Thursday, June 27, 2019

आमचे वडिलधारी मित्र, Ramesh Zawar यांनी माझ्या एका पोस्टवर प्रतिक्रिया दिली. ती थोडी गुन्हेगारशास्त्र व न्यायशास्त्राबद्दल असल्याने, थोडे सविस्तर लिहीले. ते आपल्यासाठी पण -
तत्कालीन आरोपींनी त्यांच्यावर जेव्हा न्यायालयाने आरोप ठेवले असतील, त्यावेळी आणि पुरावा संपल्यावर, त्या पुराव्यांमध्ये जे आढळले असेल त्यावेळी, प्रश्न विचारले असतील. अशावेळी त्यावेळचे तत्कालीन आरोपींचे न्यायालयाला दिलेले स्पष्टीकरण महत्वाचे असते. त्यानंतर मात्र त्यांनी गुन्हा केला नाही, याबद्दल पुरावा दिला असेल, त्यातून समजू शकते.
आरोपींनी जर पुरावा दिला असेल, तर यांचा सहभाग कसा होता किंवा नाही, हे समजते. मात्र या केसमधे यातून फारसे मिळणार नाही, कारण गुन्हा नथूराम गोडसे यांनी गुन्हा कबूल केला होता. त्यांनी त्यांच्या बचावासाठी पुरावा, साक्षीदार दिले नसतील. मग त्याची न्यायालयीन लढाईतील माहिती मिळण्याचा मार्ग खुंटतो. मग प्रश्न उरतो, त्याने त्यावेळी असे का केले, याचे जर न्यायालयांत अथवा जाहीरपणे दिलेले निवेदन ! यातून त्याची या कृत्याबद्दलची भावना, तसेच इथपर्यंत मानसिकता का गेली असावी हे आणि तत्कालीन परिस्थितीत ही नेतेमंडळी कशी वागत होती, आणि त्यावेळी या विचारांच्या जनतेला काय अपेक्षित होते, लक्षात येवू शकते. कोणता विचार बरोबर किंवा चूक, हे आपण सांगण्याची आवश्यकता नाही, ते कायद्यात आहे आणि ते आपल्यावर बंधनकारक आहे.
या व अशा स्वरूपाच्या घटना समाजात नित्य होत असतात. फक्त व्यक्ती वा समाज मोठा असला, की गवगवा करायचा किंवा नाही, हे त्या समाजाची अथवा विचारधार्ची ‘तत्कालीन पुढारी मंडळी’ ठरवतात. सध्या पण हेच सुरू आहे. या वागण्याशी न्यायलय अथवा कायदा, याचा संबंध नसतो. महात्मा गांधी किंवा ज्याचे नांव पण कोणाला माहिती नाही, याची हत्या ही एकाच कलमाखाली येते.
आज पण जवळच्या नातेवाईकाचा प्रत्यक्ष खून करून, खुनी पोलीस स्टेशनमधे हजर होतात, आणि त्या मागील कारणमिमांसा देतात. कायद्याच्या दृष्टीने त्याला फारसे महत्व नसते, कारण सदोष मनुष्यहत्या यांस जन्मठेप व मृत्युदंड, हीच शिक्षा आहे. अशा सनसनाटी खटल्यांत मृत्युदंड हीच शिक्षा दिली जाते. तो खटला मग ‘नथुराम’चा असो का ‘कसाब’चा असो, कारण न्याय हा माणसांकडून दिला जातो, देवाकडून नाही. माणसांच्या सर्व चांगल्या-वाईट भावभावना इथं पण लागू असतात.
आपल्याला यामागील कारणमिमांसा जाणून घ्यायची नाही, तर घाणेरडे राजकारण करायचे आहे. कोणाची पण हत्या करणे, हा दंडनीय अपराधाच, यांत शंका नाही. त्याचा योग्य तो पुरावा न्यायालयासमोर मांडला, तर आरोपीला कायद्याप्रमाणे शिक्षा होणारच, यांत शंका नाही. इथं या खटल्यांत पण हेच झाले. मात्र अशावेळी नथूरामची भूमिका काय होती, याबद्दल कोणीही बोलत नाही. इथं कोणाचीही भलावण नाही, आरोप-प्रत्यारोप नाही, तर निखळ न्यायशास्त्रावरचे विचार आहेत. —— पचनी पडतात का पहा !

18.5.2019


No comments:

Post a Comment