असतो. कोणाला अनुकूल तर कोणाला प्रतिकूल !
— मात्र कोणालातरी अडचणीचा ठरला, तर त्यांत घुसेखोरी होण्याची आणि त्याचे विकृतीकरण होऊ शकते.

5.2.2020

दारावर आलेल्या बोहारणीस बऱ्याच साड्या देण्यासाठी काढल्या, आणि ते देवून, काहीतरी किरकोळ भांडीकुंडी घेवून, आपला गृहिणी म्हणून, काटकसरीपणा सिद्ध केला गेला. घेतलेल्या भांड्यांचा खरोखर काही उपयोग आहे का, हे विचारायचे नसते.
— लगेच दुसऱ्या दिवशी, ‘कुठे जायलायायलासुद्धा साड्या नाहीत’, हे सांगण्यात आले.
विशेष सूचना - मराठी भाषेतील, विरोधाभास अलंकाराचे हे असे उदाहरण, घरातीलच घटनेवरून जरी असले, तरी सांगणे धोकादायक ठरू शकते. ज्याने त्याने आपल्या जबाबदारीवर सांगावे.

4.2.2020

आपण आपल्या पोटासाठी सन्मार्गाने जे काम करत असतो, असं कोणतंच काम लहान वा मोठं नाही. —- ज्या कामामुळे आपले पोट भरते, उदरनिर्वाह होतो, आपल्याला जीवन मिळते, आपण जगतो ते काम क्षुद्र, लहान कसे ?
3.2.2020

एकटे विचार करत बसा शांततेने, आपल्या आयुष्यातल्या विविध घटनांचा ! लक्षात येईल तुमच्या, या प्रत्येक घटनेचा धागा जोडला जातोय, एका समान ठिकाणी ! —खरंय, आई आणि वडील, आपल्याला आयुष्यभर बिलगून असतात.
3.2.2020


एखादी यशस्वी व्यक्ती दिसली, की आपल्याला तिचे यश दिसतं, मात्र तिच्या त्या यशाच्या मागे, आणि त्यासाठी सोडून द्याव्या लागलेल्या तिच्या असंख्य भावभावना, तिचे बालपण, ही न दिसणारी वेदना दिसत नाही.

एखादी यशस्वी व्यक्ती दिसली, की आपल्याला तिचे यश दिसतं, मात्र तिच्या त्या यशाच्या मागे, आणि त्यासाठी सोडून द्याव्या लागलेल्या तिच्या असंख्य भावभावना, तिचे बालपण, ही न दिसणारी वेदना दिसत नाही.
स्वत:ला त्रास होत असला, तरी सर्वांना सांभाळून असलेला मुलगा व सून चांगली नसते, त्यांचा नित्य उद्धार केला जातो.
—- मात्र आपल्या आईवडीलांचा नित्य उद्धार करणारा मुलगा, म्हणजेच सासूसासऱ्यांची नित्य पाद्यपूजा करणाऱ्या सूनेच्या पुढे मात्र चुप्पी !

6.2.2020

इतिहास हा कोणाच्यातरी आवडीनिवडीनुसार घडलेला नसतो, अथवा कोणाच्या अनुकूल वा प्रतिकूल असा मांडता येत नाही. तो जसा असतो, तसाच असतो. कोणाला अनुकूल तर कोणाला प्रतिकूल !
— मात्र कोणालातरी अडचणीचा ठरला, तर त्यांत घुसेखोरी होण्याची आणि त्याचे विकृतीकरण होऊ शकते.

5.2.2020

दारावर आलेल्या बोहारणीस बऱ्याच साड्या देण्यासाठी काढल्या, आणि ते देवून, काहीतरी किरकोळ भांडीकुंडी घेवून, आपला गृहिणी म्हणून, काटकसरीपणा सिद्ध केला गेला. घेतलेल्या भांड्यांचा खरोखर काही उपयोग आहे का, हे विचारायचे नसते.
— लगेच दुसऱ्या दिवशी, ‘कुठे जायलायायलासुद्धा साड्या नाहीत’, हे सांगण्यात आले.
विशेष सूचना - मराठी भाषेतील, विरोधाभास अलंकाराचे हे असे उदाहरण, घरातीलच घटनेवरून जरी असले, तरी सांगणे धोकादायक ठरू शकते. ज्याने त्याने आपल्या जबाबदारीवर सांगावे.

4.2.2020

आपण आपल्या पोटासाठी सन्मार्गाने जे काम करत असतो, असं कोणतंच काम लहान वा मोठं नाही. —- ज्या कामामुळे आपले पोट भरते, उदरनिर्वाह होतो, आपल्याला जीवन मिळते, आपण जगतो ते काम क्षुद्र, लहान कसे ?
3.2.2020

एकटे विचार करत बसा शांततेने, आपल्या आयुष्यातल्या विविध घटनांचा ! लक्षात येईल तुमच्या, या प्रत्येक घटनेचा धागा जोडला जातोय, एका समान ठिकाणी ! —खरंय, आई आणि वडील, आपल्याला आयुष्यभर बिलगून असतात.
3.2.2020



एखादी यशस्वी व्यक्ती दिसली, की आपल्याला तिचे यश दिसतं, मात्र तिच्या त्या यशाच्या मागे, आणि त्यासाठी सोडून द्याव्या लागलेल्या तिच्या असंख्य भावभावना, तिचे बालपण, ही न दिसणारी वेदना दिसत नाही.

