Sunday, October 20, 2019

श्री. Uday Joshi यांचा जुना, त्यांनी तीन वर्षांपूर्वी लिहीलेला लेख वाचनांत आला. लेख चांगला आहे, पण वाचतांना दोन तीन शंका आल्या वाचतांना. मला दोन-तीनच आल्या म्हणजे इतरांनी जर अजून, सूक्ष्म वाचन केले तर त्यांना जास्त पण येऊ शकतील. त्यांनी आपापले मत मांडायला अजिबात हरकत नाही.
आलेल्या शंका -
१. पाच ग्रॅम सुवर्णभूषण म्हणजे फारच, जुन्या रितीभाती जरी असल्या, तरी चुकीच्या असल्या तर टाकून द्यायला हव्यात.
२. खर्चाला डरेल तो कोकणस्थ कसला ? — हा कोणता अलंकार असावा ? अतिशयोक्ती का चेतनागुणोक्ती का अजून कोणता, अद्याप उजेडात न आलेला ?
३. तिखट जिभेचे चार-पाच कोकणस्थ बाऊन्सस - यांत द्विरूक्ती दोष येणार नाही का ?
बाकी पुण्याहून येणारी मंडळी, आहेराचा विषय आणि दंगा - यांत सुसंगत साखळी आहे. संभाव्य धोका लक्षात आला, हे बरे झाले !

23.7.2019

No comments:

Post a Comment