Sunday, October 20, 2019

तिहेरी तलाक’ चे विधेयक मंजूर झाले.

‘तिहेरी तलाक’ चे विधेयक मंजूर झाले. चांगलेच झाले. मुस्लीम महीलांना काही माणूस म्हणून असलेल्या अधिकारांना तरी मान्यता मिळाली.
आता मुस्लीमच नाही, तर सर्व धर्माच्या महिलांनीच शांततेने विचार करा, आणि मनापासून खरे उत्तर द्या. मग त्यावेळी आमच्यात गरिबी आहे, अज्ञान आहे, आपली पुरूषप्रधान संस्कृती आहे, महिला परावलंबी असतात, वगैरे वगैरे अशी कोणतीही कारणे नकोत. महत्वाचे म्हणजे उत्तरासाठी फार दूरवर जायला नको. उत्तर आसपास सापडेल, कदाचित घरात पण सापडेल ! फक्त पहा की -
—— आपल्याकडून आपल्या घरातील, समाजातील महिलाच दुसऱ्या एका महिलेचा, आपण महिलाच आहोत, हे विसरून, किती प्रकारे छळ करतात ? उत्तर भीषण आहे, परिस्थिती विदारक आहे.

31.7.2019

No comments:

Post a Comment