Thursday, June 27, 2019

ओ रात के मुसाफिर, चंदा जरा जगा दे
काही वेळा सक्तीची विश्रांती, सक्तीचे अडकून जाणे होते. या दरम्यान बरेचसे नुकसान होते, पण काही किरकोळ लाभ पण होतात. गेल्या काही दिवसांपासून इकडे, जळगांवकडे आहे. काल दुपारी ‘चोरी चोरी’ हा चित्रपट बघीतला आणि त्यातील, ‘रसिक बलमा’ हे नितांतसुंदर गाणं ऐकायला मिळालं, बघायला मिळालं.
आज ‘मिस मेरी’ नांवाचा चित्रपट लागला होता. मीनाकुमारी, जेमिनी गणेशन, किशोरकुमार, जमुना आणि ओमप्रकाश हे कलावंत आहेत त्यात ! संगीत हेमंतकुमार आणि गीत राजेंद्र कृष्ण यांची ! चित्रपटातील सर्वच गीते छान !
मला नेहमी आठवायचे ते, ‘ओ रात के मुसाफिर, चंदा जरा जगा दे’ हे ! मोहंमद रफी व लता मंगेशकर यांनी गायलेले. त्यांनी संगीताच्या व पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे.
हेमंतकुमार यांच्याबद्दल बोलायचे तर, कवयित्री शांताबाई शेळके यांच्या कोळीगीताचे नांव निघाले की, हेमंतकुमार असतातच !
माझ्याजवळ १० पैशाला चित्रपटगीतांचे चोपडे मिळायचे, तशी खूप होती. त्यांत हे गाणं माझ्या मनांत खूप वर्षांपासून रूतून बसलं होतं अक्षरश: !
आपल्यासाठी, आपल्या आनंदासाठी —-

19.5.2019


No comments:

Post a Comment