Thursday, December 20, 2018

‘सवाई गंधर्व महोत्सव’

यंदा ‘सवाई गंधर्व महोत्सव’ दोन दिवस का होईना, पण ऐकायचा हे ठरवलं ! कारण अस निघालं, ते न टाळता येण्यासारखं, लग्नकार्याचे ! पण विशेष योग म्हणजे, यासोबतच यंदा ‘सवाई गंधर्व महोत्सव’ हा योग येतोय ! खूप वर्षांपूर्वी ऐकला होता. पं. भीमसेन जोशी, पं. फिरोज दस्तूर, विदुषी गंगूबाई हनगल, उ. बिस्मील्ला खान ही मंडळी होती !
पुण्याला पहाटेच निघालो. नेहमीप्रमाणे बसच्या सामान ठेवण्याच्या रॅकमधे, अगोदरच्या प्रवाशाने आठवणीने त्याची, पाणी पिवून अर्धवट राहीलेल्या बाटल्या, बंद करून व्यवस्थित आडव्या ठेवून गेलेला होता. नंतर येणारा, आपली बॅग उधळून, आपल्याच डोक्यावर पडू नये, या काळजीपोटी, ती बाटली अगदी पार रॅकच्या टोकापर्यंत हात घालून काढतो आणि बॅग ठेवून, सुटकेचा निःश्वास सोडतो - हे त्याला माहीत असावे. मी प्रवासात अशा बाटल्या आजपर्यंत ठेवलेल्या नाही. वेळोवेळी त्या तेथून काढल्या आहेत आणि स्वत:चे डोके आपल्याच सामानापासून वाचवत, स्वच्छता राखली आहे. आज पहाटे पण हे काम केलं आणि बॅग ठेवली.
नगरच्या पुढे कुठेतरी, बस चहापाण्याला थांबली. कानावर सूर छान ऐकू आले. जवळ जावून बसलो. कानावर जुन्या छान गाण्यांच्या चालीत, साईबाबांची भजनं ‘बांधली’ होती अक्षरश: ! —- ते जावू द्या ! पण त्यामुळे ‘भजन बिना’ हे ‘रफू चक्कर’ मधले गीत आठवलं ! ‘पायोजी मैने’ हे संत मीराबाईचे भजन आठवलं !

१२. १२. २०१८

No comments:

Post a Comment