Thursday, June 27, 2019

ज्यावेळी घटना घडली, त्यावेळी अस्तित्वात असलेला कायद्यानुसार व परिस्थितीनुसार चौकशी करून शिक्षा दिली जाते किंवा निर्दोष सोडले जाते. हे जगातील सर्वमान्य तत्व आहे.
आज सोयीचे वाटते, म्हणून वाटेल त्या घटना उकरून काढून, त्यांवर वादंग माजवणे, हे सुजाण नागरिकाचे लक्षण नाही आणि शहाणपणाचे तर अजिबात नाही, फक्त सोयीचे असू शकेल !
प्रभू रामचंद्रांनी लोकप्रवादास्तव देवी सीतेचा, आपल्या पत्नीचा त्याग केला होता.
वीर हनुमानाने कोणताही ‘पासपोर्ट’ न काढता लंकेत प्रवेश मिळवला होता.
पितामह भीष्माचार्यांनी सती द्रौपदीला ‘सौभाग्यवती भव’ हा आशीर्वाद दिला, त्याचवेळी ‘मला युद्धात, माझ्या हातात शस्त्र असतांना हरवू शकेल, असा वीर या पृथ्वीतलावर नाही, तर ‘शिखंडीस’ पुढे कर. मी स्त्री विरूद्ध लढणार नाही.’ हा आपल्या मृत्यूचा उपाय सांगीतला.
छत्रपती शिवरायांनी अफजलखानास भेटीस बोलावून, त्याची पूर्वकृत्ये लक्षात ठेवून वाघनखाने कोथळा बाहेर काढून, स्वराज्याच्या शत्रूचा अंत केला होता. औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर पडतांना, साधु-संत, फकीर यांना मिठाई वाटण्याच्या निमित्ताने पलायन करून आपली सुटका करून घेतली.
घटना पुष्कळ आहेत. आपला इतिहास भव्यदिव्य आहे. नाही त्या व्यक्तीस नाही ते नियम लावून वाद करू नका. समाजात दुही फैलवू नका. मग विषय रामाचा असो किंवा नथूरामाचा असो !

17.5.2019

No comments:

Post a Comment