एखादी यशस्वी व्यक्ती दिसली, की आपल्याला तिचे यश दिसतं, मात्र तिच्या त्या यशाच्या मागे, आणि त्यासाठी सोडून द्याव्या लागलेल्या तिच्या असंख्य भावभावना, तिचे बालपण, ही न दिसणारी वेदना दिसत नाही.

सरकारचे योग्य असलेले पारदर्शक धोरण !

सरकारचे योग्य असलेले पारदर्शक धोरण !
मी पूर्वी गांवीच वकीली करत असल्याने, पक्षकार प्रत्यक्ष भेटत. माहिती स्वत: देत, त्यामुळे त्यामुळे आम्हाला मिळणारी फी, ही त्यावेळी बहुताशपणे रोख मिळायची. चेक, डीडी, आरटीजीएस् वगैरे गोंधळ नव्हता.
अलिकडे मी औरंगाबादला वकीलीसाठी आल्याने, पक्षकाराकडून कागदपत्र मागवणे टपालाने, तर बाकी माहिती वगैरे फोनवर पण घेता येते. आवश्यकता पडली, तर पक्षकाराला बोलवावे. प्रश्न येतो, फी देण्याच्या वेळी !
मात्र अलिकडे हे विविध प्रकार सुरू झाल्याने, परगांवच्या माणसांस आपल्या खात्यावर थेट रक्कम भरतां येते. सरकारी धोरणानुसार त्याचाच आग्रह जास्त असतो, मात्र रक्कम प्रत्यक्ष मिळतानाचे समाधान त्यामुळे मिळत नाही.
काही पक्षकारांचे संबंध जुने असतात, आपली भेट झाली नाही, की ते घरी आपल्या गृहमंत्र्याकडे पैसे देऊन जातात. पक्षकार त्यांची फी देण्याची जबाबदारी पार पाडतात, पण यामुळे आमचे दोन प्रकारे नुकसान होते. पहिले म्हणजे त्या पक्षकाराच्या खात्यातून ती रक्कम कमी करावी लागते, त्याला पुन्हा मागता येत नाही, उलट त्याचे कौतुक करावे लागते, की मी नसतांना पण फी दिली म्हणून ! मात्र अशा पद्धतीने त्यांनी दिलेली फी आपल्याला प्रत्यक्षात क्वचितच मिळते, उलट आपल्यालाच ‘तुम्हाला काय करायचेय पैसे, मला संसार चालवावा लागतो,’ असा दम देऊन गडप केली जाते.
अलिकडच्या सरकारने, प्रत्यक्ष बॅंकेतील खात्यावर रक्कम जमा करावी, हे जे पारदर्शक धोरण आखले आहे, ते खरोखरच स्तुत्य आहे. त्यामुळे प्रत्यक्ष हातात रक्कम मिळाल्याने जे समाधान मिळते, ते मिळाले नाही तरी चालते !
— पण अशा गृहखात्यास मिळालेली, पण आपल्या दृष्टीने बरीच बुडणारी रक्कम वाचू शकते ! सरकारचे पारदर्शक धोरण खरंच योग्य आहे.
© ॲड. माधव भोकरीकर

7.2.2020

पंजाबी डीश आणि पातळ भाजी !

