Friday, June 2, 2017

अशीच एक दुष्ट इच्छा


अशीच एक दुष्ट इच्छा

मी पण शेतकरी आहे. शेतातील माल कापणे परवडत नाही असे बाजारांत त्या मालाचे भाव होते तेंव्हा, अशी परिस्थिती मी पाहीलेली आहे. आता देखील शेतकऱ्यांच्या अडचणी कमी झाल्या आहेत असाही विषय नाही. शेतकऱ्यांच्या अडचणी, इतर सर्व व्यावसायिकांच्या लोकांच्या अडचणी आणि त्याची कारणे हा स्वतंत्र विषय आहे. शेतकरी हा जगाला अन्न देणारा अन्नदाता आहे, त्याच्या सर्व अडीअडचणी समजावून घेऊन, त्याचे खरेखुरे आणि त्याच्या अडचणी दूर होतील असे कायमचे उपायच शक्यतो केले पाहिजे यांत अजिबात दुमत नाही, मी देखील त्याच मताचा आहे. हे फक्त शेतकऱ्यांचेच नाही तर सर्वांसाठी पण करायला पाहीजे ते शासनाचे अनेक कामांपैकी एक महत्वाचे कामच आहे.
-------पण आपले म्हणणे ऐकत नसेल तर याला मारले पाहीजे अथवा हा मरायला पाहिजे ही भावना काय दर्शविते ? हा आपल्या जातीचा नाही म्हणून याला मारले पाहीजे अथवा हा मरायला पाहिजे ही वृत्ती काय दर्शवते ? हा आपल्या पक्षाचा नाही म्हणून याला मारले पाहीजे अथवा हा मरायला पाहिजे ही विचारसरणी काय दाखविते ? जनतेने निवडून दिलेल्या व्यक्तीला आपल्याला घटनेने सांगितलेल्या मार्गाने घालविण्यापेक्षा याला मारले पाहीजे अथवा हा मरायला पाहिजे ही मानसिक तयारी काय सांगते ? ------------------ या सर्व घटना एक आणि एकच दाखवतात तुम्हाला स्वतःच्याच मनाला विचारावे, खरेखुरे उत्तर आपल्याला मिळेल. येथे उत्तर द्यायची गरज नाही.
काल देखील यावर मी लिहिले होते. याविचारांशी आपण सहमत नसाल, 'याला मारले पाहीजे अथवा हा मरायला पाहिजे' हीच भावना आपली असेल आणि हाच विचार बरोबर आहे, हाच एकमेव मार्ग आहे आणि असे आपले विचार असूनही आपण जर योगायोगाने माझ्या मित्र यादीत असाल तर ----आपल्याला एक विनंती आहे, आपला आणि माझा येथील झाला तेवढा मित्र म्हणूनचा सहवास खूप झाला. यापुढे मला तो येथील मित्र म्हणून असलेला सहवास ठेवायचा नाही. आपले विचार आणि माझे विचार हे पटण्यासारखे नाहीत, आपणांस मी येथे मित्र म्हणून ठेवण्यापेक्षा ठेवू नये असे आपल्याजवळ खूप आहे. जगात आपल्या विचासरणीची मंडळी खूप आहेत. आपण त्यांच्या जवळ जावे, माझे जवळ माझे मित्र म्हणून येथे राहू नये. यांत कोणाचाही वैयक्तिक अवमान करायचा हेतू नाही तर असे विचार असणारी माणसे समजल्याने मी माझ्यापुरता घेतलेली काळजी आहे.
शुभ प्रभात ! परमेश्वर आपले भले करो !

२६ मे, २०१७

No comments:

Post a Comment