Sunday, October 20, 2019

बाली येथील चोरीच्या घटनेबद्दल

बाली येथील चोरीच्या घटनेबद्दल बरीच जण लिहीत आहेच. जे घडले, ते चुकीचेच, त्याचे अजिबात समर्थन नाही.
मात्र याबरोबरच हे लक्षात ठेवायला हवं, की यांत बिचाऱ्या भरतभूमीची काय चूक ? तिचा काय दोष ? तिची लेकरं चोरी करताय, ती तिनं शिकवले की चोरी करा म्हणून ? हिचे पालन करणारे, जे शासक आहेत ना, जे समाजनेते आहेत ना, जे कुटुंबप्रमुख आहेत ना, त्यांच्या वर्षानुवर्षे प्रयत्नाने किंवा दुर्लक्ष केल्याने, ही अशी सवय लागते, अशी वृत्ती बळावते. हे असे केलेले, कोणाला पटतंय ? तिथं काय आणि इथं काय ? इथं तर आपण, साधनाला कमी महत्व देतो, कारण साध्य महत्वाचे ! पैसा असणे, सत्ता असणे महत्वाचे ! तो पैसा कसा आला, ती सत्ता कशी मिळवली, ते महत्वाचे नाही.
लक्षात ठेवा, तुम्ही भूमीत जे पेराल ते उगवते, अगदी दसपटीने नव्हे, तर शतपटीने, सहस्त्रपटीने ! भूमीचा बिचारीचा काय दोष ? तिच्या मातीत पेरणाऱ्यांना विचारा !

31.7.2019

No comments:

Post a Comment