Tuesday, October 3, 2017

करवीरनिवासी 'महालक्ष्मी' !

करवीरनिवासी 'महालक्ष्मी' ! 

आज अश्विन शुद्ध द्वितीया ! शारदीय नवरात्राचा दुसरा दिवस !
आपल्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी मानले गेले अर्धे पीठाची 'वणीच्या सप्तश्रृंगी मातेची', खान्देशचे माहेर असलेल्या अंबाबाईची प्रार्थना काल केली !
आज करवीरनिवासी 'महालक्ष्मी' ! कोल्हापूरला निवास करत असलेल्या या महालक्ष्मीवर आम्हा सर्वसामान्यांचा जास्तच लोभ ! हे महालक्ष्मी माता, पूर्वीपासूनच धनधान्य व समृद्धी आम्ही कायमच तुझ्याकडे मागत आलेलो आहे. आजच्या काळात, तर तुझ्याशिवाय आम्हाला काहीही दिसत नाही की काय, अशी आमची अवस्था झाली आहे.
माझ्यासारख्याच काय, पण आम्हा सर्वांचीच कायम मनापासून इच्छा असते, की तुझा निवास कायमच आपल्याकडे असावा. मात्र तुझे वैशिष्टय म्हणजे ही 'चंचलता' ! ती मला मात्र अनुभवू देवू नको, ही प्रार्थना ! कायमच माझ्याकडे समाधानाने निवास कर, माझ्यावर कृपा कर !
मला कल्पना आहे की, तुझ्या या नको असलेल्या चंचलतेचा मला अनुभव येवू द्यायचा नसेल तर, तुझ्या आपल्या भक्तासाठी नेहमीच अटी असतात. कबूल आहे मला तुझ्या अटी ! त्या तर पूर्वीपासूनच यथाशक्ती पाळतोय ! दुसऱ्याच्या संपत्तीकडे, धनाकडे पापदृष्टीने पहाणार नाही. ती किंवा कोणतीही संपत्ती गैरमार्गाने आपल्याला मिळावी ही अपेक्षा करणार नाही. फार पूर्वीच शपथ घेतलेल्या - 'सत्यं वद, धर्मं चर' या वचनाचे पालन करेल ! ते फक्त यथाशक्ती पालन करण्याची मला शक्ती व बुद्धी दे ! माझे मन चळू देवू नको !
सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥
सर्वाबाधाविनिर्मुक्तो धनधान्यसुतान्वित:।
मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय:॥
सर्वाबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि।
एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम्॥
जय त्वं देवि चामुण्डे जय भूतापहारिणि ।
जय सर्वगते देवि कालरात्रि नमोऽस्तु ते ॥
देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखम्।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥
शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे ।
सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥
महिषासुरनिर्नाशि भक्तानां सुखदे नमः ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥
दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो स्वस्थै: स्मृता मतिमतीव शुभां ददासि ।
दारिद्र्य दु:ख भयहारिणि का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदाऽऽ‌र्द्रचित्ता ॥

दिनांक २२ सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment