Sunday, May 10, 2020

परशुराम युनिव्हर्सिटी !

परशुराम युनिव्हर्सिटी !
जुन्याचा अर्थ नवीन मंडळी, काय आणि कसा लावतील, सांगता येत नाही. सध्या रामायण व महाभारत मी बघतोय. त्यातील काही गोष्टी मुलांना सांगायला जावे, ते आपल्याला तिसऱ्याच मार्गाला लावतात, हा अनुभव सध्या येतोय.
रामायणात भगवान परशुरामांचा उल्लेख आहे. त्यांच्या पराक्रमाचा प्रचंड दरारा ! नंतर महाभारतात पण पुन्हा तेच ! त्यांनी तयार केलेले शिष्य म्हणजे, भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि कर्ण ! त्यांच्या शिष्यांचा पराक्रम काय सांगणार ? मुलीला शंका, की दोन्हीकडे परशुरामांचा उल्लेख कसा ? ‘इतकी वर्षे कशी काय जगले ते ?’
‘अग ते चिरंजीव होते. आज पण हे सात जण आपल्यात आहेत, असे मानायला हवं ‘ असे सांगत, मी ऐटीत सप्तचिरंजीवांचा श्लोक म्हटला,
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥
मला मुलीकडून उत्तर मिळालं - ‘बाबा, त्यावेळी ‘परशुराम युनीव्हर्सिटी’ असेल, एकदम स्टॅंडर्ड ! आपल्या आय् आय् टी सारखी ! ॲडमीशन मिळत नसतील तिथं ऐऱ्यागैऱ्यांना ! कसून मेहनत करून घेत असतील, म्हणून तयार होत असतील असे विद्यार्थी !’
कोण, कोणाला, कसे आणि कोणत्या भाषेत गप्प करेल काही सांगता येत नाही !

7.4.2020

No comments:

Post a Comment