पंजाबी डीश आणि पातळ भाजी !
परवा दोन-तीन दिवसांपूर्वी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावर ‘आपली आवड’ ऐकत होतो, सादर करत होते, मंगेश वाघमारे ! छान गाणी ऐकायला मिळत होती. हे ऐकतांना आपली आवड सादर करणारे, पूर्वीचे जळगांव आकाशवाणीतील तीनचार निवेदक मला आठवले - उषा शर्मा, मोहिनी पंडीत, दत्ता सरदेशमुख ! हे पण सुंदर कार्यक्रम सादर करायचे. निवेदिका सौ. मोहिनी पंडीत आता आपल्यांत नाही. श्रीमती उषा शर्मा फेसबुकवर आहे, माझ्या मित्र यादीत आहे. निवेदक श्री. दत्ता सरदेशमुख यांची माझी बऱ्याच वर्षांत भेट नाही.
रेडिओवर गाण्यापूर्वीचे संगीताचे चिरपरिचीत स्वर ऐकू आले. हो, शिवरंजनी रागाचे ! गाण्यापूर्वीच्या संगीतावरूनच क्षणांत लक्षात आले, ‘जाने कहा गये वो दिन’ हे गाणे आहे म्हणून ! राज कपूरच्या बहुचर्चित ‘मेरा नाम जोकर’ मधील हे गाणे, ‘हसरत जयपुरी’ यांचे ! संगीत दिले होते, राजकपूरच्या आवडत्या जोडीने शंकर-जयकिशन यांनी, आणि आवाज पण, जो खास राजकपूरचा म्हणून ओळखला जातो, त्या ‘मुकेश’ यांचा ! पूर्ण गाणे ऐकले शांतपणे, आणि मन गेलं जळगांवच्या माझ्या महाविद्यालयीन काळात !
त्यावेळी गणेशोत्सव, दुर्गोत्सव वगैरे सार्वजनिक कार्यक्रमात विविध वाद्यवृंद म्हणजे आर्क्रेस्ट्रा नेहमी बोलवायचे. दूरदर्शनचा एवढा प्रचार व प्रसार झालेला नव्हता, तर आज दिसत असलेली असंख्य चॅनेल्स आणि त्यावरील भरमसाठ कार्यक्रम दिसण्याचा प्रश्नच नव्हता. गांवातीलच काही कलाकार एकत्र येऊन असा कार्यक्रम सादर करायचे नियमीतपणे ! जळगांवचे पण तीन वाद्यवृंद आठवतात मला !
उल्हास साबळे -
जळगांवला ‘मुकेश-ए-महेफिल’ या नांवाने उल्हास साबळे त्यांचा वाद्यवृंद चालवायचे ! बहुतांशपणे मुकेश यांनी गायलेली गीते, त्यांत असायची. ‘जाने कहा गये वो दिन’ हे त्यांच्या आवडीचे खास गाणे ! गाणं ऐकत असतांना, खरोखर मुकेश यांची आठवण यायची ! त्यांच्या कार्यक्रमांत बहुतांशपणे चित्रपटातील गीते असायची. आमच्या नूतन मराठा काॅलेजमधे पण त्यांचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी मंत्री असलेल्या आणि नंतर भारताच्या राष्ट्रपती झालेल्या श्रीमती प्रतिभाताई पाटील, यांनी पण त्यांचे कौतुक केले होते.
शशिकांत आणि अपर्णा राजदेरकर -
दुसरा परिचित वाद्यवृंद म्हणजे, राजदेरकर दांपत्याचा ! शशिकांत राजदेरकर आणि अपर्णा राजदेरकर यांनी सुरू केलेला ‘आपली आवड’ या नांवाचा ! यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेले असल्याने, यांच्या कार्यक्रमांत भावगीते, भक्तीगीते, चित्रपटगीते पण असायची. एकदा जळगांवच्या ‘मल्टी पर्पज हाॅल’मधे कसल्यातरी निमित्ताने कार्यक्रम झाला होता. त्यावेळी त्यांनी म्हटलेले ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे गाणे आज पण माझ्या कानांत आहे.
ते आठवणीने नेहमी म्हणायचे एक अहिराणी गाणे ! ते जर विसरले, तर या गाण्याची खास फर्माईश व्हायची ! त्यातील एक ओळ फक्त आठवते. जावाई लग्नात रूसून बसलेला असतो, त्याची सर्व जण समजूत काढतात, पण तो राजी होत नाही. कोणी फटफटी देऊ म्हणून सांगतात, कोणी मोटार देऊ म्हणून सांगतात, तरी तो ऐकत नाही. शेवटी शरणागती पत्करून सर्व जण त्यांनाच विचारतात, काय हवे म्हणून ! मग तो सांगतो -
मले फफ्फटी नको, मले मोटर बी नको,
मले भातावर फक्त गूय पाह्यजे, गूय पाह्यजे !
शशिकांत राजदेरकर यांची बऱ्याच वेळा भेट व्हायची, ती जळगांवचे प्रसिद्ध संगीतज्ञ गोविंदराव कुलकर्णी यांच्याकडे ! एका वर्षी त्यांची मुलगी, तिचे आता नांव आठवत नाही, आमच्या रावेरला आमच्याकडे संगीताची परिक्षा द्यायला पण आली होती.
श्रीमती सुवर्णा दातार -
अजून जळगांवमधील तिसरे नांव, म्हणजे श्रीमती सुवर्णा दातार यांचे ! या तर शास्त्रीय संगीताच्याच गायिका आणि शिक्षिका ! तसा यांचा थोडा परिचय पूर्वीपासूनच ! जळगांवच्या खान्देश मील जवळ व रेल्वे स्टेशन लगतच त्यांचे घर ! जळगांव माझे आजोळ ! यांच्याकडे माझ्या आजीसोबत गेल्याचे पुसटसे आठवतेय !
त्यांचा मोठा वाद्यवृंद नाही, पण दर्जेदार गाण्यांचे सुंदर कार्यक्रम करायच्या त्या ! त्या स्वत:, हार्मोनिअम वादक, तबला वादक आणि मागे एखादा साथीदार, बस ! त्यांचा एक कार्यक्रम ऐकल्याचा आठवतोय, बळीराम पेठेत, ब्राह्मण सभेच्या गल्लीत झालेला ! गूंज उठी शहनाई, अमर भूपाळी वगैरे सारख्या चित्रपटातील कर्णमधुर गाणी त्यांनी म्हटली होती. संत ज्ञानेश्वरांचा ‘रूणूझुणू रूणूझुणू रे भ्रमरा’ हा त्यांनी म्हटलेला सुंदर अभंग आज पण लक्षात आहे.
त्यांची पण काहीवेळा भेट संगीतज्ञ गोविंदराव कुलकर्णी यांच्याकडे झाली होती. त्यांची अजून न विसरतां येण्यासारखी आठवण म्हणजे, आमच्याकडे अखिल भारतीय गांधर्व मंडळाचे परिक्षा केंद्र होते. माझी आई चालवायची ते केंद्र ! या संगीत केंद्रावर रावेरला, संगीताच्या परिक्षा घेण्यासाठी आमच्याकडे जुन्या घरी, भोकरीकर गल्लीत, त्या आल्या होत्या. आईचे माहेर जळगांवचे आणि या पण जळगांवच्या ! त्यांच्या झालेल्या भरपूर गप्पा थोड्या आठवतात.
त्यांचा वारसा आता समर्थपणे त्यांची मुलगी सौ. कस्तुरी दातार अट्रावलकर चालवते आहे.
आता गांवातीलच कलाकारांनी उभारलेले, हे असे वाद्यवृंद जवळपास संपलेले आहेत. आपल्याला काही ऐकायचे असले, की कोणत्याही मोठ्या कलाकाराचे नांव इंटरनेटवर टाकायचे, ‘यु ट्यूब’वर त्यांचे गाणे उपलब्ध असतेच ! ऐकावे आणि समाधान मानावे ! गांवातील, आपल्यात रोज वावरणाऱ्या मंडळींचा बैठकीवजा असलेला कार्यक्रम ऐकण्यातला घरगुतीपणा संपलेला आहे. बैठकांचे इव्हेंट झाले !
—— काही म्हणा, घरी केलेल्या पातळभाजीची अमृतासम चव, ही हाॅटेलमधल्या पंजाबी डीशला कशी येणार ?
© ॲड. माधव भोकरीकर

