Sunday, May 10, 2020

नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या दंगलीत म्हणा, का भारतात झालेल्या यापूर्वीच्या असंख्य दंगलीत म्हणा, आपण झालंगेलं सर्व गंगेला मिळालं या भावनेने, पुन्हा नव्याने चांगले संबंध ठेवतो, मनांतील कटुता बाजूला ठेऊन ! हे खरं तर, संतमहात्म्यांचेच लक्षण आहे. संत एकनाथ महाराजांचे आणि अनेक संतांची उदाहरणे आपल्या समोर आहे.
असे एका बाजूने सारखेच वाईट अनुभव आले, आणि आपण पण सारखेच चांगले अनुभव दिले, तर हा आपला चांगुलपणा आहे, का मूर्खपणा आहे, हे समजून घ्यावे लागेल.
माझ्यासारख्याला मग ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, आपले मराठी कवि, विंदा करंदीकर आठवतात, त्यांची एक कविता आम्हाला होती, बहुतेक ‘घेता’ या नांवाची ! त्यातील शेवटच्या दोन ओळी इथं देतो -
देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे
—- हे कधी होणार, याची किती दिवस वाट बघायची, यांवर काहीच उपाय नाही का ? महत्वाचे म्हणजे, यांतील देणारा कोणाला समजायचे ? आणि कोणी, कोणाकडून, काय घ्यायचे ? या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत.

28.2.2020

No comments:

Post a Comment