Sunday, May 10, 2020

सध्याच्या सक्तीच्या सुटीमुळे, जुन्या मित्रमंडळींशी नव्याने उजाळा देत बोलणं होतंय. यासोबतच इथं फेसबुकवरील जी माझी मित्रमंडळी आहेत, त्यांच्यापैकी काही मित्रांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.हे बोलणे बहुतांशपणे आमच्या एकमेकातील मैत्रीवर आधारलेले होते. त्यामुळे त्यांचेसंबंधी इथं सार्वजनिकपणे लिहीण्याची आवश्यकता नाही.
मात्र येथील, काही मित्रमंडळी अशी असतात, की आपले जरी मित्र असले, तरी त्यांचे काम, हे सार्वजनिक स्वरूपात असते, आपणा सर्वांसाठी असते. त्यांतील एक जेष्ठ मित्र म्हणजे, सध्या बेळगांव निवासी असलेले, श्री. संजय देशपांडे, हे सतारवादक !
कै. पं. विष्णुपंत धर्माधिकारी, या ग्वालियर गायकी जपणाऱ्या गायकाकडे यांनी सतारवादनाचे धडे घेतले, परिणामी गायकी अंगाने, ख्याल अंगाने सतारवादन हे त्यांचे खास वैशिष्ट्य बनले. आकाशवाणी व दूरदर्शन यांवर यांच्या सतारवादनाचे कार्यक्रम होत असतात. आपल्या वादन वैशिष्ट्यांस पूरक अशी सतार निर्मिती, त्यांनी विकसीत केली. विविध पुरस्कारांनी यांना सन्मानित केले गेले आहे.
यांची अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगता येईल, की नवोदीत कलाकारांना उपलब्ध नसलेल्या संधी, यांची त्यांना जाणीव असल्याने, यांनी आपले स्वत:चे रेडिओ केंद्र पण सुरू केले आहे. संपूर्णपणे शास्त्रीय संगीताला वाहिलेले, हे रेडिओ केंद्र आहे. इथं नवोदीत कलाकारांचे, प्रथितयश कलाकारांचे कार्यक्रम होत असतात.
बोलताबोलता गप्पांमधून आठवण निघाली, ती पुण्याचे आमचे फेसबुकवरील दुसरे जेष्ठ मित्र डाॅ. रविंद्र गाडगीळ यांची ! जळगांवशी असलेला त्यांचा संबंध असल्याने, ते मला जवळचे वाटतात, हे पण सांगीतले.
माझ्या सुमारे पंचवीस वर्षांपूर्वीची बेळगांव मुक्कामाची आठवण सांगीतली. त्यांना इथं येण्याचे निमंत्रण दिले. त्यांनी मला पण, जिव्हाळ्याने तिकडे बोलावले. काही असो, पण त्यांच्या निमंत्रणावरून एकदा बेळगांवी जायला हवे.
आपल्यासाठी त्यांनी सतारीवर वाजवलेला, राग - दरबारी कानडा !

2.4.2020

No comments:

Post a Comment