7.2.2020
आमच्या गांवी कोर्टात असिस्टंट रजिस्ट्रार होते, नंतर ते बहुदा जिल्हा कोर्टाचे रजिस्ट्रार झाले. हिंदीभाषिक होते, पण मराठी आणि इंग्रजीचे पण त्यांचे ज्ञान चांगले होते. त्यांना न्यायालयीन कार्यपद्धतीचेच ज्ञान चांगले होते असे नाही, तर कायद्याचे पण ज्ञान कामापुरते होते. कोर्टातील पक्षकारांना ते बऱ्याच वेळा सहज व हसतमुख चेहऱ्याने मदत करत असत, काही विशेष अपेक्षा न ठेवता ! मग असे पक्षकार, त्यांना कोर्टाच्या कामकाजाबद्दल काहीबाही विचारून त्रस्त करून सोडत. त्यांच्याजवळ विविध म्हणी, वाक्प्रचार यांचा बऱ्यापैकी भरणा होता.
आज सहज एक वाक्य आठवले. कोर्टाच्या हुकूमनाम्याबद्दल आहे. समोरचा दाद देत नाही, म्हणून याला नाईलाजाने न्यायालयांत दावा करावा लागतो. त्याच्या बाजूने निकाल लागतो. एवढ्या कष्टानंतर आणि भाग्याने मिळालेल्या न्यायालयाच्या हुकूमनाम्याचे काय करायचे ? ते मुळातच ऐका -
दावा किया, तगादा छूटा । घर घर रेवडी बाटो ।
बडे भागसे मिली हैं डिक्री । शहद लगाके चाटो ।
© ॲड. माधव भोकरीकर

14.2.2020
कालचा 'व्हॅलेंटाईन डे' झाला. कोणी कोणाला कोणती 'गिफ्ट' आणली आणि आपलं प्रेम व्यक्त केलं याच्या चर्चा सुरू आहेत. काहींना या दिवशीपण काहीही आणता आलं नाही, याची पण एकतर्फी चर्चा सुरू असते.
या निमित्ताने एक संकेत म्हणून काहीतरी भेट द्यायची पद्धत आहे, हे ठीक आहे पण काही 'गिफ्ट' आणलं किंवा काहीच आणलं नाही त्यानं खरोखर आपल्या मनांतील भावनांत काही फरक पडतो का ? एकमेकांच्या वागण्यातून, कृतीतून एकमेकांचे अस्तित्व जेव्हा दिसायला लागते, आपल्याला भले ते दिसत नसेल, जाणवत नसेल मात्र इतरांना ते नक्कीच दिसते, त्यावेळी सर्वच आपल्याला ते जाणवून देतात. आपल्याला ते दिसत नाही कारण आपण जेव्हा एकरूप झालेले असतो. त्यावेळी हे पहाण्यासाठी आपले बाह्यचक्षू फारसे उपयोगी रहात नाही; तर त्यासाठी अंत:चक्षूची मदत घ्यावी लागते. मग अगदी स्वच्छ दिसायला लागते, आजपावेतो न दिसलेले दिसायला लागते, जाणवायला लागते. लिंबाचे लोणचे मुरल्यावर ते खातांना जे समाधान लाभते, तसे ! असे लोणचे मुरलेल्यांना रोजच 'व्हॅलेंटाईन डे' असतो.

15.2.2020
ज्याला, एखाद्या चौकशी सुरू असलेल्या घटनेसंबंधी काही माहीत असेल, त्यात जी घटना जर समाजाच्या दृष्टीने संवेदनशील असेल, तर याबद्दल आपणांस जे माहीत आहे, ते स्वत:हून न्यायालयासमोर आपल्या साक्षीत सांगून, स्वत: साक्षीदार म्हणून न्यायालयास न्यायदानाच्या कामांत मदत करणे, हे जागरूक नागरिक आणि कर्तव्यदक्ष राजकीय नेत्याचे कर्तव्य आहे.
— वाटेल तशी, शेंडाबुडखा नसलेली, विधाने जाणीवपूर्वक पत्रकारांसमोर वा समाजमाध्यमांसमोर करून समाजात दुही माजवणे, आणि नि:पक्षपातीपणे चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करून, त्यांचे मनोधैर्य खच्ची करणे, हे अजिबात नाही. तो स्पष्टपणे समाजद्रोह आणि न्यायदान व न्यायव्यवस्थेच्या कामातील हस्तक्षेप आहे.

21.2.2020

पोरगी ‘बापाला’ कोर्टात खेचते — वाटणीसाठी !

पोरगी ‘बापाला’ कोर्टात खेचते — वाटणीसाठी !
कायद्यातील तरतुदी या समाजातील नितीमूल्ये लक्षात घेऊन केलेल्या असतात. अपेक्षा असते, समाजातील सर्व जण ती नितीमूल्ये पाळतील. काही अडचण आली, तर न्यायालयांत खरेखुरे सांगतील. त्यामुळे न्यायदानाच्या कामांत सुलभता येईल. खराखुरा न्याय मिळेल. मात्र या आदर्शाची कल्पना, ही प्रत्यक्षात येणं कठीण असते. समोर स्वार्थ दिसायला लागला, की स्वार्थापुढे सत्य पळ काढते. अशीच एक घटना समोर आली.
साधारणत: दीड महिन्यापूर्वीची घटना ! कोर्टाची हिवाळी सुटी नुकतीच संपली होती. मी माझ्या कार्यालयात बसलो होतो. समोर नेहमीप्रमाणे काही पक्षकार बसले होते, त्यांचे बोलणे सुरू होते, तेवढ्यात एक पक्षकार आला. मागच्या खुर्चीवर जाऊन बसला. त्याचे वय साधारण पन्नाशीच्या आसपास, निराश मन:स्थितीत ! सर्व पक्षकारांशी बोलणे आटोपले. ते निघून गेले. हा मग पुढे समोरच्या खुर्चीत येऊन बसला.
‘साहेब, हायकोर्टात अपील दाखल करायचे आहे.’ असे म्हणत, त्याने जवळचे कागद मला दिले.
‘याचा खर्च किती येईल ? फी किती पडेल ?’ तो.
‘खर्च जो काय येईल तो येईल, तुम्ही तुमच्या हाताने करा. फी मी काम वाचून बघीतल्यावर सांगतो. आम्हाला त्रास जास्त, तर फी जास्त आणि कमी त्रास तर, फी कमी ! माझं सरळ गणित असतं !’ मी. तो उदास हसला.
‘त्रास कमी काय, आणि जास्त काय ! त्रास हा त्रास असतो. माझे दोन्ही निकाल विरूद्ध लागले आहे, खालच्या कोर्टात ! काय खरं आणि काय खोटं ! देवाला पण सांगता येत नाही. त्रास मात्र आहे.’ त्याचे बोलणे असे कुठून दुरून आल्यासारखे वाटत होते. त्याची काहीतरी गाडी बिघडली आहे, हे मी ओळखले, आणि ‘कागद वाचल्यावर सांगतो फी, पण काय घडले, ते अगदी पहिलेपासून सांगा. काहीही लपवू नका आणि गाळू नका.’ हे मी म्हटल्यावर, तो सांगू लागला.
साहेब, मला हे माझ्या म्हाताऱ्याने आणि आईने सांगीतले आहे. सुरूवातीला तर आमचा जन्म नव्हता, त्यामुळे त्यावेळचे काही माहीत असण्याचा प्रश्नच नाही ! नंतर आम्ही मोठे झालो, अन् समजायला लागले. वाईट आहे साहेब, कोणाचं काही करू नये. आमच्या म्हाताऱ्याने आमच्यापेक्षा जास्त दुसऱ्याच्या पोरीचं केलं, त्याला दया आली, आणि त्याच्या दयेपायी त्याने पण कोर्टाच्या फेऱ्या मारल्या, अन् आता त्याच्यानंतर आम्ही कोर्टाच्या फेऱ्या मारतोय !
माझ्या आजोबाला, दोन मुले आणि एक मुलगी ! माझ्या वडिलांपेक्षा एक मोठा भाऊ, त्यांचे लग्न झाले, त्यांना एक मुलगी झाली, ती १९५६ ला, लग्नानंतर दीड वर्षाने ! ती दीड वर्षाची होती, तोच ते काका साप चावल्याने वारले, सन १९५८ मधे ! काकूने लगेच दुसरे लग्न केले, त्यांची मुलगी इथेच ठेवली, माझ्या आईजवळ ! ती तिच्या संसारात रमून गेली. आईला आम्ही उशीरा झालो. माझा जन्म १९७१ चा ! आईच्या पोटी लवकर काही झाले नाही, आईने या बापाविना असलेल्या पोरीला तिची आई बनून सांभाळले. तिची जन्मदाती तर तिला सोडून, दुसरा घरठाव करून चालली गेली.
घरची पाच-सात एकर कोरडीची शेती, ती पण चार वेगळ्या ठिकाणी ! करायला परवडत नव्हती ! माझे बाबा कसेबसे शिकले, मराठी शाळेत शिक्षक झाले ! त्यांच्या खेडोपाडी बदल्या होत. तिथं जायचं, या पोरीला सोबत घेऊन ! तिचे सर्व करायचे, ती त्यांचीच पोरगी झाली होती. मराठी शाळेच्या त्यावेळच्या मास्तरच्या पगारात, माझ्या वडिलांनी आत्याचे लग्न केले. आमच्या समाजात लग्नाचे वेळी जावयाला हुंडा आणि पोरीला सोनं भक्कम द्यावं लागते. तुमची ताकद असो, का नसो. कसेबसे ते पण निभावले. माझे आजोबा गेले, सन १९६७-६८ ला, आमचा जन्म नव्हताच ! जातांना त्यांनी शेती बाबाच्या नांवावर केली, ‘सांभाळ पोरा ! तुला सगळंच सांभाळायचे आहे.’ म्हणत एके दिवशी हे जग सोडून गेले.
