Wednesday, June 13, 2018

कोणीही कोणाचा राजीनामा मागीतला नाही

कोणीही कोणाचा राजीनामा मागीतला नाही.

बऱ्याच वर्षांपूर्वी, साधारणत: २८-३० वर्षांपूर्वी, पुण्याला आय्. एल्. एस्. लॉ कॉलेजला आलो होतो, एल्एल्. एम्. ची परिक्षा द्यायला. भारतीय राज्यघटनेचा पेपर होता. सकाळी बहुतेक दहा-साडेदहाला पेपर सुरू व्हायचा. प्रश्नपत्रिका मिळाली आणि ती वाचून मी उत्तरे लिहायला लागलो. येथील पेपर इतपत कठीण असायचे की खरोखर अभ्यास केला असेल तरच लिहीता येतील, नाहीतर तुमच्याजवळ पुस्तक दिले तरी तुम्ही उत्तर लिहू शकणार नाही.
साधारणत: पंधरा मिनीटांत गलका सुरू झाला. ‘सिलॅबस बाहेरचा पेपर ! कसा काय काढला ? रद्द करा. पेपर देवू नका !’ वगैरे. त्यावेळी सुपरवायझर म्हणजे कॉलेजकुमार असलेले किंवा नुकतेच कॉलेज संपलेले असेच किंवा अशाच असायच्या. पेपर देणारे हे काही आमच्यासारखे फ्रेश म्हणजे एल्एल्. बी. नंतर लगेच पुढे प्रवेश घेणारे, तसेच कसलीही घाई नसल्याने रमतगमत परिक्षा देणारा नोकरवर्ग ग्रुप मधले किंवा काही करमत नसल्याने परिक्षा देणारे वगैरे सर्व प्रकारचे होते. गलका जसा वाढला तसा मी मोठ्याने बोललो, ‘ज्यांना द्यायचा नसेल त्यांनी देवू नका. मात्र ज्यांना द्यायचा असेल त्यांना देवू द्या. परिक्षा द्यायला आम्ही पाचशे किलोमीटरवरून आलो आहे.’ नंतर मग काहींनी उत्तरपत्रिका लिहील्या तर काहींनी परत केल्या.
दीडदोन तासाने मग काही तरी निरोप पुणे विद्यापीठाकडून आला, ज्यांना पेपर द्यायचा असेल त्यांनी द्यावा. हाच पेपर विद्यापीठ सर्व पेपर संपल्यावर अमुक दिवशी घेणार आहे. ज्यांना त्या वेळी द्यायचा असेल तर त्यांनी त्यावेळी द्यावा. दोन्ही वेळा दिला तर ज्यावेळी जास्त मार्क्स मिळाले असतील, ते धरले जातील. मी हा यावेळेस जरी चांगला लिहीला होता, तरी पुन्हा दिला. शंका नको. नंतर बऱ्यापैकी गुण मिळाले व पास झालो.
हे आठवण्याचे कारण म्हणजे - यासाठी त्यावेळी कोणीही कोणाचा राजीनामा मागीतला नाही.

३१. ३. २०१८

आनंद राजाध्यक्ष यांनी केलेला हिंदी भावानुवाद

पुरानी बात है, होगी 28-30 साल पुरानी । मैं पुणे आया था; वहाँ आई. एल. एस. कॉलेज में एल्एल्. एम् के परीक्षा देने । पेपर का विषय था - भारतीय राजयघटना । सुबह दस - साडेदस बजे पेपर शुरू होते थे। तो मेरे हाथ में पेपर आ गया और उसे पढ़कर मैंने उत्तर लिखने शुरू किए । तब पेपर काफी कठिन होते थे । अगर आप ने पढ़ाई की हो तो ही उत्तर लिखना मुमकिन था अन्यथा हाथ में पाठ्यपुस्तक थमा दें तो भी आप उत्तर लिख न पाते ।
अंदाजन 15 मिनट में शोर चालू हो गया । यह तो बिलकुल आउट ऑफ सिलैबस है । कैसे निकाला ऐसा पेपर । एक्जाम रद्द करो, कोई नहीं लिखेगा पेपर ! इत्यादि नारे शुरू हुए । उस समय सुपरवायजर भी ऐसे कोई कडक कर्मचारी नहीं हुआ करते थे, अक्सर कॉलेज खत्म हुए फ्रेशर होते थे । एल्एल्. एम् परीक्षा देनेवाले भी बहुत सिरियस किस्म के छात्र कम ही होते थे। कई लोग नौकरी करनेवाले थे, जिनको कोई जल्दी नहीं थी । कुछ टाइम पास वाले भी थे । और कुछ मेरे जैसे भी थे जिनको एल्एल्. बी के बाद एल्एल्. एम् की परीक्षा देनी थी।
जब शोर बढ़ने लगा तो मैंने ऊंची आवाज में कह दिया - जिन्हें पेपर नहीं देना है वे ना दें। लेकिन जिन्हें देना हैं उन्हें देने दीजिये । परीक्षा देने मैं पाँच सौ किलोमीटर से आया हूँ । उसके बाद कुछ लोगोने पेपर लौटाए, लेकिन जिन्हें पेपर देने थे उन्होने लिख दिये ।
डेढ़ दो घंटों के बाद पुणे विद्यापीठ से कोई संदेश आया । जिन्हें पेपर देना है वे दे सकते हैं, बाकी यही परीक्षा विद्यापीठ सब पेपर खत्म होने के बाद फलाने दिन को लेगी। जिन्हें तब देना हौए तब दे सकते हैं । और अगर दोनों समय देना चाहे तो जिसमें अधिक गुण मिले हों वे ग्राह्य माने जाएँगे । मैंने ठीक जवाब दिये थे, फिर भी मैंने दूसरी बार भी पेपर दिया, कोई गुंजाइश न बचे। अच्छे मार्क्स मिले, पास हुआ ।
यह सब इसलिए याद आया कि इसके लिए किसी ने भी किसी का इस्तीफा नहीं मांगा था ।
Advocate Madhav Bhokarikar जी की मराठी पोस्ट का हिन्दी भावानुवाद ।

No comments:

Post a Comment