Thursday, December 20, 2018

दोन हमाल -

दोन हमाल -
त्यांत पहिला लाल डगलेवाला, मुकाटयाने झपझप आणि न बोलता चाललेला ! त्याच्या डोक्यावर आणि हातात बऱ्यापैकी सामान !
त्याच्या मागोमाग, चांगल्या कपड्यातील दुसरा ! त्याच्या दोन्ही हातात बऱ्यापैकी पिशव्या ! पॅंट सांभाळत आणि तोंडाचा पट्टा चालवत, पुढील लाल डगल्यामागे, पाय ओढत, कसेतरी झपझप चालण्याचा प्रयत्न करत असलेला !
‘कितनी बार बोला, की इतना सामान मत लिया कर । घरमेंसे निकलते टाईम जितना था, उनसे ढेडगुना हैं अब । क्या लिया हैं इतना ?’
—- या दुसऱ्या हमालाच्या बडबडीला कवडीइतकी किंमत आणि प्रतिक्रिया न देता, फक्त -
‘भागो मत, जरा धीरे चलों । तुमको क्या समझता हैं, घरमें क्या लगता हैं तो ।’ असे म्हणत निवांतपणे पण घाईने चालत आहे असे दाखवत, हातात पर्स घेवून दोन हमालांच्या मागे चालणारी मालकीण !
—- नुकतेच बघीतलेले रेल्वे स्टेशनवरील दृश्य !

१६. १२. २०१८

No comments:

Post a Comment