Sunday, October 20, 2019

एखाद्या (मूर्खासारख्या किंबहुना मूर्खपणाच्या) पोस्टवर, साक्षीदाराची कौशल्याने उलटतपासणी करतांना विचारलेल्या प्रश्नाच्या दर्जाची, प्रतिक्रिया द्यावी. त्यांवर पोस्टकर्त्याकडून उत्तर अपेक्षित असते. पोस्टकर्ता आपल्या अपेक्षेप्रमाणे त्यांवर उत्तर देण्याच्या फंदात पडणे शक्य नसते, कारण एकतर उत्तर येत नसते किंवा अडचणीचे असते. त्यांचे पितळ उघडे पडणारे असते. आपल्या प्रतिक्रियेवर गर्दी जमा व्हायला लागते. आपण तिथून निघून जातो. ‘नोटीफिकेशन्स’ येत रहातात. थोड्यावेळाने थांबतात.
केव्हातरी आठवण आल्यावर आपल्या प्रतिक्रियेवरील ‘नोटिफिकेशन्स’वरून आपण शोधायला जावे. —- तर तिथं काहीही नसते. त्या पोस्टवर गेल्यावर वाचायला मिळते - ‘Most relevant’ is selected so some comments may have been filtered out.
फार मस्त आहे नाही.

23.8.2019

No comments:

Post a Comment