Sunday, October 20, 2019

आज आपल्या निसर्गदत्त आवाजाला, अमाप कष्टाची आणि मेहनतीची जोड दिलेल्या आवाजातील असंख्य गीते ज्या गायिकेने गायिली, त्या मराठमोळ्या गायिकेचा, श्रीमती आशा भोसले यांचा आज जन्मदिन ! कितवा जन्मदिन ते मी लिहीणार नाही. अहो, स्वराला का कुठे वय असतं ? का सूर कधी म्हातारा होतो ? आम्हा सर्वांना हा सूर, या स्वरांच्या स्वामिनीकडून प्रत्यक्षांत निरंतर ऐकायला मिळो.
त्यांनी गायलेल्या विविध भाषांतील असंख्य गीतांपैकी, मी विशेषकरून ऐकली ती हिंदी आणि मराठी भाषेतील गीते ! मराठी भाषेतील असंख्य लावण्या त्यांनी आपल्या खास आवाजाने गाऊन अजरामर केलेल्या आहेत. गीतकाराच्या शब्दांतील भाव, हे ती भाषा देखील ज्याला समजणार नाही त्याला त्यातील भाव आपल्या स्वरातून समजावून देणाऱ्या या श्रीमती आशा भोसले !
ही सुंदर लावणी उतरली आहे ती, गीतकार कै. ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून ! डोलायला लावणारे, कमालीचे संगीत दिले आहे ते कै. राम कदम यांनी ! चित्रपट आहे - 'सांगत्ये ऐका' आणि --------- आधारलेली आहे 'कालिंगडा' रागात !
बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला
चुगली नगा सांगू ग माझ्या म्हाताऱ्याला
माझ्या शेजारी तरूण राहतो
टकमक टकमक मला तो पाहतो
कधी खुणेने जवळ बाहतो
कधी नाही ते भुलले ग बाई, त्याच्या इशाऱ्याला
आज अचानक घरी तो आला
पैरण, फेटा नि पाठीस शेमला
फार गोड तो मजसी गमला
दिला बसाया पाट मी बाई, त्याला शेजाऱ्याला
घरात नव्हते तेव्हां बाबा
माझा मजवर कुठला ताबा
त्याची धिटाई तोबा तोबा!
वितळू लागे ग लोणी बाई, बघता निखाऱ्याला
त्याने आणिली अपुली गाडी
तयार जुंपून खिलार जोडी
मीही ल्याले ग पिवळी साडी
वेड्यावानी जोडीने ग गेलो, आम्ही बाजाराला
येण्याआधी बाबा परतून
पोचणार मी घरात जाऊन
मग पुसतील कानां पाहून
काय तेव्हा सांगू मी ग बाई, त्याला बिचाऱ्याला

8.9.2019


Image may contain: Jayant Seetaram Kulkarni Shirtikar, sitting and indoor

No comments:

Post a Comment