Thursday, December 20, 2018

आपल्या घरासाठी पैसे कमावणे हे महत्वाचे आहेच, कारण घरातील सदस्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्या घराच्या कर्त्यावर असते. मिळवलेले पैसे आणि होणारा खर्च लगेच दिसतो. त्याचा हिशोब करता येतो. हे खूप सोपं आहे गणित !
— पण एखाद्या खंबीर गृहिणीचे घर आणि घरातील माणसं सांभाळणे, याची किंमत तुम्ही पैशांच्या स्वरूपात करू शकत नाही. एखादे कुटुंब उर्जितावस्थेला आपल्या अपार कष्टाने, अपार त्यागाने ती आणते, त्याची किंमत व हिशोब कसा करणार ? घरातील मुलांची व सर्वांचीच घेतली जाणारी काळजी ! नवीन पिढीला त्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी लावले जाणारे वळण ! —— आणि त्यासाठी आपल्या भवितव्याचे सोडले जाणारे अर्ध्यं ! आपण कल्पना नाही करू शकत !
जगातील कोणताही कॅलक्युलेटर याचा हिशोब करू शकत नाही. कोणत्याही संगणकांत हा हिशोब करता येईल असे सॉप्टवेअर नाही आणि ना जगातील कोणताही संगणक तज्ञ असे सॉफ्टवेअर बनवू शकत ! जगातील कोणताही कायदा असा नाही की तो या कामाचे योग्य, नेमके मोल करून त्याचा योग्य मोबदला देईल.आपल्याला फक्त याचा अंदाज करता येतो.

५. १०. २०१८

No comments:

Post a Comment