Sunday, May 10, 2020

आपण जर कोणी नेता मानत असू, इथं कोणताही पक्ष हा विषय नाही, तर जनतेने कठीणसमयी त्याचे ऐकायला हवे. समस्या सुटण्यात अडथळे येत नाही. समस्या सोडवण्याचे धोरण, त्याने त्याच्या परिने आणि त्याला मिळालेल्या सल्ल्यानुसार आखलेले असते.
सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत, सर्व मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मार्गदर्शन व मदतीबद्दल चांगली भावना प्रकट केली आहे, ही आकाशवाणीवर मी बातमी काल ऐकली. त्याचे आजपावेतो कोणत्याही मुख्यमंत्र्याने त्याचे खंडन केल्याची बातमी, मी अजून ऐकली नाही.
त्यांच्या चर्चेत काय झाले, हे आपल्यापैकी कोणालाही समजणार नाही. पंतप्रधान यांनी पण, त्यांचे संपूर्ण धोरण व त्याची अंमलबजावणी प्रक्रिया यावेळी चर्चिली असेल, असे मला वाटत नाही. विषय सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट आहे, की कोणताही विषय, हा उपस्थित सर्वांना तितकाच आपला वाटेल, असे नाही. येथील एकमेकांत विविध कारणांमुळे असलेली स्पर्धा, द्वेष, चढाओढ, वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि त्यासाठी करावी लागणाऱ्या वाटेल त्या व वाटेल त्याच्याशी तडजोडी, एकमेकांना छेद देणारे एकमेकांचे हितसंबंध वगैरे अशा कित्येक गोष्टी आहेत, की ज्या एकमेकांच्या विरूद्ध आहेत, आणि पुढेही असतील. ही तात्कालीक अवस्था फार काळ टिकणार नाही, नंतर ही मंडळी एकमेकांशी पुन्हा अशीच वागतील. आता कदाचित फारच वाईट दिसेल, जनमत विरूद्ध जाईल, म्हणून काही जण गप्प असतील ! अजूनही काही जणांची चुकीच्या बाबींना मौन धरून, मूक संमती असते, हे दिसू शकते.
पंतप्रधानांच्या आवाहनाला महाराष्ट्र सरकारने विरोध दर्शवला आहे का ? दोनचार नेत्यांची वैयक्तिक मते, ही समाजाच्या भावना भडकवण्यासाठी असतात. त्यामुळे पक्षाकडे काही मंडळी आकर्षित झाली, तर बरे, ही भावना व उद्देश त्यामागे असतो. यदाकदाचित ते बोलणे अंगावर आले, की पक्षाला, ‘ते त्यांचे वैयक्तिक आहे’ हे म्हणण्याची सोय असते. मात्र धकले, तर गप्प बसता येते, त्याचा लाभ उठवता येतो.
मतितार्थ - ज्या कोणाला कोणाच्याही आवाहनामागील भावना, हेतू शोधायचे असतील, त्यांनी अवश्य शोधावे. त्या आवाहनाने आपली एकी जाणवली व दिसली, असा अप्रत्यक्षपणे लाभ झाला तरी खूप झाले. —- अन्यथा रिकाम्या अवस्थेत घरी असल्याने, पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, तर आपले वैयक्तिक नुकसान तरी काय होणार आहे म्हणा !

4.4.2020

No comments:

Post a Comment