Sunday, October 20, 2019

'आधार कार्ड' हे सरकारच्या, सरकारशी संबंधित असलेल्या विविध संस्था आणि खाजगी संस्था देखील सध्या उपयोगांत आणत आहेत. कोणासंबंधाने असलेल्या, मिळालेल्या अथवा मुद्दाम काढलेल्या माहितीचा उपयोग, पूर्वीपासून सरकारमार्फत जसा चालत आलेला आहे, त्याप्रमाणेच सरकार करण्याची शक्यता जरी जास्त असली, तरी याचे उत्तर काही काळानंतर समजेल.
सरकार आणि सरकारमधील प्रभावशाली पुढारी, अधिकारी हे त्यांच्याजवळ असलेल्या कोणत्याही माहितीचा उपयोग हे त्यांचे, समाजाचे शत्रू संपविण्यात जास्त करून वापरत असते. अपेक्षा आहे की याचा उपयोग हा काही विधायक आणि चांगल्या कार्याकरिता पण होईल.

19.7.2019

No comments:

Post a Comment