Wednesday, June 13, 2018

भगवान त्रिविक्रम - शेंदुर्णी

भगवान त्रिविक्रम - शेंदुर्णी 

आज औरंगाबादहून जळगांवी निघालो होतो. अजिंठा गांव ओलांडले. घाट उतरू लागलो. नेहमीपेक्षा आज जास्त वाहने असावीत, असे वाटले. जवळपास घाट होत आला. तोच थांबावे लागले. पुढे सर्व वाहने ठप्प होती. बरीचशी मंडळी गप्पा मारत उभी होती. त्यांत ड्रायव्हर व गाडीमालक पण असावेत. तेवढ्यात त्याने आमच्या गाडीवानास सांगीतले, ‘निदान दोन तास, काही खरं नाही. आसारीची ट्रॉली रस्त्यावर आडवी झालीय. दोन्हीकडून वाहने ठप्प आहे.’
असाच निदान अर्धा तास गेला असावा, मार्ग निघण्याचे कसलेही लक्षण नाही. मग गाडी कशीबशी मागे घेऊन, पुन्हा उलटे अजिंठा गांवाकडे, मग तेथून उंडणगांव वगैरे लहानमोठी गांवे, वस्त्या, वाड्या करत सोयगांवला आलो. तेथून शेंदुर्णीला !
शेंदुर्णीला भगवान त्रिविक्रमाचे जुने हेमाडपंथी मंदीर आहे. मागे एकदा काही वर्षांपूर्वी दर्शन घेतले होते. पुन्हा दर्शनाची इच्छा होती, पण इतक्या जवळ असून योग येत नव्हता. आज ही अशी अडचण उभी करून भगवान त्रिविक्रमाने मला, त्याच्या दाराशी बोलावले. त्याच्या दर्शनाशिवाय पुढे जाण्याची इच्छाच होईना. दर्शन घेतले. मंदीराचा जिर्णोध्दार सुरू आहे, हे पाहून बरं वाटलं !

२५.२. २०१८


No comments:

Post a Comment