माझी ही चुलत बहीण, तोवर लग्नासारखी झाली होती. सन १९७५-७६ ला बाबाने तिचे लग्न ठरवले. त्यांच्याजवळ एवढे कुठले पैसे, मग कसे तरी इकडून तिकडून पैसे उभे केले. जावायाला हुंडा द्यावा लागला. पोरीला देण्यासाठी सोन्याचा प्रश्न आला. बाबा आईला म्हणाले, ‘या पोरीला आपण पोरीसारखे सांभाळले आणि नंतर त्यामुळे आपल्याला पोरसोर झाले. आपली पोरच आहे ती ! तुझ्याजवळचे तुझे सोने तिला लग्नात दे. आजची वेळ तरी साजरी कर ! आता माझ्याजवळ सोन्यासाठी काही पैसे नाही. कुठून आणू आता ? त्यासाठी पोरीचे लग्न नको रहायला ! आपली शेती किती आहे, आणि कोणती पिकते आहे ?’
‘अहो, माझ्या पोरीसाठी ते सोनं राहू द्या ! आपल्याला पण पोरगी झालीय ना ? तिला लग्नात द्यायला कामास येईल. त्यावेळी कुठून आणणार ? मला माझ्या आईने दिले आहे, माझ्या लग्नात ! हे काही तुमचे नाही आहे !’ आई म्हणाली.
‘आपल्या पोरीला अजून १०-१२ वर्ष आहे, घेऊ त्यावेळेस नंतर ! मी घेऊन देईन !’ प्राथमिक शिक्षकाची ताकद ती काय असणार ? पण आईला कसेतरी समजावयाचे, म्हणून त्यांनी काहीतरी सांगीतले. बाबांच्या या बोलण्यावर, आई काय बोलणार ? तिला आपल्या नवऱ्याची अवस्था दिसत होती, आणि तिचं पण मन शेवटी आईचे होते. शेवटी तिच्या लग्नात आईकडून मिळालेले सोनं, तिने बाबांच्या हवाली केले. सोनं देतांना तिचे डोळे आणि सोनं पण ओलं झालं होतं. तिच्या, काकाच्या पोरीच्या अंगावर, तिच्या लग्नात माझ्या आईचे तिच्या अश्रूंनी ओलं झालेलं सोनं घातलं. काकाच्या मुलीचे, बहिणीचे लग्न झाले ! आईच्या गळ्यात नंतर फक्त काळी पोत राहीली. हातातील चांदीचे तोडे पण इतर खर्चापायी गेले. नवऱ्याने मागीतल्यावर नाही कसे म्हणणार ? आणि पोटच्या पोरीसारखे जिला आजवर सांभाळले, तिच्या लग्नासाठी नाही काय म्हणणार, असे मनाचे समाधान करत आई गप्प बसली.
लग्न झाले. चुलत बहीण मुंबईला सासरी गेली. त्यानंतर दोन-पाच वर्षे गेली. मेहुणे कुठे नोकरीला होते. त्यांना तिकडे रहायला घर घ्यायचे होते. बहिणीने पैसे मागीतले, बाबांकडे ! त्यांनी पुन्हा कसे तरी उभे केले. आत्याच्या घरचे आणि बाबांनी तिथे जाऊन तिला पैसे दिले. त्यांचे घर झाले. आम्हाला लोकांचे देणे झाले.
या घडामोडीपर्यंत काळ कोणासाठी थांबत नाही. तोवर आम्ही लग्नाला आलो होतो. मी नाशिकला नोकरीत होतो. धाकटा भाऊ पण कष्टाळू ! तो पण नोकरीला होता. दोन पैसे साठले. माझी बहीण लग्नासारखी झाली. वडील तर थकले होते. रिटायरमेंटनंतरच्या पैशात पडलेले घर बांधले, आणि त्यांच्याजवळचे पैसे संपले. माझ्या आईला हे सर्व दिसत होते, तरी आईने मात्र, धोशा धरला, ‘माझ्या पोरीच्या लग्नात माझे घेतलेले दागिने आणि तिला द्यायचे दागिने, असे दोन्ही तिच्या अंगावर घाला. वडिलांजवळ तर विशेष काही रक्कम नव्हती, जे काही तुटपुंजेच पेन्शन यायचे तेच ! पण आम्ही दोन्ही भावांनी जोर लावला आणि तिला लग्नात दागिने घातले. जावाईंना हुंडा दिला. आमच्यात, चुकीची आणि जीवघेणी अशी, पद्धत आहेच ! बहिणीचे लग्न झाले, १९९२-९३ ला ! चुलत बहीण लग्नात होतीच. आमचे पण लग्न झाले होते. आता जरा डोकं शांत झालं, असं वाटलं !
चुलत बहीण मात्र नंतर कुरबूर करायला लागली. आम्हाला काही समजेना ! सन १९९६ ला, आपल्याकडे काही तरी कायदा आला, मुलींना पण वडीलोपार्जित मिळकतीत हिस्सा मिळणार म्हणून ! तिला कोणी भर घातली, आणि तिने माझ्या बाबांच्या विरूद्ध कोर्टात वाटणीचा आणि उत्पन्नाचा दावा घातला. गांवातल्या लोकांनी समजावले, नात्यागोत्यातील माणसांनी समजावले, पण तिने ऐकले नाही.
