Sunday, May 10, 2020

आपल्या दांपत्य जीवनांत, प्रत्येकाने, प्रत्येक वेळी, प्रत्येकच गोष्ट बोलून दाखवायची नसते. ती दोघांनाही एकमेकांच्या वागणुकीतून, जाणून पण घेता येते, आणि मन:पूर्वक केलेल्या प्रयत्नाने समजते पण !
सर्वच जण अलिकडच्या, आसपास दिसणाऱ्या नाटक, चित्रपट, मालिकांप्रमाणे आपल्या भावना नाटकीप्रमाणे बोलूनच दाखवू शकतील, किंवा बोलून दाखवतील, असे नाही. त्यांनी बोलून दाखवले नाही, किंवा त्यांना बोलता आले नाही, म्हणून त्यांच्या ह्रदयीची अबोल भावना खोटी नसते, हे पण तितकेच निखळ सत्य असते.
महत्वाचे तर अजून सांगता येईल, की एकमेकांच्या मनांतील भावना, एकमेकांच्या मनांतील विचार, इतक्या वर्षांच्या एकमेकांच्या सहवासाने न बोलता पण, पोहोचवतां येतात, आणि ओळखता पण येतात. लक्षात ठेवायला हवं, की ‘चकाकतं ते सर्वच सोनं नसतं’ हे जितके खरं आहे, तितकंच आपल्या स्तुतीपर वा गोड बोललेलं पण खरं असतं ! असो.
आज रामनवमी ! —- हा विचार मनांत ठेवा ! आपल्या संस्कृतीची आठवण ठेवा मनांत ! सार्थकी लागेल ! दोघांच्याही !
प्रभू रामचंद्र की जय ! रामनवमीच्या आनंद प्रसंगी शुभेच्छा !

2.4.2020

No comments:

Post a Comment