Tuesday, October 3, 2017

रोहिंग्यांच्या विषयाबद्दल

रोहिंग्यांच्या विषयाबद्दल

सध्याच्या गाजत असलेल्या रोहिंग्यांच्या विषयाबद्दल, तसेच या पूर्वी झालेल्या अफगाणिस्थानातील बुद्धाच्या आणि विविध देवतांच्या मूर्ती फोडण्याबद्दल, येथील तसेच इतर मुस्लीमबहुल देशातील आणि मुस्लीमबहुल भागातील, किंवा आपल्या देशातील विविध भागातील अशा स्वरूपाच्या नियमित घडण्याऱ्या घटना जर आपण पहिल्या तर या सर्व जगताला काय ओरडून ओरडून सांगतात ? फुकटचा आदर्शवाद जोपासण्यात काही अर्थ नाही.
आपल्यांत घडणाऱ्या घटना या अयोग्य आहेत, तुमच्या जीवावर उठणाऱ्या आहेत, तुमच्याबद्दल विश्वास संपविणाऱ्या आहेत हे सांगणारे मुस्लिम धर्मातीलच लोक जोपावेतो हिरीरीने, त्यांच्या धर्मातील पुराण मतवादी लोकांचा विरोध करून पुढे येत नाहीत आणि त्यांना विरोध करत नाही, तो पावेतो इतरांनी याबद्दल उठाठेव करणे म्हणजे -- 'शेजारच्या घरी ढमढम वाजे, आणि हिचे कपाळ कुंकवासाठी खाजे' ! अशी परिस्थिती आहे ! याचा फारसा काही उपयोग होत नाही.
आपल्यासारख्या कोणीही केलेल्या कामाचा परिणाम हा त्यांच्यांत अनावश्यक हस्तक्षेप समजला जातो, त्याला तुम्ही आम्ही काहीही नाव दिले तरी ! कोणत्याही देशाच्या सुज्ञ राज्यकर्त्यांना हाच विचार डोळ्यासमोर ठेवून आपले देशहिताचे धोरण आखावे लागणार आहे. सर्वत्र एकसारखाच अनुभव यायला लागला की मग विचार करणे सुरु होईल कारण मग स्वतःच्या जीवनमरणाचा प्रश्न असेल ! सध्या दुसऱ्याचे काहीही होवो आपल्यास मिळाले पाहिजे हाच विचार आहे म्हणून ही समस्या आहे.

दिनांक १९ सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment