Sunday, May 10, 2020

‘धर्मेच, अर्थेच, कामेच नातिचरामि’

‘धर्मेच, अर्थेच, कामेच नातिचरामि’ म्हणत अग्नी व देवाब्राह्मणांसमक्ष शपथ घेत, स्विकारलेली सहकारी आयुष्यभर आपल्या सोबत रहावी, ही इच्छा तर असतेच !
आयुष्याच्या नंतरच्या धबडक्यात, आपल्या त्या शपथेपासू सुरू होणाऱ्या प्रवासाचा, आपल्या सहवासाचा हीरकमहोत्सव साजरा करणारी तुलनेने तशी कमी असतात, पण सुवर्णमहोत्सव करणारी व जवळपास जाणारी तशी बरीच असतात.
मात्र कधीतरी अशी कोणाची बातमी ऐकू येते, सर्व संपल्याची ! भरलेल्या कुंडातील पाणी, भरभर निघून जात, हसताखेळता व जिवंत कुंड रिता झालेला दिसतो.
असं, कोणी सोडून गेलं की आठवणींचे दाटून आलेले सुवर्णक्षण, आता नव्याने पुढे पुन्हा येणार नाही, हे वास्तव लक्षात येते. मग घळघळत येतात, काहीवेळा डोळ्यावाटे, तर काही वेळा त्यांना दडवून ठेवावेसे वाटतात.

19.4.2020

No comments:

Post a Comment