Saturday, June 3, 2017

उठाये जा उनके सितम

उठाये जा उनके सितम

काही वेळा अचानक एखादे गाणे आठवते आणि ऐकावेसे वाटते, गुणगुणावेसे वाटते, अगदी त्याशिवाय चैन पडत नाही. अलीकडील नवीन गाणी माझ्या फारशी कानावर पडत नाही म्हणून लक्षात राहत नाही का लक्षात राहण्यासारखी नसतात म्हणून कानावर पडत नाही, या 'दोन पिढ्यांमधील निरंतर वादात' मी पडत नाही. सामोपचाराने चालावयास हवे, किंबहुना ऐकावयास हवे !
आज सकाळी मला असेच एक गाणे आठवले, गुणगुणतो आहे. आपल्यासाठी देण्याचा मोह आवारात नाही. दैवदुर्लभ आवाजाची देणगी मिळालेल्या 'लता मंगेशकर' यांनी गायलेले हे गीत 'अंदाज' या 1949 या सालातील ! हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर भर देवून आपले चित्रपटसंगीत देणारे संगीतकार, 'नौशाद' यांचे संगीत या गीताला लाभलेले आहे आणि गीतकार आहे 'मजरुह सुलतानपुरी' ! सावकाराजवळ संतमहात्म्याला गहाण ठेवावा लागलेला राग म्हणून प्रसिद्ध असलेला राग - 'केदार' या रागावर हे गीत आधारलेले आहे आणि 'दादरा' या तालाचा अप्रतिम आधार राहिलेला आहे !
उठाये जा उन के सितम और जिये जा
यूँ ही मुस्कुराए जा आँसू पिये जा
 उठाए जा उन के सीतम ...
यही है मुहब्बत का दस्तूर ऐ दिल, दस्तूर ऐ दिल
वो गम दे तुझे तू दुआएं दिये जा
उठाये जा उन के सितम ...
कभी वो नज़र जो समाई थी दिल में
समाई थी दिल में
उसी एक नज़र का सहारा लिये जा
उठाए जा उन के सितम ...
सताए ज़माना या सितम ढाये दुनिया
सितम ढाये दुनिया
मगर तू किसी की तमन्ना किये जा
उठाये जा उन के सितम और जिये जा
यूँ ही मुस्कुराए जा आँसू पिये जा
उठाये जा उन के सितम ...

२४ सप्टेंबर २०१६

No comments:

Post a Comment