Saturday, June 3, 2017

टॅक्सिवाल्याशी गप्पा

टॅक्सिवाल्याशी गप्पा

काल सायंकाळी दिल्लीला उतरलो. टॅक्सीत बसलो, माझ्या नेहमीच्या उतरण्याच्या जागेचा पत्ता सांगीतला. तेवढ्यात त्या टॅक्सीड्रायव्हरशेजारी एक जण येवून बसला. 'कोण आहे?' विचारल्यावर, 'कोई नहीं, मेरा भाई हैं, अभी श्रीनगरसे आया हैं।' असे सांगीतले. मी काही बोललो नाही.
टॅक्सीड्रायव्हरचा भाऊ, श्रीनगरहून आला आणि ते पण विमानाने ! त्याच्याकडे आणि त्याच्या एकंदरीत अवताराकडे व त्या दोघा 'भावांमधले' संभाषण ऐकून ते माझ्या पचनी पडेना ! मी न राहवून विचारलेच, 'अरे भाई, श्रीनगर क्या बोल रहा हैं ?' 'क्या बोलेगा साब, मोदीने इन लोगोंका कौनसा आदमी मारा, जैसा उनका --- मारा ! तबसे सब रास्ते बंद करते, रास्तेमें पत्थर जमा करके पथराव करतें, सब हैदोस, यहीं चल रहा हैं । मैं दस सालसें वहॉं हूँ, लेकिन इस साल बहुत ही ज़्यादा हैं । फ़ौजी बोलते है, 'हमें पूरी पॉवर दो, हप्तेमें सब मामला सीधा करते ।'
'श्रीनगरसें कब बैठे?' मी विचारले. 'दोपहरमें साब, जम्मू आये और फिर यहॉं । पहेली बार बैठा, पैटमें जैसी हवा घूसती हैं, जब उपर उठता हैं तो ।' त्याने उत्तर दिले. 'तो फिर ?' मी संभाषण चालू ठेवले. 'क्या बोलू साब, हम बिहारके । वहाँ हम ईट कारखानामें मुन्शी हैं । पेट सबदूर भेजता हैं । हमारे मालिककी पच्चीस गाडीयोंके शीसे इन्होने पथरावसे तोड डाले । मुझे कुछ हो जाता तो, तकलीफ़ होती । कैसा तो भी हम श्रीनगर हवाईअड्डेपे आयें, रास्तें में वो मिले थे । पुलिस और फ़ौज भी क्या करेगी ?' तो जीव वाचल्याच्या, सुटकेचा वि:श्वास टाकून पण संतापाने बोलत होता. मला त्याची भावना व कळकळ समजली.
'सीधा रास्ता हैं, भारतके लोगोंको रहनेके लियें खुला कर दो वहॉं । एक सालमें समस्या हल हो जायेगी ।' मी बोललो. 'साब, पहेलेसे वहॉं सरदार लोग हैं, तो ठीक हैं । आप कहॉंसे ?' तो म्हणाला. 'मैं महाराष्ट्रसे' मी उत्तर दिले. 'ये कौनसी आँकडेवाली धारा है, वो निकलेगी तो हो जायेगा । तो सरदारजी और हम 'युपी बिहारीवालेंही' काफ़ी हैं । तुम मराठा लोगोंकी ज़रूरत नहीं ।' मला महाराष्ट्राचा उत्तर भारतात या बाबतीत अजूनही दरारा असल्याचे पाहून बरे वाटले.
माझे ठिकाण जवळ येत होते, 'साब, ये मोदी हैं, तो ठीक हैं । दोनोंकी भाषा दोनोंको बराबर समजती हैं ।' माझे उतरण्याचे, मुक्कामाचे ठिकाण आले होते.

२६ ऑक्टोबर २०१६

No comments:

Post a Comment