Saturday, June 3, 2017

शब्दसंवाद - सतीश कुलकर्णी

शब्दसंवाद - सतीश कुलकर्णी

दोन दिवसांपूर्वी, या रविवारी मी जळगांवला गेलो होतो. माझे नेहमीचे आॅफिस आटोपले आणि मग श्री. प्रदीप रस्से यांचेकडे गेलो. गप्पागोष्टी झाल्यात ! त्यांच्या संग्रही असलेली पुस्तके बघून, चाळून झाली. मग परत निघालो आणि त्यांनी एकदम आठवणीने एक पुस्तक भेट दिले. 'शब्दसंवाद' या नांवाचे व श्री. सतीष स. कुलकर्णी यांनी लिहीलेले !
औरंगाबादला परततांना मला ते वाचल्याशिवाय चैन पडेना ! मग बसल्याबसल्या पुस्तक नेहमीप्रमाणे चाळायला सुरूवात केली. पुस्तकाचे मुखपृष्ठ आपले 'फेसबुक' मित्र श्री. देवीदास पेशवे यांनी सुंदर तयार केले आहे. शेवटचे पान वाचले, प्रसिद्ध समीक्षक व लेखक द. भि. कुलकर्णी यांचे ! सुंदर होते, लेखकाच्या व पुस्तकातील लेखाच्या अपेक्षा वाढवणारे होते. मग कुतूहल वाढले, मनोगत वाचले लेखकाचे !
मनोगतानंतर मग राहवेना ! 'परक्या नजरेतून', 'प्रश्नचिन्ह ... उदगारचिन्ह' हे दोन लेख किंबहुना मनोगतच लगेच वाचले. मग शांत बसलो, विचार करायला लागलो. सुंदरच आहेत ! विचारचक्र सुरू करणारे आहे ! बाकी अजून वाचायचे आहे. मात्र खरोखरच छान !
श्री. प्रदीप रस्से यांनी हे लेखक माझे व त्यांचे 'फेसबुक' मित्र असल्याचे सांगीतले ! बाकी काही असो, त्यांच्यामुळे हे छान पुस्तक संग्रही आले व वाचावयास मिळाले.


९ ऑगस्ट २०१६

No comments:

Post a Comment