Sunday, May 10, 2020

Anyone can put criminal law in motion !

विषय पचापचा डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर कोरोना बाधीत आणि कोरोना संशयीत रुग्णांनी थुंकण्याचा आहे.
जी बाब कायद्याला धरून नाही, ती जर कोणी करत असेल तर, त्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करता येते. तितके आपले शासकीय कर्मचारी सूज्ञ आहेत.
कोणत्या नियमांत, निर्देशांत असे लिहीले आहे, डॉक्टरांवर, तेथील कर्मचाऱ्यांवर थुंकले तरी चालते ? ते कृत्य कायद्याला धरून आहे ? एरवी जर कोणी असे वागले असते, तर ते कायद्याला मान्य आहे का ?---------ही अशी विधाने, केवळ एकमेकांवर नसलेली जबाबदारी, एकमेकांवर अथवा दुसऱ्यावर ढकलणारी आहे. इतकेच नाही तर, पोलीसांच्या वर्तनाविषयी निष्कारण संभ्रम पसरविणारी आहेत ! डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना देखील तक्रार नोंदविता येते, शासनाला देखील स्वतःहून पोलिसांमार्फत तक्रार लिहून घेता येते.
Anyone can put criminal law in motion ! हे कायद्याचे सर्वमान्य तत्व आहे.

2.4.2020

No comments:

Post a Comment