Thursday, December 20, 2018

खाण्याचे व दाखवण्याचे दांत

ज्या पक्षाचे, खाण्याचे व दाखवण्याचे दांत वेगळे असतात, तेथील जनता आपोआप हुशार बनते आणि सत्तापालट नियमीतपणे करते. तिचा कोणत्याही पक्षावर, नेत्यांवर विश्वास राहीलेला नसतो.
विश्वास गमावलेल्या पक्षांच्या राज्यात, अशी जर जनता असेल, तर जबाबदारी मग पक्षावर, त्यांच्या नेत्यांवर येते की ‘ते बोले तैसा चाले’ या विचाराचे आहेत, हे त्यांनी दाखवून द्यावे लागते. मग अशा वेळीच जनता दूरदृष्टीची लागते, जी अपवादानेच असते, की त्याच पक्षाला हितासाठी पुन्हा संधी देईल.
एखाद्या पक्षाला सत्तास्थापनेची पुन्हा पुन्हा संधी पण मिळते, त्यावेळी दोन्ही शक्यता असतात, जनता जशी दूरदृष्टीची समजली जावू शकते, तशी ऱ्हस्वदृष्टीची पण समजतां येते; कारण सरकारच्या प्रत्येक धोरणाचे परिणाम जनतेला समजायला वेळ लागू शकतो. जनतेच्या आकलनाच्या मार्गात सत्ताधारी पक्षाचे विरोधक असतात, ते पण दिशाभूल करू शकतात. कारण सत्ताप्राप्ती हे प्रत्येक राजकीय पक्षाचे ध्येय, लक्ष्य असते. त्यासाठी मार्ग कोणता याचे सोयरसुतक कोणाला, अपवादानेच असते.
सध्या नुकत्याच झालेल्या विधानसभांचे निकाल विचारात घेता, जनतेला आपल्याबद्दल विश्वास वाटावयास हवा, इतपत तरी जनतेत जागृती निर्माण करावयास हवी, तसेच सर्व भेदाभेदांच्या पलिकडे जावून, राजकीय पक्षांनी जनता सुशिक्षीत करावयांस हवी ! याची आवश्यकता आहे, निकोप व सुदृढ लोकशाहीसाठी ! —- कोणता पक्ष करणार आहे हे ?

१३. १२. २०१८

No comments:

Post a Comment