Sunday, October 20, 2019

आपल्याला कोणी इथं प्रतिसाद दिला नाही, की

आपल्याला कोणी इथं प्रतिसाद दिला नाही, की त्याला ‘अनफ्रेंड’ करायचे हा संकुचितपणा झाला. कित्येक जण प्रतिसाद देत नाही, त्याची वेगवेगळी कारणे असू शकतात.
ज्यांचे काही लिहीणं मनाला प्रसन्नता देतं, ज्ञान देतं, माहिती देतं, त्यांनी आपल्याला प्रतिसाद नाही दिला, तरी काय हरकत आहे.
तसेच ज्यांचा व्याप मोठा आहे आणि तरी जे बऱ्यापैकी इथं लिखाण करतात, त्यांना इकडंतिकडं बघायला फारसा वेळ मिळत नाही, त्यामुळे ही अपेक्षा अवास्तव होऊन जाते.
काही जण इथं लिहून याचा संपूर्णपणे राजकीय वापर करत असतात. आपलं आयुष्य हे फक्त राजकीय विचार करण्यासाठीच आहे का, हे पण ठरवावं. कित्येकवेळा वेगळ्या राजकीय विचाराची माणसं, ही माणूस म्हणून चांगली असतात. अशा वेळी आपण त्यांना मुकतो.
माझी कित्येक जुनी मंडळी इथं भेटली, त्यांचा वर्षभरात एकदोन वेळा प्रतिसाद असतो.
काही वेळा, समोरचा आपला वाचक असतो, पण आपल्या जास्त जवळ येण्याची त्याची इच्छा नसते, किंवा स्वभाव पण नसतो. आपलं लिहीलेले सर्वच सर्वांना पटेल वा आवडेल, हे अपेक्षिणे चूक आहे. कित्येक वेळा आपण असं काही लिहीलं आहे, हे त्याच्या गांवी पण नसते. काही वेळा आपण वेगवेगळ्या प्रकारचे लिहीत असू, तर त्यांवर प्रतिसाद देणारी मंडळी पण वेगवेगळी असतात. अर्थात काही जण इथं आपल्या जवळचे झाले असल्यास, त्यांचा सर्व पोस्टवर सहभाग असतो.
माझ्याच बाबतीत सांगायचे तर - कायद्यासंबंधीची पोस्ट, संगीतावरील पोस्ट, राजकीय वाटणारी पोस्ट आणि पारावर हाणायच्या गप्पाटाईप पोस्ट वगैरे याला प्रतिसाद वेगवेगळ्या मंडळींचा असतो. काही जण मात्र मला इथं नेहमी सोबत करणारे पण मिळाले आहेत.
आणि शेवटचे सर्वात महत्वाचे, म्हणजे ही व्यक्ती आपल्या यादीत रहाण्यायोग्य आहे का, हे आपण ठरवावे आणि मग निर्णय घ्यावा !
—- असो. आज डायरी नीव की (नीता दाणी वक्ते) यांनी पोस्ट लिहीली होती. त्यांवर प्रतिक्रिया देतांना सुचलं, कारण बऱ्याच दिवसांनी जुने नांव दिसले, बरं वाटलं !

5.9.2019

No comments:

Post a Comment