Wednesday, June 13, 2018

वधूवरपित्याचा कल्पिलेला संवाद

कमीत कमी लोकांना बोलवायचे असा वधूपित्याच्या निष्कारणच हट्ट कारण आर्थिक परिस्थिती ही अडचण नाही, मात्र हा असा स्वभावच ! तर या निमित्ताने सर्व नातेवाईक, मित्रमंडळींच्या भेटीगाठी होतात, जुन्या संबंधांना उजाळा मिळतो, तर काही नवीन होतात; हा वरपित्याचा आग्रह !
यांचा कल्पिलेला संवाद -
वधू - काही कोणाला जास्त बोलवायच्या फंदात पडू नये. येणे-जाणे किती उस्तवार ? हल्ली प्रत्येकालाच कामं फार, ते सोडून कसले येताहेत ! बरं पात्र जास्त सांगून ठेवा आणि नाही आली तेवढी मंडळी, तर अन्न वाया जायचं ! केटरर्स पैसे थोडीच सोडणार आहे ?
वर - येतात हो सगळे नीट बोलावले की अगत्याने ! प्रेमाने येतात ! ठीक आहे, शंभर बोलावले तर ऐंशी तरी येतातच. हजारचा अंदाज घ्या, मी हजार पत्रिका छापल्यात ! वाटलं कमी आहेत, तर अशावेळी पत्रिका कमी पडल्या तरी लगेच छापून मिळतात, ती अडचण नाही.
वधू - येणार नाही हजार माणसं ही ठीक ! पण सर्व आले हजार तर ?
वर - नुसत्या हजार पत्रिका पाठवल्या तर कदाचित येणार नाही, हे बरोबर ! तुमचे अन्न वाया जाणार नाही, हे नक्की !ते जायला नको म्हणून नेहमीची आमची पद्धत !
वधू - कोणती पद्धत !
वर - पत्रिकेचा ‘ड्रॉफ्ट’ बघीतला का ? त्यांत ‘चुलीस निवते’ लिहावं लागते, लिहीलेलं आहे ते. तसं जर नसेल तर शिक्का बनवून घ्यावा लागतो, प्रत्येक पत्रिकेवर उठवण्यासाठी ! मग गॅरेंटी घ्या, हजार मंडळी येतीलच ! जास्त पण कमी नाही.
(वधूकडचे कोण असतील आणि वराकडचे कोण असतील, हे लिहीलेलं नाही. प्रत्येकाला विचार करण्याचे व अंदाज करण्याचे स्वातंत्र्य आहे.)

७. ४. २०१८

No comments:

Post a Comment