Saturday, June 3, 2017

एक विचार

एक विचार 

असे खूप जणांच्या मनांत येते, वेगवेगळ्या विषयांसंबंधांनी येते की समाजाला आपण नकोसे झालेले आहोत.
१. जर ती व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या कमकुवत असेल मात्र सामाजिकदृष्टया ताकदवान असेल तर समाजात त्याचे विरुद्ध काहीही सकारात्मक सांगता येत नाही, चुकून किंवा काही कारणाने सांगीतले तर दंगलसदृश परिस्थिती निर्माण होते आणि हे राज्यकर्त्यांना परवडणारे नसल्याने चुकीच्या बाबींचा संरक्षण द्यावे लागून योग्य विचार मांडणाऱ्यावर कारवाई केली जाते.
२. जर ती व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सक्षम असेल मात्र सामाजिकदृष्टया कमकुवत असेल तर समाजात त्याचे विरुद्ध काहीही नकारात्मक, खोटे सांगता येते, अगदी मुद्दाम सांगीतले तरी काहीही फरक पडत नाही आणि हे इतर समाजाला की जे राज्यकर्त्यांना सोयीचे आहेत असे परवडणारे असल्याने त्या चुकीच्या बाबींचा संरक्षण द्यावे लागून ज्याचे विरुद्ध काहीबाही बोलले जाते त्याचे खच्चीकरण केले जाते.
या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक भावना सहन करणारे हा देशदेखील सोडून जाण्यास मागेपुढे पाहत नाही कारण ते कोणत्याही समाजाचे असले तरी बुद्धिवान असतात - 'विद्वान सर्वत्र पूज्यते' ! सध्या भारतात काही वेगळे घडते आहे का ?
बाकीच्यांना नाईलाजाने रहावे लागते आणि या समाजाला त्यांना या देशाचे नागरिक म्हणून कसेही असले तरी सांभाळावे लागते, सर्व सोयी-सुविधा द्याव्या लागतात. कोणाचा पायपोस कोणात नाही अशा परिस्थितीकडे आपण जाऊ लागतो.

२८ जानेवारी २०१७

No comments:

Post a Comment