Sunday, October 20, 2019

आज १५ आॅगस्ट ! भारताचा स्वातंत्र्य दिन !

आज १५ आॅगस्ट ! भारताचा स्वातंत्र्य दिन !
असंख्य ज्ञात आणि अज्ञात देशभक्त क्रांतिकारक, सत्याग्रही, समाजसुधारक यांच्या अथक परिश्रमातून, बलीदानातून त्यांनी आपल्या सर्वांसाठी, त्यांच्या पुढील पिढीसाठी मिळवलेले हे स्वातंत्र्य !
नुकतीच महाराष्ट्र, कर्नाटकांत आलेला पूर ही दुर्दैवी नैसर्गिक आपत्ती व संकटे जरी यंदा आली असली, तरी त्यातून जिद्दीने उभे रहात, आम्ही भारतीय जगापुढे आमचा एकात्मतेचा, संकटात खंबीर रहात, त्याला तोंड देण्याचा आदर्श ठेवू !
आपणा सर्वांना आणि सर्वांच्या पुढील पिढीसाठी आयते व विनासायास मिळाले आहे. त्यांनी पुढच्या पिढीसाठी दिलेला स्वातंत्र्याचा हा वारसा, आपण सांभाळला पाहीजे, जपला पाहीजे. ते स्वातंत्र्य मजबूत करायला हवे. कोणाची हिंमत व्हायला नको, की तो आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघेल, आपल्या देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आणेल !
आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मला अजून विशेष व जास्त आनंद झालाय ! त्याचे कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तो म्हणजे ऋषिमुनींपासून या देशाचा भाग असलेला काश्मिर, आपल्या भारताच्या मस्तक मानले गेलेले हे काश्मिर ! आमच्या देशाचा अभिन्न हिस्सा असलेले काश्मिर, स्वातंत्र्यानंतर परकीय आक्रमकांनी लचके तोडल्याने जखमी झाले. त्याला आम्हाला थोडे वेगळं नसतांना पण विशेष असं, बाजूला असलेले दाखवावे लागलं ! आमची ती भळभळती जखम, या वर्षी थोडी भरली, सावळली ! अजून पूर्ण बरी झाली नाही, पण पावलं पडताहेत त्या दिशेने ! —- हो, काश्मिरचे कृत्रिम वेगळेपण संपुष्टात आलंय ! तो आता आमच्यात समरस झाला !
—- आता वाट पहातोय, परकीय शत्रूंनी अन्याय्य मार्गाने बळकाविला उरलेला भाग, हा आपल्यासोबत कधी येतोय याची ! मला खात्री आहे, ती वेळ आता फार दूर नाही. आपल्या अखंड व एकीच्या भावनेपुढे, हे तकलादू आक्रमण आणि त्यामुळे निर्माण झालेली, खंडीतता आम्ही आमच्या दूरदर्शीपणाने, मुत्सद्दीपणाने, हिंमतीने आणि सामर्थ्याने दूर करू !
वंदे मातरम् !! जय हिंद !! भारत माता की जय !!!

15.8.2019

No comments:

Post a Comment