Sunday, October 20, 2019

गोष्ट, घटना तशी जुनी आहे.

गोष्ट, घटना तशी जुनी आहे.
एकदा मी असाच एका शिक्षकांना, पेपर तपासायला मदत म्हणून, त्यांच्याकडे तपासणीसाठी आलेल्या पेपरमधून १० वी चा, सहामाही किंवा पूर्वपरिक्षेचा संस्कृतचा पेपर तपासला होता. एका विद्यार्थ्याच्या पेपरबद्दल त्याने मुद्दाम काळजीपूर्वक तपासण्यास सांगीतले. याचे कारण विचारल्यावर समजले, की ही विद्यार्थिनी प्रत्येक शिक्षकाशी एक-दोन नाही, तर अर्ध्या गुणासाठी पण निष्कारण भांडत असते. आकांडतांडव करते, त्यामुळे शिकवण्याचा वेळ निष्कारण वाया जातो आणि शिक्षकांबद्दल इतर विद्यार्थ्यांत गैरसमज पसरतात. स्वभावच तसा तिचा !
हे समजल्यावर मात्र, मी अत्यंत काटेकोर व व्यवस्थितपणे त्या विद्यार्थिनीचा पेपर तपासला. काटेकोरपणे, अगदी तंतोतंत व योग्य गुण दिले. आवश्यक तिथे, गुण कापले व कमी दिले.
सुट्या संपल्यावर, विद्यार्थ्यांना त्या शिक्षकांनी वर्गात सर्व विद्यार्थ्यांचे हे तपासलेले पेपर दिले. पेपर मिळाल्यावर तिने मार्क्स बघीतले, तर अपेक्षेपेक्षा अतिशय कमी ! मग तिचे नेहमीप्रमाणे आकांडतांडव झाले, पण यावेळी फरक पडलेला होता; कारण प्रत्येक ठिकाणी तिचे गुण का कापले, याचे उत्तर व योग्य स्पष्टीकरण त्यांच्याकडे तयार होते. तिच्याकडे यांवर बोलण्यासारखे काहीही नव्हते. एरवी इतर विद्यार्थ्यांना लढावू वाटणारी मुलगी, ही लढावू नसून आकांडतांडव करणारी आणि आक्रस्ताळ्या स्वभावाची आहे, हा तिचा स्वभाव सर्वांच्या पुराव्यासह लक्षात आला.
—- कोणाला काय निष्कर्ष काढायचा असेल तो काढा.

29.6.2019

No comments:

Post a Comment