Wednesday, June 13, 2018

‘All are equal but some are more equal!’

‘All are equal but some are more equal!’

जी मंडळी तिथं म्हणजे जम्मू-काश्मिरला, आसाम वा बंगाल वा उत्तरप्रदेशातील काही भागांत, हो सध्याच्या राहीलेल्या आपल्या भारतातील भागातच, दि. १५ ऑगस्ट, १९४७ नंतरच्याच भारतात म्हणतोय मी ! कधी राहिलेली आहेत, वा आजपण तिथं कशीबशी जीव मुठीत धरून रहात आहेत त्यांना विचारा; हो, किंवा अगदी यांना म्हणजे, तेथून जी पळून आलेली आहेत आपल्या जीवाच्या भितीने, वा हाकलून दिलेली आहेत त्यांना, ‘आपल्या लोकशाही मानणाऱ्या भारत देशात’ आणि आपल्या ‘सूज्ञ समाज बांधवांनी’ !
या अशा भोगलेल्यांना विचारा, त्यांचा त्यावेळचा नित्य अनुभव ! विचारा त्यांना आठवणी ! पुन्हा जायचे का तेथे हे पण विचारा ! जायला तयार नसतील, तर का तयार नाही, ते पण विचारा ! आपल्या अंतर्मनाच्या समाधानासाठी विचारा, अगदी सर्वांना प्रामाणिकपणे विचारा. सत्य जाणून घ्यायचे म्हणून विचारा, तुमची इच्छा असेल तरच विचारा बरं ! मग तो सांगतोय ते खरे वा खोटे, याची ‘नीरक्षीरविवेकाने’ खात्री करा ! वस्तुस्थिती समजायला तो अनुभव जास्त महत्वाचा, हे ज्ञान जास्त भरवशाचे म्हणून महत्वाचे !
त्यांना गेल्या कित्येक वर्षांत काय व कसा अनुभव आला असेल, याचे परिणाम आपण देशभर असलेल्या निर्वासितांच्या रूपात गेली कित्येक वर्षे पहात आहोत. न्याय मिळावा म्हणून कटोरा घेऊन न्यायाची भीक मागणारे कधीपासूनचे रांगेत उभे आहेत. ‘न्यायदानाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे’ हे न्यायशास्त्रातील तत्व बिचाऱ्यांना काय माहीत असणार ? त्यांची अजूनही श्रद्धा आहे, की उशीरा का होईना, पण आपल्याला न्याय मिळेल ! मात्र यांतील काही जे सूज्ञ होते, त्यांनी काळाची पावलं म्हणजे या राज्यकर्त्या भूतांची ‘उलटी पावलं’ ओळखली ! - आणि ज्यांनी या आपली ‘राजधर्म’ पाळणाऱ्यांची लबाडी ओळखली होती, त्यांनी तर तर हा विषय ‘एक्स्पायरी डेट’ झालेला विषय आहे म्हणून यांचा नाद सोडून दिला आहे. अर्थात राज्यकर्त्यांनी पण हा विषय ‘काळाचे घड्याळ उलटे फिरवतां येणार नाही’ म्हणत सोडून दिलेला आहे. त्यांना नवा विषय हवा आहे, राज्यप्राप्तीसाठी ! न्याय मिळाला पाहीजे हे कोणाला मनापासून वाटतेय हो ?
खरी भारतीय संस्कृती पाळणाऱ्यांच्या दृष्टीने राजा म्हणून आदर्श हे कर्तव्यकठोर प्रभू रामचंद्र आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहे, महाराणा प्रताप आहे ! न्यायदानासाठी अजूनही त्यांच्यापुढे न्यायनिष्ठूर न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांचा आदर्श आहे ! हे असावे असे वाटणारी थोडीफार मूर्ख मंडळी आहे, हीच काय ती अजूनही समाधानाची बाब !
—— पण यांना, या मूर्ख भारतीयांना, या देशाला आपली माता मानणाऱ्यांना, या संस्कृतीला आपली मानणाऱ्यांना काय सांगणार ? आपल्या ‘भारतीय राज्य घटनेत’ सर्व समान मानले आहेत हो ! पण आम्ही कुठं वागतोय तसं ? आणि वागणार पण नाही तसं !
आम्ही म्हणजे आमच्यातील काळाची पावले ओळखणाऱ्यांनी, त्यांच्यासाठी सोयीचा अर्थ कधीचाच, स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच, लावलाय - ‘All are equal but some are more equal!’

१४. ४. २०१८

No comments:

Post a Comment