Wednesday, June 13, 2018

दिखाव्याने काही साधत नाही

दिखाव्याने काही साधत नाही

उन्हाळयात व इतर वेळी पण लग्नकार्य, मौंजी, कार्यक्रम, समारंभ होतात. पत्रिका द्यायला समक्ष यायला हवे हा काहींचा काही वेळा हट्ट असतो. अर्थात काही ठिकाणी प्रत्यक्ष जावेच लागते आणि काही ठिकाणी इच्छा असूनही शक्य नसते. जाण्याची इच्छा नसेल तर गोष्ट वेगळी, पण यजमानाचा येण्याजाण्यात वेळ व पैसा खूप जातो, तो इतर ठिकाणी त्याला सत्कारणी लावता येतो.
त्यात हल्ली पोस्टाने साधं टपाल मिळत नाही, असे बरेच वेळा घडते. पत्रिका पाठवणाऱ्याला वाटते की पत्रिका पाठवली, आणि ज्याला पाठवली असते, त्यांना ती न मिळाल्याने वाटते की मुद्दाम पाठवलेली नाही. गैरसमज वाढतात ! इतकी सर्व महत्वाची कामे आता, ऑन लाईन’ होतात तर हे काम का होवू नये आणि आपण करू नये ?
एकदा माझ्या मित्राच्या मुलाचे व मुलीचे लग्न एकेक आठवड्याच्या अंतराने होते. तो परदेशी असतो. त्यावेळी त्याचा परदेशी असतांना मेल व फोन आला. पत्रिका नंतर पाठवतो म्हणाला. त्याला येथील टपाल किंवा पत्रिका मिळण्याचा गोंधळ सांगीतला. पत्रिका ही रजिस्टर किंवा कुरियरने पाठवावी लागेल हे सांगीतले. यापेक्षा ई-मेलने पाठव हे सांगीतले, कारण लग्नाचे ठिकाण समजले पाहीजे. शेवटी त्याने दोन्ही पत्रिका ई-मेलने पाठवल्या. मला एकाच लग्नाचे वेळी जाणे शक्य होते, त्याची त्याला कल्पना दिली व लग्नाला गेलो.
—— मान, आदर, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व मनांत असावे लागते, त्याच्या दिखाव्याने काही साधत नाही.

२. ४. २०१८

No comments:

Post a Comment