माझ्या बाबाने तिला समजावले, ‘पोरी तुला मी आणि तुझ्या काकूने काय कमी केले ? दीड वर्षाची असतांना तुझा बाप, माझा भाऊ गेला. तुझी आई तुला सोडून लग्न करून दुसऱ्या घरी गेली. त्यानंतर तिने तुला बघीतले पण नाही. तुझ्या काकूने तुझे सगळे केले. स्वत:चे दागिने तिच्या पोटच्या पोरीला दिले नाही, अन् तुला दिले. तुझे वर्षभराचे सणवार केले, नंतरचे तुझे सर्व बाळंतपण केले. तुला घराला पैसे दिले. पोटच्या पोरीसाठी जे करायचे, त्यापेक्षा जास्त आणि सर्व तुला केले. आता पोटच्या पोरीला द्यायला माझ्याजवळ काही नाही ! तिचे भाऊ तिला सांभाळतायत ! आता तू मला कोर्टात खेचते आहे, वाटणीसाठी ! पोरी तुझ्या हिश्श्यापेक्षा जास्त दिले आहे तुला ! तूच विचार कर आणि हिशोब कर ! या कोरडीच्या जमीनीचे काय उत्पन्न यायचे ? तुला काहीच आठवत नाही ? अग, माझ्या नाशिकच्या पोराची नोकरी पण गेलीय ! काय पाच-सात एकर आहे, त्याला राहू दे ! तो काय खाईल ?’ तिला पाझर फुटला नाही. तिने ऐकले नाही.
कोर्टात बाबांनी त्यांचे लेखी म्हणणे दिले. जाबजबाब घेण्याची वेळ आली. बाबांनी डोळ्यातील पाणी आवरत, साक्ष दिली. त्यांच्या साक्षीदारांनी साक्ष दिली. जाबजबाब चांगले झाले. मात्र तिच्या आईबापाच्या पश्चात, तिला पोटच्या पोरांपेक्षा जास्त केले, आणि तिने आपल्यावर कोर्टात केस करावी ? वाटणी मागावी ? तिच्या बापाने काय आणि किती ठेवले होते तिच्यासाठी ? काही ठेवले नव्हते ! मग माझी आई पण तिला आणि माझ्या बाबांना खूप बोलली ! कुटुंबावर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा, पहिला आणि मर्मभेदक फटका बसतो, तो कुटुंबातील गृहीणीला ! मुलांना काही समजत नसते, वयच नसते त्यांचे ! घराचा कर्ता बसलेला धक्का कोणाला दाखवत नाही. मनांत कुढत रहातो. आपण फसवले गेलो, याची वेदना जवळून गेलेल्या पैशांपेक्षा, आणि आपल्या दारिद्र्यापेक्षा जास्त भीषण आणि वेदनादायक असते. आयुष्यभर सहन करू शकत नाही माणूस ! याची बाबानी हाय खाल्ली. गप्पगप्प राहू लागले. आयुष्यभर शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत आलेली, नितीमूल्य्यांची ही दारूण चिरफाड त्यांना सहन झाली नाही. कोर्टाचा निकाल काही बाबांनी बघीतला नाही, ते आम्हाला सोडून गेले. वारस म्हणून नंतर आम्हा भावाबहिणींची आणि आईची नावे केसला लागली. न्यायदेवता आंधळी असते ना ? तिला या माझ्या फसवल्या गेलेल्या बाबांच्या डोळ्यातलं पाणी कसं दिसणार ? तिला हवे असतात, कागदपत्र ! तिला तेवढंच दिसत असावं ! ते मात्र भरपूर होते. कोर्टाने तिचा दावा मंजूर केला, आणि तिचा हिस्सा तिला द्यावा, असा हुकूम केला. एवढेच नाही, तर आजपावेतोच्या उत्पन्नाची चौकशी करून, ते द्यावे हा पण आदेश केला. माझी आत्या पण त्या दाव्यांत होती, तिला पण हिस्सा आणि उत्पन्न द्यावे, हा हुकूम झाला.
आईला हा कोर्टाचा निकाल सांगीतला. आईच्या डोळ्यांत पाणी आले. ‘पोरांनो, तिला माझे दागिने तिच्या लग्नात दिले, त्यावेळी वाईट वाटलं होतं, पण एक समाधान होतं, ज्या पोरीला पोटच्या पोरांपेक्षा जास्त सांभाळले, ती सासरी तिच्या घरी जातेय ! जाऊ द्या ! आपण काही वाईट करत नाही. देवाने आपल्याला, ही धर्माची पोर सांभाळायला दिली, द्या तिला ! पण आता फक्त वाईट वाटतंय, ज्या पोरीचे पोटच्या पोरीप्रमाणे केले, तिने तुझ्या बाबांवर केस केली ! अरे, त्या माणसाने मला दिले नाही, पण तिला सर्व दिलं ! आईबापाविना पोर, म्हणून मी पण केलं ! आणि तुमच्या बापाला, माझ्या नवऱ्याला शेवटी तिने कोर्टात खेचावं ? कशासाठी व माय ? कितीतरी जास्त दिलं व तुले ! इतलं खाऊनपिऊन, तुझा हिस्सा जसाच्या तसा ! अन् तू माह्या नवऱ्याले जगातून कायमचा उठवला, हे बरं नाय केलं ! वरच्या कोर्टात जावा ! अजून वरच्या कोर्टात जावा ! विचारा त्या वरच्या देवाला !’ आयुष्यभर चुलीसमोर बसून, मान वर न करता, आपले जीवन चुलीपुढील स्वयंपाकात संपवणाऱ्या आईचा हा अवतार, मला नवीन होता. ती आता चुलीवरच्या जाळावर मुकाट स्वयंपाक करणारी राहिली नव्हती. चुलीतली जाळ आणि त्याची धग, तिच्या ह्रदयांत आली होती. ह्रदय जाळत होती. सरळ नवऱ्याला फसवल्या गेल्याची वेदना, इतक्या सहजासहजी शांत होणार नव्हती.
आम्ही या निकालाविरूद्ध जिल्हा कोर्टात अपील केले. वकील पण चांगले लावले, पण शेवटी या कोर्टात पण, निकाल मात्र विरूद्ध लागला. आईला निकाल सांगीतला. आई एकच वाक्य बोलली, ‘भारतातले वरचे सर्व कोर्ट संपले का ?’ आम्हाला तिचे म्हणणे समजले, आणि आता तुमच्याकडे आलोय. वरच्या कोर्टात, हायकोर्टात अपील करायचे आहे. मी सुन्न झालो होतो. मी कागद घेतले. अपील तयार करतो, म्हणून सांगीतले. त्याचे हे इतके ऐकल्यावर, त्यावेळी त्याला फी सांगावी असे काही वाटले नाही.
गेल्या पिढीतील ही घटना ! आपल्या स्वार्थासाठी मतलबाचे, तेवढेच सत्य सांगायचे, हे दाखवणारी ! आपल्या एकत्र कुटुंबात, त्यातील कर्ता, त्याच्या सदस्यांसाठी कागदपत्रे तयार करून घेतल्याशिवायच खूप गोष्टी करत असतो. आपण पोरांसाठी करतो, बायकोसाठी करतो. आपल्या या आपल्या कर्तव्य करण्याची कागदपत्रे करायची, त्याचा भविष्यात दस्तऐवज म्हणून कोर्टात उपयोग होईल, हा विचार कधी त्याच्या ना त्याच्या डोक्यात येतो, ना मनांत येतो. ही कल्पनाच त्याला सहन होत नाही. ही आपल्या संस्कृतीमधील नाही, तर समाजमनांत रूजणार कशी ? जे समाजात रूजलेच नाही, ते वर तरी कसे येणार ?
अलिकडे या अशा घटना खूप दिसतात. मुलींना एकत्र कुटुंबातील हिस्सा अवश्य मिळायला हवा, तसा कायदाच आहे. प्रश्न आहे, कायद्याव्यतिरिक्त आपल्या संस्कृतीने आपल्या वडिलधाऱ्यांवर जे कर्तव्य पार पाडायला हवे, ही जबाबदारी ठेवली आहे, त्याचे काय ? कायदा आणि त्यातील तत्वे पाळायची, का आपल्या संस्कृतीतील नितीमूल्ये ? कायदा पाळला नाही, तर त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी, समाजाने ही भलीमोठी न्यायव्यवस्था उभी केली आहे. न्यायालयाचा आदेश पाळला नाही, तर त्याचा अवमान होतो. आदेश न पाळणाऱ्याच्या मुसक्या आवळत त्याला आदेश पाळायला भाग पाडले जाते. ऐकले नाही तर तुरूंगाची हवा खावी लागते.
मात्र आमच्या संस्कृतीमधील, ही आमची चिरंतन मानली गेलेली नितीमूल्ये पाळली गेली नाही, तर त्याची तक्रार कोणत्या कोर्टात करणार ? ती पाळली गेली नाही, तर कोणाचाच अपमान होत नाही ? आमच्या या वैभवशाली, चिरंतन संस्कृतीचा पण नाही ? कागदपत्रे नसलेली, कर्तव्ये यापुढे कोणावरच पाळण्याची जबाबदारी नाही ? पुढच्या पिढीने मागच्या पिढीला असे फसवले, तर मुकाट सहन करायचे ? कोर्टाच्या फेऱ्या आपण आणि आपल्यानंतर आपल्या वारसांनी आयुष्यभर मारत रहायच्या ? पदराचे पैसे खर्च करून ? माणसाची कुतरओढ होते, ती इथं ! आपल्या अशा खूप प्रश्नांची उत्तरे, हा आपला समाज, लबाड माणसांच्या वागण्यातून शोधत असतो, पापभीरू आणि सरळ माणसांसाठी ! त्यांना न्याय मिळावा म्हणून !
© ॲड. माधव भोकरीकर
(आपल्याला पोस्ट शेअर करावी, असे वाटले तर अवश्य शेअर करा.)

23.2.2020