Friday, June 2, 2017

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

आज दिनांक २८ मे ! स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिन ! भारत सरकारने अतिशय सुंदर माहितीपट तयार केलेला आहे, आपल्यासाठी तो येथे देत आहे.
आपली भूमिका स्पष्टपणे आपल्या 'माझे मृत्युपत्र' या कवितेत मांडताना त्यांनी सांगितलेली आहे.
धर्मार्थ देह बदलो ठरले नितान्त
ते बोल-फोल बालिश नचि बायकांत
ना भंगली भिउनिया धृति यातनान्ना
निष्काम कर्मरति योग ही खंडिला ना ll
ज्या होती तैं प्रियजना सह आण-भाका
केल्याची सत्य कृतिने अजि ह्या विलोका
दीप्तानलात निज मातृ-विमोचनार्थ
हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलो कृतार्थ ll
हे मातृभूमि तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाक्-विभव ही तुज अर्पियेले
तुंतेंची अर्पिली नवी कविता वधूला
लेखां प्रति विषय तूची अनन्य झाला ll
त्वत्-स्थंडिले ढकलिले प्रिय मित्र-संघा
केलें स्वये दहन यौवन देह-भोगा
त्वत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा
तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा ll
त्वत्-स्थंडिली ढकलली गृह-वित्त-मत्ता
दावानालात वहिनी नव-पुत्र-कांता
त्वत्-स्थंडिली अतुल-धैर्यनिष्ठ बंधू
केला हवि परम कारुण पुण्यसिंधू ll
त्वत्-स्थंडिला वरी बळी प्रिय बाळ झाला
त्वत्-स्थंडिला वरी अता मम देह ठेला
हे काय बंधू असतो जरी सात आम्ही
त्वत्-स्थंडिलीच असते दिधले बळी मी ll
संतान ह्या भारतभूमिस तीस कोटि
जे मातृभक्ति सज्जन धन्य होती
हे आपुले कुल ही तय मध्ये ईश्वरांश
निर्वंश होउनी ठरेल अखंड वंश ll
कीं ते ठरों ही अथवा न ठरो परंतु
हें मातृभू अम्ही असो परिपूर्ण हेतु
दीप्तानलात निज मातृ-विमोचनार्थ
हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलो कृतार्थ ll
संतान ह्या भारतभूमिस तीस कोटि
जे मातृभक्ति सज्जन धन्य होती
हे आपुले कुल ही तय मध्ये ईश्वरांश
निर्वंश होउनी ठरेल अखंड वंश ll
कीं घेतले व्रत न हे अम्ही अन्धतेने
लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्ग माने
जे दिव्य-दाहक म्हणोनी असावयाचे
बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे ll
त्यांनी आपल्या देशासाठी केलेल्या कार्याची आपण आठवण ठेवू या ! त्यांच्या कार्याशी कृतज्ञ राहू या !
आत्मबल
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।
अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।
लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।

२८ मे, २०१७

No comments:

Post a Comment