Sunday, May 10, 2020

माझे येथील मित्र श्री. राजेश मंडलिक यांनी, धर्म ही अफूची गोळी आहे असे म्हणतात, याला पुढे नेत चांगला विचार प्रकट केला यांत शंका नाही. मात्र येथील परिस्थतीत ते शक्य आहे, वा किती शक्य आहे ?
त्यांची पोस्ट सुरूवातीपासून वाचत आलो, सिगरेटच्या व्यसनाचा दृष्टांत दिला. मला व्यसन नाही, तरी ती भावना, ते उदाहरण पटलं.
मग पहातापहाता शेवटचा परिच्छेद आला, आणि झाला सगळा गोंधळ ! आपली, माझी सर्वांची इच्छा चांगली आहे, या समाजाबद्दल व देशाबद्दल ! मला शंका नाही.
मात्र प्रयत्न आपण एकट्याने करून भागत नाही. त्या प्रयत्नावर पाणी फेकण्याचे काम कितीतरी सतत करत होते, आहेत आणि रहातील. कोणाचीही टाळी एका हाताने वाजत नाही. इथं तर टाळ्या वाजवण्याचा एक हात हात सरकारचा पण समजतां येत नाही. जनतेत तर टाळी देण्यासाठी आणि तो हात ओढण्यासाठी असंख्य हात आहेत.
संविधान मोठे, का धर्म ? त्यातील पद्धती, नियम व धर्मग्रंथ मोठे आणि श्रेष्ठ का कायदा, हे मुद्दे जिथं सर्वोच्च न्यायालयापर्यंत हिरिरीने जातात. संविधानाचे सर्वोच्च मानले गेलेल्या ठिकाणाबद्दल, आपण काय नाही, ते बोलतो, तिथेच थांबत नाही, तर त्याची महत्ता व ताकद संपविण्याचे जिवापाड प्रयत्न करतो. आपला अधिकार महत्वाचा, तो कसलाही विधीनिषेध न बाळगता उपभोगायचा ! इतर कोणाला काही अधिकार असतात, हेच आपल्याला मान्य नसते. तिथं काय अपेक्षा ठेवणार ?
तरी संत तुकोबाराय यांच्या वचनांचा सध्या विचार करू नका - बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले । अशी पाऊले आपल्याला खरोखर दाखवता येतील ?
Rajesh Mandlik

1.3.2020

No comments:

Post a Comment