Saturday, June 3, 2017

बहारो मेरा जीवन

बहारो मेरा जीवन

आज एकदम आठवण झाली ती 'राजेश खन्नाची' आणि त्याच्या चित्रपटांची ! हो, चित्रपट रसिकांनी मनापासून स्विकारलेला 'सुपरस्टार' स्वर्गीय राजेश खन्ना याची चित्रपटाच्या प्रवासाची सुरुवात ज्या चित्रपटापासून झाली, तो चित्रपट - 'आखरी खत', सन १९६६ मधील हा चित्रपट ! नायिका 'इंद्राणी मुखर्जी' हे गीत गातगात झाडांभोवती, फुलांभोवती आपले मनांतील भाव व्यक्त करत असते, तिला कल्पना नाही की आपल्याला नायक राजेश खन्ना बघत आहे. संपूर्ण गाणे झाल्यावर ते समजते आणि मग तिची स्त्रीसुलभ, स्वाभाविक प्रतिक्रीया !
त्यातील 'बहारों मेरा जीवन भी सँवारों -----' हे 'कैफी आझमी' यांचे हृदयाला स्पर्शून जाणारे गीत ! त्याला तितक्याच हळुवारपणे, अतिशय सुरेल स्वरांत बांधणारे संगीतकार 'खय्याम' ! मग या स्वररम्य गुंफणाला गाणारा आवाज तितक्याच तोलामोलाचा हवा, बस - लता मंगेशकर यांचा ! हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील 'पहाडी' या रागावर आधारलेली ही रचना, मला फार आवडते !
बहारों मेरा जीवन भी सँवारों, बहारों
कोई आए कहीं से, यूँ पुकारो, बहारों ...
तुम्हीं से दिल ने सीखा है तड़पना \- २
तुम्हीं को दोष दूंगी, ऐ नज़ारों, बहारों ...
सजाओ कोई कजरा, लाओ गजरा \- २
लचकती डालियों तुम, फूल वारो, बहारों ...
रचाओ मेरे इन हाथों में मेहंदी \- २
सजाओ माँग मेरी, या सिधारो, बहारों ...
न जाने किस का साया दिल से गुज़रा \-२
ज़रा आवाज़ देना राज़दारो, बहारो ...

२८ ऑक्टोबर २०१६

No comments:

Post a Comment